तृप्तिदीप - श्लोक ४१ ते ६०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


पण ब्रह्मा अधिष्ठान आहे ही गोष्ट जरी सर्व अवस्थांस सारखी लागु आहे तरी " मी संसारी " मी ज्ञानी" मी शोकर हित झालों" " मी तृप्ति पावलो" अशा चार उत्तरावस्थ जीवालाच आहेत असं दिसतें त्या ब्रह्माला संभवत नाहींत या पुर्वेपक्षावर आमचें उत्तर असें कीं ॥४१॥

वरील कारणावरुन या चार अवस्था जर जीवास आहेत तर त्यास कारणास्तव पुर्वीच्यादोन अवस्थाही जीवास संभवतात कारण मला कांही समजत नाहीं ब्रह्माचें असणें भासणें माझ्या अनुभवास येत नाहीं असें ही जीव म्हणतो. ॥४२॥

तर ब्रह्मा हें अज्ञानाला आश्रय असे असें पुर्वाचार्यांनी कां सांगितलें ? असें कोणी पुसेल तर त्यावर आम्ही असें सांगतो कीं तेथें त्याची विवक्षा निराळी आहे. त्याणीं जो आश्रय म्हटला तो केवळ अधिष्ठान असें समजावें आणि आम्हीं जें अज्ञान जीवाची अवस्था असें म्हणतों तें तेथें जीवाचें अशिष्ठान नाहीं तर त्याला अभिमान जीवानें घेतला आहे असें समजावें ॥४३॥

याप्रमणें बंधास कारणीभुत अशा तीन अवस्था दाखविल्या आतां बाकी राहिलेल्या अवस्थापैकीआं मुक्तिला कारणीभुत ज्या दोन अवस्था त्या येथें दाखवुन त्यापासुन अज्ञान व आवरण ही कशीं नाश पावतात तें सांगतों परोक्ष व अपरोक्ष या दोन ज्ञानांच्या योगानें पुर्वोक्त अज्ञान नाश पावलें म्हणजे ब्रह्मा नाहीं व तें दिसत नाहीं असें अज्ञानापासुन होणाएं जें दोन प्रकारचें आवरण तेंहीं नाश पावतें ॥४४॥

परोक्षज्ञानाच्या योगानें असत्वरुप आवरण नाश पावतें आणि अपरोक्षज्ञानाचें योगानें अभावरुप आवरण नाश पावतें ॥४५॥

अभावरुप आवरण अपरोक्ष ज्ञानानें नष्ट झालें असतां मी ब्रह्मा आहें "जीव नव्हें " असा अनुभव होऊन जीवत्व नाहींसें होतें मग अर्थातच कर्तृत्वादिक अभिमानापासुन होणारा संसाररुपी शोक नाहींसा होतो ॥४६॥

सर्व समार निवृत झाला असतां मी नित्य मुक्त आहें असें सहजच वाटुं लागतें हीच निरंकुशतृप्तिसंज्ञक सातवी अवस्था. कारण ही तृप्ति झाली असतां कोणतीहीं कर्तव्यता न राहिल्यामुळें पुनः दुःख होण्याचें कारणच नाहीं ॥४७॥

या प्रकारणाच्या आरंभी जो " आत्मानचेत" अशी श्रुति दिलेली आहे तिजवर व्याख्यान देणें हा प्रकृत विषय असुन आम्हीं जें अवस्थासप्तकाचें निरुपण केलें तेंविषयांपर झाले अशी शंका नलगे. कारण चिदाभासाच्या ज्या चार उतर अवस्था सांगितल्या त्यापैकीं अपरोक्षज्ञान आणि शोकनिवृति या दोन अवस्थांचें मात्र प्रतिपादन करण्याचा जरी या श्रुतिचामुख्य उद्देश आहे तथापि बाकीच्या पांच ज्या सांगितल्या त्या विषयाच्या ओघानें सांगाव्यालागल्या ॥४८॥

" अयं " या श्रुतीतील शब्दापासुन आत्म्याच्या अपरोक्षत्वाचा बोध होतोः असें जें वर सांगितलें, त्यावरुन आम्या हा अपरोक्षज्ञानालाच विषय आहे; परोक्षज्ञानाला तोविषय नाहीं, असें जर कोनी म्हणेल तर आम्हीं त्याचा विचार येथें सांगतों. तो असा की अपरोक्षज्ञानाचें दोन प्रकार आहेत. विशय स्वप्रकाशत्वेंकरुन एक व तसेच बुद्धीनें त्याचें स्वरुप समजणें हा दुसरा ॥४९॥

अपरोक्शज्ञानकलीं ब्रह्माची स्वप्रकाशता जशी असते तशीच परोक्षज्ञानकालींही असते कारण ब्रह्मा स्वप्रकाश आहे हें तेव्हाही वाक्यद्वारा समजतें ॥५०॥

प्रत्यगाभिन्न ब्रह्माविषयांच्या ज्ञानाला परोक्षत्व कसें येईल ? असें जर कोणी म्हणेल तर वाक्यांत प्रत्यंगशाचें ग्रहण केलें नाहीं म्हणून ती शंका संभवत नाहीं. कारण 'मी ब्रह्मा' असेंन लिहितां केवळ 'ब्रह्मा आहे' असें लिहिलें आहे. हें परोक्षज्ञान भ्रांत्यात्मक क असें कोणी म्हणत असेल तर त्यास आम्हीं असें पुसतों कीं परोक्षज्ञान जें भ्रांतात्मक असें कोणी म्हणत तें कोनत्या कारणास्तव ? काय ब्रह्मास्ति हें वाक्य रद्द करण्याजोगें दुसरें वाक्य आहे म्हनुन ह्मणतां की व्यक्तीचा उल्लेख नाही म्हणून म्हणतां ? कीं प्रत्यक्षत्वेंकरुन समजाण्याची वस्तुपरीक्षाकरुन घेतली म्हणुन म्हणतां ? किंवा अंशाचें ग्रहण होत नाहीं म्हणुन म्हणतां ? ह्मा चार कारणापैकीं पहिलें कारण जी वाक्यांची बाधा ती येथें कांहीं संभवत नाहीं ॥५१॥

कारण ब्रह्मास्ति या वक्यांची बाधा करण्यास ब्रह्मानास्ति असें वाक्य कोठेंही आढळत नाहीं म्हनुन येथें बाधा संभवत नाहीं ॥५२॥

आतां भ्रांतीचें दुसरें कारण व्यक्तीचा अनुल्लेख येथें व्यक्तीचा उल्लेख जरी नसला तरी तेवढ्यानेंच केवळ त्याज्ञानाला भ्रांतित्व येत नाहीं. कारण यसें जर म्हणावें तर तेवढ्यानेच केवळ त्या ज्ञानाला भ्रांतित्व येत नाही. कारण तसें जर म्हणावें, तर स्वर्ग ज्ञान देखील भ्रांति म्हणावें लागेल "स्वर्ग आहे" या वाक्यांत व्यक्तींचा उल्लेख मुळींच नाहीं. केवळ सामान्य उल्लेख आहे. ॥५३॥

तिसरें अपरोक्षत्वास योग्य असुन परिक्षत्वेंकरुन ग्रहण केलें यामुळेंच केवळ भ्रांति संभवत नाहीं. कारण "आहे" या वाक्यांत 'ब्रह्मा परोक्ष' असें मुळींच म्हटले नाहीं. मग ब्रह्माज्ञान तरी परोक्ष कसें ? असें जर म्हणाल तर, "इदंब्रह्म" असा व्यक्युल्लेख वाक्यांत नाहीं म्हणुन अर्थातच परोक्षत्वासिद्धि झाली ॥५४॥

भ्रांतीचें चौथें कारणः अंशाचें अग्रहण तेंही येथें बरोबर लागुं पडत नाहीं. कारण तेवढ्याचमुळें जर, ज्ञान भ्रांत्यात्मक म्हणावें तर, घटज्ञानही भ्रांति म्हणावी लागेल, कारण घटज्ञानांत देखील आंतील सर्व अवयवांचें ग्रहण होत नसतें आम्हीं येते घटाचा दृष्टांत दिला. त्याजवरुन आणखी एक प्रश्न निघण्याजोगा आहे तो हा कीं , घट सांश आहे म्हणुन तेथें अंशाचें ग्रहण संभवतें परंतु निरंश ब्रह्माला सांशत्व कसें सभवेल ? तर त्याचें उत्तर असें की ब्रह्मालाहीं भेदक उपाधिरुप मायेचा अंश आहेच ॥५५॥

अते भेदक अंश दोन आहेत. एक आसत्वांश आणि दुसरा अभानांश पहिला परोक्षज्ञानानें निवृत्त होतो. आणी एक असत्वांश आणि दुसरा अभानांश. पहिला परोक्षज्ञानानें निवृत्त होतो. आणि दुसरा अपरोक्षज्ञानानें नाहींसा होतो ॥५६॥

दहावा आहे या आत्पवाक्यापासुन उप्तन्न होणारें परोक्षज्ञान हें वरील दृष्टांतांत जसें निभ्रांत आहे, तसेंच "ब्रह्मास्ति:" या वाक्यांपासुन होणारें ज्ञानहीं निभ्रांत आहे दोहोंकडे अज्ञानाचें अस त्वावरण समानच आहे. ॥५७॥

'अयमात्माब्रह्मा" या महावाक्याचा अर्थ चांगला विचारपुर्वक केला असतां ब्रह्माचें प्रत्यक्षज्ञान होतें ज्याप्रमाणें दहाव तु आहेस या वाक्याचा विचारपुर्वक आर्थ केल्यानें मीच दहावा असें अपरोक्षज्ञान झालें त्याप्रमाणें समजावें ॥५८॥

वाक्यांचा विचारपुर्वक अर्थ म्हनुन सांगितला, तो असा कीं "दहावा आहे" असें जें तुम्हीं म्हणतां तो कोण ? असा प्रश्न आप्तास केल्यावर आप्त म्हणतो कीं, "तुंच दहावा" तें उत्तर ऐकुन आअपणासहवर्तमान बाकीच्या नवांस मोजुन पाहुन मीच दहावा असें त्याला स्मरलें ॥५९॥

जेथे विचरपुर्वक अर्थ केल्यापासुन मीच दहावा असें जें ज्ञान झालें तें आदि मध्य अवसानी अप्रतिहत राहतें मी दहावा होय कीं नाहीं हासंशय मुळीच राहत नाहीं ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP