ब्रह्मानन्दे अद्वैतानन्द - श्लोक २१ ते ४०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


आदि मन झालें त्यानंतर बंधमोक्षाची कल्पनाः त्यानंतर त्रिबुवनात्मक प्रपंचरचना अशी ही जगस्थिति लहान मुलांस सांगितलेल्या काहणीप्रमाणें खोटीं असून खर्‍यामध्ये मोडु लागली ॥२१॥

ती काहणी तुला सांगतों एक दाईबाळाला त्याच्या विनोदाकरितां अशी एक काहनी सांगू लागली कीं बाळा ती राजपुत्र होते. ॥२२॥

त्यापैकीं दोन मुळींच झाले नाहींत आणि तिसरा तर गर्भातच नव्हता. ते धर्माचरणांत चांगले असून एका नसणार्‍या शहरी राहत होते ॥२३॥

ते एके दिवशीं आपल्या शुन्य नगरांतुन निरिच्छ मनानें बाहेर जात असतां आकाशामध्यें त्यांना फळांनी भरलेले असें कांही वृक्ष दृष्टीस पडले. ॥२४॥

तेथें पुढें होणार्‍या नगरींत ते तीनहीं राजपुत्र आज शिकार करीत मौजेंनें राहिले आहेत. ॥२५॥

हे रामा, याप्रमाणें दायीनें सांगितलेली कथा ऐकुन घेऊन अज्ञानामुळें ती खरी आहे अस बाळास वाटलें ॥२६॥

त्याकाहणीप्रमाणें ही ससांररचनाहीं अविचारी लोकंस खरी वाटली आहे. ॥२७॥

अशाच आणखी दुसर्‍या कथा सांगून वसिष्ठांनीं रामास मायाशक्तिचा विस्तार दर्शविला. तिचेंच निरुपण आतां आह्मी करितों ॥२८॥

ही मायाशक्ति जगदग्य कर्यापासून आणि आश्रयरुप ब्रह्मापासून विलक्षण आहे. यास दृष्टांत अग्नीची शक्ति भाजून आलेल्या प्रत्यक्ष फोडापासून व प्रत्यक्ष निखार्‍यापासून भिन्न आहे असं अनुमान होतें. ॥२९॥

दुसरें उदारहण घटचें मोठा आणि वाटोळ्या आकाराचा जो घट तद्वुप कार्य प्रत्यक्ष असते आणि शब्दादि पांच गूणांनी युक्त मुत्तिका ही प्रत्यक्षच आहे अप्रंतु ज्या शक्तिनें हा घट झाला ती शक्ति दोहोंहुन निराळींच युक्त मृत्तिका जो घटाचा आश्रय तीही ती नव्हे; ह्मणून ती कशी आहे हें सांगतों येत नाही. याकरितां ती अंचित्य असून अनिर्वचनीय आहे ॥३०॥

पृथ्वादिक जो घटाचा आकार तोही ती नव्हे. आणि शब्दादि गूप्पयुक्त मृत्तिका जी घटाचा आश्रय तीही ती नव्हे; ह्मणून ती कशी आहे हें सांगतो येत नाही. याकरितां ती अचिंत्य असून अनिर्वचनीय आहे. ॥३१॥

ही शक्ति घटरुप कार्य होण्यापुर्वी मृत्तिकेमध्यें गूप्त असते. मग पुढें कुंभार त्याचें चक्र इत्यादिकांच्या साहाय्यानें आकाराप्रत पावते ॥३२॥

शिष्य कारणापासून शक्तीचें कार्य अगदीं निराळें असून तो कर्यकारणभेद लोकंस कां समजत नाहीं ? गूरु मोठा आणि वाटोळा असा आकार आणि स्पर्शादि गूणांनीं युक्त मृत्तिकां हें दोन्हींही एकवट करुन अविवेकी लोक त्यास घट असें म्हणतात ॥३३॥

शि०- ते अविवेकी कसे ? गू०- अविवेकी नव्हते तर काय ? कुंभाराचा हात लागण्यापुर्वी जो मृत्तिकेचा अंश तोच हात लागल्यानंतरही असतो असें असून केवळ मोठ्या वाटोळ्या पोटाचा जो आकार त्याला घट ह्मणणे हे अज्ञान नव्हे काय ? पुर्वी घट नसून एकाएकी मागून कोठुन आला ॥३४॥

शि०- घट प्रत्यक्ष खरा असून तो खोटा कसा ह्मणावा ? गू०- खोटा नव्हें तर काय ? मृत्तिकेपासून तो जर भिन्न केला, तर मुळींच दिसत नाही; ह्मणून मृत्तिकेहुन निराळा नाही. बरें मृत्तिकाच घट ह्मणावी, तर पुर्वील पिंडदशेंत तो मुळींच दिसत नाहीं ॥३५॥

याकरितां शक्तिप्रमाणें हा घटही अनिवेचनीयच आहे. ती शक्तीचे कार्य आहे. घटाच्या अव्यक्त स्थितीला शक्ति ह्मणतात आणि व्यक्त स्थितीला घट असें ह्मणतात ॥३६॥

लोकंमध्यें जी ऐंद्राजालिक माया दृष्टीस पडते तीची पुर्वी दृष्टीस पडत नाही. मणीमंत्राचा प्रयोग झाल्यानंतर गंधर्वसेनादिरुपानें तो स्पष्ट होते ॥३७॥

याप्रमाणें छांदोयश्रुतीत " वाचारंभणविकरी नामधेयं मृत्तिकत्येव सत्यं " या वाक्यानें विकाराला मायामयत्वामुळें श्रुतीनें खोटेपणा दिला आणि विकाराला आधारभूतजी मृत्तिका ती खरी आहे असं सांगितलें ॥३८॥

वाणीनें उच्चार केलेला घट हा शब्द केवळ नाममात्र आहे. या नांवावांचून खरें स्वरुप कोणचेंच नाहीं; ह्मणून घट असत्य झाला. परंतु स्पर्शादि गूणांनी युक्त अशी जी केवळ मृत्तिका ती मात्र सत्य आहे. ॥३९॥

कारण शक्ति तेचें कार्य घट आणि त्यास आधारभूत मृत्तिका या तिहींमध्यें पुर्वीची दोन एकदां असणारी व एकदां नसणारीं अशीं कालभेदास पात्र आहेत आणि तिसरी जी मृत्तिका ती कालत्रयींही नाश पावत नसल्यामुळे सत्य आहे ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP