TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अध्याय तेवीसावा - श्लोक २०१ ते २२४

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्लोक २०१ ते २२४

दैदीप्यमान दिनकर ॥ तैसा रामाचे पाठीसी सौमित्र ॥ पैल अंगद महावीर ॥ क्रोधे पाहे आम्हांकडे ॥१॥

पैल सुषेण वैद्य महावीर ॥ हा सूर्यसुतासी होय श्र्वगुर ॥ वीसकोटी वानरभार ॥ त्यासांगातें पुरुषार्थी ॥२॥

पैल जांबुवंत ऋक्षवीर ॥ तयाचा बहात्तरकोटी दळभार ॥ पैल सेनाधिपती नीळ वीर सामर्थ्य अपार पैं त्याचें ॥३॥

जेणें शिळीं बांधिला सागर ॥नळ नाम बळसमुद्र ॥ शरभ ऋृषभ पर्वतकार ॥ युद्धसमय वांछिती ॥४॥

असो आतां वानरगण ॥ त्यांचीं नामें सांगतां पूर्ण ॥ उर्वी न पुरे करितां लेखन ॥ बळार्णव सर्वही ॥५॥

यालागीं दशकंधरा अवधारीं ॥ त्यांसी युद्ध करितां समरीं ॥ काळाचीही न उरे उरी ॥ मग इतर तेथें कायसे ॥६॥

ऐसें बोलतां शुक सारण ॥अत्यंत क्रोधावला रावण ॥ म्हणे तुमचा शिरच्छेद करून ॥ टाकावा ऐसें वाटतसे ॥७॥

येरू म्हणती आम्ही तुमचे हेर ॥ सत्य सांगावा समाचार ॥ असत्य बोलूं तरी साचार ॥ दंड करावा आम्हांतें ॥८॥

असो इकडे बिभीषण ॥ समस्तांसी दावी तर्जनी उचलून ॥ म्हणे पैल पहा रावण ॥ गोपुरावरी चढलासे ॥९॥

दहा शिरांवरी दाहा छत्रें ॥ दाहा विलसती मित्रपत्रें ॥ सेवक करी ढाळिती चामरें ॥ एकीं पिकमात्रें धरियेली ॥२१०॥

जैसा मघे उतरे पर्वतशिखरीं ॥ तैसा रावण भासे गोपुरीं ॥ अलंकारदीप्ति महीवरी ॥ विद्युत्प्राय झळकतसे ॥११॥

ऐसी आपुली संपदा पूर्ण ॥ शत्रूलागीं दाखवी रावण ॥ छत्रछायेविद्युत्प्राय झळकतसे ॥११॥

ऐसी आपुली संपदा पूर्ण ॥ शत्रूलागीं दाखवी रावण ॥ छत्रछायेखालीं रामसैन्य झांकून गेले ते समयीं ॥१२॥

जैसें उठतां मेघडंबर ॥ खालीं आच्छादे जग समग्र ॥ सेनेसहित रामचंद्र ॥ छत्रछायेतळीं तैसा ॥१३॥

ऐसा देखानि लंकापती ॥ कपिवीर क्षोभले चित्तीं ॥ सौमित्रें चाप घेतलें हातीं ॥ निमिषार्ध न लागतां ॥१४॥

लाविला अर्धचंद्रबाण ॥ ओढी ओढिली आकर्ण ॥ कल्पांतचपळेसमान ॥ चापापासूनि सूटला ॥१५॥

मुकुट छत्रे ते अवसरीं ॥ तोडून पाडिली धरणीवरी ॥ रावण घाबरला अंतरीं ॥ खालीं झडकरी उतरला ॥१६॥

म्हणे कोण्या वीरांचे संधान ॥ पाडिली दहाही छत्रें खंडून ॥ अन्न पान शयन ॥ गोड न लागे रावणातें ॥१७॥

कपाळशूळें आरंबळे व्याघ्र ॥ कीं वणव्यांत आहाळे अजगर ॥ तैसा दुःखें दशकंधर ॥ चिंताक्रांत सर्वदा ॥१८॥

रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हाचि केवळ क्षीरसागर ॥ साहित्य शेषशयन अरुवार ॥ वरी सर्वेश्र्वर पहुडला ॥१९॥

तेथें सप्रेम कळा लक्ष्मी ॥ सदा विलसे पादपद्मीं ॥ तरी सद्भाविक श्रोते तुम्ही ॥ पार्षदगण हरीचे ॥२२०॥

सुंदरकांड संपले येथोन ॥ पुढे युद्धकांड सुरस पूर्ण ॥ तें रसभरित भक्तजन ॥ करोत श्रवण सर्वदा ॥२१॥

जो अयोध्यापति रघुनंदन ॥ तेणेंच धनुष्यबाण ॥ दोनी कर जधनीं ठेवून ॥ भीमातटीं उभा असे ॥२२॥

श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पांडुरंगा पुंडलीकवरदा ॥ भक्तहृदयारविंदमिलिंदा ॥ अभंग अभेदा जगद्रुरु ॥२३॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥

त्रयोविंशाध्याय गोड हा ॥२२४॥ अध्याय ॥२३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-06-06T23:27:31.5370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

graded aggregate

  • सुश्रेणित समुच्चय 
  • श्रेणीकृत समुच्चय 
RANDOM WORD

Did you know?

Request for Anagha Ashtami Puja vrat Sagrasangit Puja
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.