तृप्तिदीप - श्लोक १६१ ते १८०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


हे अर्जुना तू आपल्या प्रारब्ध कर्मानें बांधला गेला आहेस म्हनून जें कर्म करण्याची तुला इच्छा नाहीं तेंही परवश होऊन मोहानें तुला करावेंच लागतें ॥६१॥

मनुष्यास एकादें कृत्य करण्याची इच्छा असो किंवा नसो दुसर्‍याचे तांब्यात सांपड्यामुळे तो जें करितो ते परेच्छा पुर्वक समजावे ॥६२॥

तर मग पुर्वी दिलेल्या श्रुतींत किमिच्छन या पदानें इच्छेचा निषेध सांगितला आहे तेथें हें सांगणें जमत नाहीं, अशी कोनी शंका घेईल तर त्यांस हेंच उत्तर कीं श्रुतींत जें किमिच्छन पद दिलें आहे त्याचा अर्थ ज्ञान्यास इच्छा मुळींच होत नाहींत असें नाही; तर त्या जरी झाल्या तरी भाजलेल्या बीजाप्रमाणेंत्या निर्जीव असतात ॥६३॥

भाजलेल्या बी दिसण्यातं बीजाप्रमाणेच दिसतें परंतु त्यापासुन अंकुरादि कार्ये होत नाहींत. त्याप्रमाणें तत्त्ववेत्यांची इच्छा दिसण्यांत इतर लोकांच्या इच्छे सारखी जरी दिसली तरी विषयी खोटे आहेत असें त्याला पक्केंसमजलें असल्यामुळे त्यापासुन दुःखादि कार्यें होत नाहीत ॥६४॥

भाजलेलें बी जरी पेरण्याचे उपयोगी नाहीं तरी खाण्याचे उपयोगी पडतें त्याप्रमाणें ज्ञान्याच्या इच्छेपासुन भोग घडती परंतु दुःख होत नाहीं ॥६५॥

प्रारब्ध कर्माचा नाश भोगानें होतो म्हणुन भोगा पासुन जें दुःख होतें ते प्रारब्ध कर्मापासुन होतें असें नाहीं ते दुःख होण्याचे कारण असें कीं भोगण्याचे जे विषय ते आम्ही खरे मानती; परंतु ते मिथ्या आहेत अशी ज्ञान्याची खात्री असते म्हनुन त्यांस दुःख होत नाहीं ॥६६॥

वर दुःखास करण भ्रंति असें सांगितलें तो ही कां हे विषयोपभोग मला नेहमीं मिळोत उत्तरोत्तर यांची वृद्धि होवो. यांत विघ्न कोनचेंच न येवो, येणेंकरुनच मी धन्य आहे असें जें वाटणें तीच भ्रांति ॥६७॥

या भ्रांतीचा परिहार करण्याला एक उपाय आहे जें होण्यास अशक्य तें होत नाही. आणी होण्यास जेंशक्य ते झाल्यावांचुन रहाणार नाहीं असा विवेक करावा हा विवेक चिंतारुप विषाला मारतो. आणी त्यापासुन भ्रांतीचे निवारण होतें ॥६८॥

ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांना जरी विषयभोग सारखाच असला तरी अज्ञान्यास जसेंदुःख होतें तसें ज्ञान्यास होत नाहीं कारण अज्ञानी हा असंभाव्य गोष्टीचें मांडे मनांत खाऊन दुःख पावतो परंतु ज्ञान्याची गोषाट तशी नाही ॥६९॥

भोगाचें मिथ्यात्व पक्कें समजुन त्याजविषयीं अनास्था करुन तें भोगीत असतांही त्याला दुःखहोत नाही. कारण त्याचे मनांत संकल्पच नाही. ॥१७०॥

ज्याची रचना मनांत देखील आणतां येत नाहीं असें जे जग तें स्वप्नेंद्रजालाप्रमाणें दिसुन नांश पावणारें असें आहे हें प्रत्यक्ष समजुन तेथें त्यांचे मन कसें बरेंरमेल ? ॥७१॥

तें समजण्याचा प्रकार असा आहे कीं मनुष्यांने नेहमी सावध राहुन आपले स्वप्न व जागृति या दोन्हीं अवस्थेची परस्पर तुलना करीत असावें मग ॥७२॥

त्या दोहोंमधील साम्य चांगलें ध्यानांत आणुन जागृतीविषयीं सत्यत्वबुद्धि सोडुन दिली असतां स्वप्नाप्रमाणें जागृति ही खोटी आहे असं पक्कें समजेल मग अर्थातच पुर्वीच अज्ञान दशेप्रमाणें या जगात त्यांचे रमणार नाही ॥७३॥

ह्मा सर्व जगाची रचना इंद्रजालाप्रभाणें अचित्य आहे हा विचार त्याचे मनांत नेहमीं वागतो, त्याला प्रारब्धभोगापासुन काय हानि आहे? ॥७४॥

तत्त्वविद्येंचे काम इतकेच कीं हे जग इंद्रजालाप्रमाणें खोटे आहे त्याची आठवण ती तत्त्वविद्या मनुष्यास करुन देते आणि जीवाकडुन सुख खोटें आहे याची आठवण ती तत्त्वविद्या मनुष्यास करुन देते आणी जीवाकडुन सुख दुःख भोगवणें हे प्रारब्धाचें काम होय. ॥७५॥

याकरितां तत्त्वज्ञान आणि प्रारब्ध यांमध्यें विरोधमुळीच नाहीं. कारण त्यादोहोंचे विषय भिन्न भिन्न आहेत गारुड्याचा खेळ पाहणारा हेंगारुड आहे असेंसमजुनकेवळ कौतुकानें ती मौज पाहतो त्याप्रमाणे ज्ञान्यालाही या जगाची मौज वाटते ॥७६॥

हें प्रारब्ध कर्मजगाला सत्यत्व आणुन जर सुखदुःखें जीवाकडुन भोगवील तर मात्र तें तत्त्वज्ञानास विरोधी होईल. पण तशी कांही गोष्ट नाही. म्हणुन विषयांचा भोग होण्यास ती सत्यच असला पाहिजे असा नियम नाहीं ॥७७॥

स्वप्नामधील कल्पित विषयांचा जसा पुर्णपणें भोग होतो तसाच जागृतीमधील खोट्या विषयांचाही भोग होतो असें म्हणण्यास कोणती हरकत आहे ? ॥७८॥

तसेंच जर या तत्त्वविद्य्पासुन जगाचा मुळींच ल्प होईल तर ती प्रारब्ध कर्मांशी विरोधी होईल. परंतु तिजपासुन तसं होत नाही. अमुक वस्तु खोटी आहे असं समजल्याने तिचा म्हणजेच अगदींच नाश होतो असे नाही ॥७९॥

लोकांमध्यें पदार्थाचा नाश न होतां तो पदार्थ खोटा आहे असं ज्ञान होण्याचा संभव आहे त्याप्रमाणें विषय भोगाचा नाश न होतां त्याचा खॊटेपणा मनांत ठसण्यास कोणताही अडथळा दिसत नाही. ॥१८०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP