चित्रदीप - श्लोक २४१ ते २६०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


हा जो अज्ञानी लोकांच्या निश्चय सांगितल्या त्याच्या उलट ज्ञान्याच्या निश्चय स्पष्ट दिसुन येतो. ज्ञानी आणी अज्ञानी हे दोघेही आपापल्या निश्चयाप्रमाणें मी मुक्त आणि मी बद्ध असें मानतात ॥४१॥

अद्वैत युक्रीनेंच सिद्ध होतें, अनुभवास ते येत नाही मग निश्चय कसा करावा असें जर कोणी म्हणेल तर तशी शंका घेणें नलगे. कारण घटादिक जे आम्हांस भासतात त्यांत ज्ञानरुपानें तें प्रत्यक्ष अनुभवास येते; परंतु तें समग्र भासत नाहीं. असे जर कोणी म्हणेल तर आम्ही त्याम पुसतों कीं, तुमची द्वैतमृष्टी तरी समग्र भासते काय ? समग्र न भासण्याचे संबंधानें द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही सारखींच आहेत ॥४२॥

दिडमात्रेंकरुन जसे तुमचें द्वैत भासतें तसें आमचें अद्वैतही भासतें ही गोष्ट दोहींलाही समाधाणच आहे. परंतु तेवढ्यानें जर तुमची द्वैतसिद्धि होते. तर मग आमची अद्वैतसिद्धिही कां न व्हावी ॥४३॥

या श्लोकांत पुर्वपक्षी अद्वैतसिद्धि होत नाही अशी शंका अन्य प्रकारांनें करितो कीं अद्वैत म्हणजे द्वैतरहितक म्हणुन द्वैत आणि अद्वैत हां परस्पर अत्यंत विरुद्ध आहेत; आणि हें जर सत्य आहे तर सांप्रत द्वैतप्रतीति असतां अद्वैत कसे संभवेल ? संभवणारच नाहीं. आतां हे सिद्धांती जर तुं असें म्हणशील कीं अद्वैत हें द्वैतविरोधी आहे तर मग अद्वैतप्रतीतिकाली द्वैतहीं असिद्धा आहे असा तुझा समान प्रश्न मला होणारच; यावर मी ( पुर्वपक्षीं ) असं सांगतों कीं हेंसिद्धांती तुझ्या मतांत चिद्रुपप्रतीति म्हणजे अद्वैतप्रतीति आहे आणि ती चिद्रुपप्रतीति तर ह्मा प्रत्यक्ष द्वैताच्या विरोधी नाही; याकरितां उभयासाम्य नाहीं. या बोलण्यांत पुर्वपक्ष्यांचा इतकाच अभिप्राय कीं, चिद्रुप जें अद्वैत, त्याच्या प्रतीतिकालीं द्वैतभान संभवतें ॥४४॥

यांचे समाधान हेंच की द्वैत मायाकल्पित असल्यामुळें तें मुळींच खोटें आहे; म्हणुन खरें उरलें जें अद्वैत तेंच भासतें असें म्हणावयाचें ॥४५॥

ज्याच्या रचनेची कल्पनाच करितां येत नाहीं असें जे जग तेंमायाकल्पित आहे म्हणुन तें मिथ्या असा निश्चय करुन उर्वरीत जें अद्वैत तेंच खरें असें समजावें ॥४६॥

सिद्धांतानें जगन्मिथ्यात्व जरी भासलें तरी तें पुनः पुनः खरेंच भासतें असं जर कोनी म्हणेल तर पुनः त्याचाच निदिध्यास करावा यांत श्रम तो काय ? ॥४७॥

अशींच किती दिवस याची घोंटणी करावी अशी जर कोनास चिंता असेल तर तीच चिंता द्वैताविषयीं "देवा, हेंद्वैत किती दिवस मला भासणार " अशी चिंता करावी अद्वैताविषयीं चिंता नको , कारण त्याणेंसर्व खेदाचें निवारण होतें ॥४८॥

इतकें मला ज्ञान होऊन क्षुधातृषादि प्राणधर्म मला पुर्वीप्रमाणेंच भासतात, असें जर कोनी म्हणेल, ता आम्ही नाहींकोठें म्हणतों ? जरी ते भासले तरी मी म्हणणारा जो अहंकारा त्या चेठायीं ते भासतात तर भासेनात बापडे ॥४९॥

आत्म्यालाही तादात्म्याध्यासामुळें त्यांचा संपर्क लागेल अशी जर भीति वाटत असेल तर तशी वाटण्याचें कारण नाही. कारण तसा अध्यास नहोऊन देतां विवेकच केला म्हणजे झाले ॥२५०॥

आतां फार दिवसांची दृढवासना असल्यामुळें विवेक केला तरी पुनः पुनः अध्यास होतो हें खरें आहे, पण त्याजवर विवेकावांचुन दुसरा उपाय नाहीं. विवेकांचें पुनः पुनः आवर्तन करुन तेंच दृढ करावें ॥५१॥

विवेकांनें जेंजगाचें मिथ्यात्व ठरतें तें केवळ युक्तिसिद्ध होय. रचना प्रत्यक्ष अनुभवास येत नाही. ही शंका योग्य नाही. कारण जगाची अचित्य रचना प्रत्यक्ष अनुभवास येत नाही. ही शंका योग्य नाहीं. कारण जगाची अचित्य रचना प्रत्यक्ष अनुभवास येते; तेव्हा त्यांचे मिथ्यात्व ज्ञान प्रत्यक्षम्हटले पाहिजे ॥५२॥

तुमच्य चैतन्याची रचनाही अचिंत्यच आहे असं म्हणाल तर आम्हीं नाहीं कोठें म्हणतों ? द्वैत व अद्वैत ही दोनीहीं अचित्यच आहेत; प्रंतु हेतु मात्र निराळे एकाला अनित्यत्व कारण आणि दुसर्‍याला नित्यत्व कारण अनित्य म्हणजे पदार्थाचा प्राग्भाव ज्यास आहे तें ॥५३॥

तुमच्या चैतन्याला तरी नित्यत्व कोठें आहे असें जर कोणी म्हणेल तर आमचें उत्तर असें कीं ज्या पदार्थाला प्राग्भाव आहे तो आनित्य चैतन्याचा प्राग्भाव कोणाच्याच अनुभवास येत नाही. परंतु द्वैतसृष्टीचा अभाव निद्रेमध्यें साक्षी चैतन्याचे अनुभवास येतो ॥५४॥

म्हणुन घटादिकांप्रमाणे सकल द्वैतप्राग्भावानें युक्त असुन त्यांची रचनाही पुनः अचिंत्य आहे म्हणुन इंद्रजालाप्रमाणें तें मिथ्या आहे हें सिद्ध ॥५५॥

याप्रमाणें चैतन्य प्रत्यक्ष अनुभवास येतें व द्वैतांचे मिथ्यात्वही तसेंच अनुभवसिद्ध आहे. असं असुन अद्वैत प्रत्यक्ष नाहीं म्हणणे हा विरोध नव्हे काय ? ॥५६॥

इतकें समजुनही क्तियेक लोक असंतुष्टकांदिसतात , असा जर कोणी प्रश्न करीत असेल तर त्याजवर आम्ही असा प्रश्न करितों कीं, चार्वाकादि पंडित इतके विद्वान ते देहाला आत्मा कां मानतात ? ॥५७॥

चर्वाकादिकांना काम क्रोधाही बुद्धिदोषामुले चांगल्या विचार होत नाही असें जर म्हणाल तर आमचेंही तसेंच उत्तर आहे. जे लोक असंतुष्ट दिसतात असं तुम्ही म्हणतां ते केवळ शस्त्रांचा चांगला विचार नकेल्यामुळे तसे दिसतात ॥५८॥

तर मग "यदा सर्व प्रमुच्यंतें कामायेऽस्यहदि श्रिता " ( जेव्हा हृदयांतील सर्व काम नष्ट होतात ) हें श्रुतीचें फळ कोठें अनुभवास येत नाहीं असें कोणी म्हणुं नये सर्व श्रुतींची एकवाक्यंता करुन विचार केला असतां तें फल सिद्ध होतें ॥५९॥

"ज्या कांळीं सर्व हृदयाग्रंथि सुटतात" असेंदुसरें एके ठिकाणीं वाक्य आहे तेथें हृदयग्रथिरुपानें कामाची व्याख्या केली आहे. ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP