ब्रह्मानन्दे अद्वैतानन्द - श्लोक ६१ ते ८०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


ज्याप्रमाणें मातीच्या पिंडाचें ज्ञान झाल्यावांचून कोणच्याही मुन्मय पदार्थाचे ज्ञान होत नाहीं त्याप्रमाणें ब्रह्म पाहिल्यावांचून जग दिसतच नाहीं. ॥६१॥

शि०- ब्रह्मनापासून जगाचें ज्ञान होतें असा सिद्धंत करण्यापुर्वी ब्रह्मचें व जगाचे स्वरुप समजलें पाहिजे त्यावाचून असा सिध्दांत कसा करितां येईल ? गू०- त्याचें स्वरुप तापनीय श्रृतींत वर्णिलें आहे. ब्रह्म हें सच्चिदानंदरुप आहे आणि जगत नामरुपात्मक आहे. ॥६२॥

आरुणीनें तदुपाचं वर्णन केलें . बडुंच याणीं प्रज्ञानें ब्रह्म या वाक्यानेंचिद्रुपाचें वर्णन केलें आहे आणि सनत्कुमारांनीं आनंदरुपाचें वर्नन केलें आसेल अन्य ठिकाणी पहावें ॥६३॥

तसेंच जगाचें नामरुपस्वरुपाही श्रुतींत वर्णिलें आहे. "सर्व रुपाचें चिंतन करुन त्यांस नावं ठेवुन ईश्वर जगांत रहातो " अशा अर्थाची व " नामारुपें मींच केलीं आहेत" अशा अर्थाची श्रुती आहे. ॥६४॥

सृष्टीचे पुर्वी जें अव्याकृत म्हणजे अव्यक्तरुप होते तेंच सृष्टीनंतर दोन प्रकारांनी व्यक्त झालें ही जो अव्याकृत म्हणजे अव्यक्तरुप होतें तेंच सृष्टीनंतर दोन प्रकारांनी व्यक्त झाली. ही जी अव्याकृत नांवाची अचिंत्य ब्रह्मशील तीच माया ॥६५॥

क्रिया रहित जें ब्रह्म त्याचेठायीं असणारी शक्ति जो अनेक प्रकरे विकार पावते त्या शक्तिस माया म्हणतात तीच मुळ प्रकृति आणि ती ज्याच्या हातीं आहे तो महेश्वर, ॥६६॥

या मायोपाधिक ब्रह्मचा पहिला विकार आकाश आहे तो अस्ति, भाति आणि प्रिय असा आहे. अवकाश हें त्यांचे रुप आहे तें मिथ्या आहे; पण पुर्वीचीं तीन रुपें सत्य आहेत ॥६७॥

शि०- अवकाशरुपाला मिथ्यात्व कसं येतें ? गू०- अवकाशव्यक्त होण्यापुर्वी तो नव्हता व पुढेही नाहींसा होतो. ज्यास शेंडाबुडाख नसून मध्येंच कांहीं भासतें तेंही तसेंच मिथ्या समजले पाहिजे ॥६८॥

यास गीतावाक्य प्रमाण. कृष्णाने अर्जूनास असं सांगितलें आहे कीं ही भूतें जीं दिसत आहेत ती पुर्वीच अव्यक्त होती शेवटीही अव्यक्तच होतात तीं केवळ मध्येंच मात्र व्यक्त आहेत. ॥६९॥

शि०- अवकाशांत सच्चिदानंद खरें आहेत. असं तुम्हीं म्हणतां याला प्रमाण काय ? गू०- घटामध्यें मृत्तिका जशी कालत्रयीं असतें तसे आकाशामध्यें सच्चिदांनदरुप एकसारखें आहे. ॥७०॥

शि०- आकाश वेगळेकरुन तें सचिदानंदरुप पहावें कोठें ? गू०-निराकाश जें तुझें स्वरुप तें पहा म्हणजे झालें. कारण आकाशाचेंही विस्मरण झालें असतां काय भासतें तें तुंच सांग शि०- शुन्य भासतं गू०- तें तरी पण भासतेंना ? जर भासतें तर तें शुन्य कसं ? ॥७१॥

ज्या अर्थी भासतें त्या अर्थीं तें आहे म्हटलें पहिजे आणि तें तत्त्व उदासीन असल्यामुळें तें सूखरुप आहे असं सिद्ध होतें शि०- सूखाला अनुकुलत्व पाहिजे आणि तें तर उदासीन आहे म्हणतां तेव्हा सूख कसं म्हणतां येईल ? गू०- तें सूखच आहे. कारण खर्‍या सूखाचें लक्षण असें आहे कीं जेथे अनुकुल्यही नाहीं आणि प्रतिकुल्यही नाहीं ते खरे सूख ॥७२॥

अनुकुल गोष्ट झाली म्हणून सूखारुप बुद्धि होते आणि प्रतिकुल झाली म्हणजे दुःखरुप बुद्धि होते. हीं दोन्हींही नसतांना जी स्थिति तोच निजानंद शि०- तर मग त्या स्थितीला निजदुःख कां म्हनूं नये ? गू०- दुःखाला निजरुपत्व आलेलें असं आम्हीं कोठेंच एकलें नाहीं ॥७३॥

शि०- निजानंद एकसारखा आहे असं जर तुम्हीं म्हणतां तर एकदां हर्ष आणि एकदां शोक कां होतो ? गू०- हर्षशोक मनाचे आहेत आणि मन तर क्षणिक आहे; म्हणून हर्षशोकालाही क्षणिकत्व आलें ॥७४॥

याकरितां आकाशाचेठायीं आनंद आहे असं सिद्ध झालें सत्ता आणि भान हीं तर तूं कबुलच करितोस याचप्रमाणें वायुप्रमाणें देहापर्यंत सर्व वस्तुंमध्यें आनंदाची व्याप्ति सिद्ध होतें ॥७५॥

वायुंची रुपें दोनः गति आणि स्पर्श दाह आणि प्रकाश हें अग्नीचें रुप जलाचें द्रवत्व आणि भूमीचें काठिण्य ॥७६॥

याचप्रमाणें सर्व आकार वनस्पति शरीरें यांची रुपें मनानें पृथक पृथक समजावयाचीं ॥७७॥

याचप्रमाणें नामरुपें एकमेकांपासून जई भिन्न झालीं तरी त्यांत सच्चिदानंद रुप एकच आहे यांत संशय नाहीं ॥७८॥

शि०- तर मग नामरुपें जीं भासतात त्यांची व्यवस्था कशी ? गू०- भासेतना बापडी त्यांस जन्मनाश असल्यामुळें ती मिथ्या आहेत असं आह्मी पुर्वीच सांगितलें आहे समुद्रावर जसें बुडबुडे दिसतात तशी ब्रह्मचेठायीं ती समजावी. ॥७९॥

सच्चिदांनंदरुप पुर्ण ब्रह्म न्याहाळुन पाहिलें असतां नाम रुपाची अवज्ञा आपोआप हळुहळु होते ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP