चित्रदीप - श्लोक २२१ ते २४०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


असंग चिद्रुप आणि विभु असा सांख्यांनी वर्णिलेला जीव आणि तसाच योगांत सांगितलेला इश्वर हे दोन्हींही तत आणि त्व या दोन पदांचे जे तुम्हीं अर्थ केले आहेत त्यापासुन भिन्न नाहींत मग त्यांस पुर्व पक्ष तरी कां म्हणावे असं जर कोनाचें म्हणणें असेल तर त्यावर आमचें असें उत्तर आहे कीं ॥२१॥

त्यांनीं केलेले अर्थ आमच्या सिद्धांतापासुन भिन्न आहेत. आतां आम्हीं जे तत आणि त्वं पदांचे अर्थ केले आहेत ते केवळ अद्वैताचा बोध व्हावा म्हणुन ॥२२॥

अनादिमायेंनें मोहित होऊन जीव आणि ईश हे निराळे आहेत असें लोक समजतात ती समजुत काढुन टाकण्याकरिती आम्ही त्या दोन पदार्थांचें शोधन केलें आहे ॥२३॥

याकरितांच पूर्वी सांगितलेला घटाकश महाकाश, जलाकाशा व अभ्राकाश या चोहोंचा दृष्टांत एथें चांगला जुळतो ॥२४॥

काश, जलाकाश व अभ्राकाश ही दोन्हीं जल आणि अभ्र या उपाधीवर अवलंबुन आहेत या उभय आकाशांना आधारभुत घटाकाश आणि महाकाश ही अत्यंत निर्मल आहेत. ॥२५॥

त्याचप्रमाणें आनंदमय ईश आणी विज्ञानमय जीव हे उभयता क्रमेंकरुन माया आणि बुद्धि यांवर अवलंभुन आहे आणि त्या दोहोंस अधिष्ठानभुत कृटस्थ आणि ब्रह्मा हे अत्यंत निर्मल आहेत ॥२६॥

एवढ अतुम्ही उपयोग करुन घेतला म्हणुन तरी सांख्यं व योग तुम्हाला मान्य आहेत कीं नाहींत असें जर कोणी पुसलें तर आम्हीं म्हणतां कीं सांख्य योगच कां ? आम्हीं अन्नमय कोशाचें वर्नन केल्यानें देहात्मत्वसुद्धां स्वीकारलें असें होईल ॥२७॥

आत्में निरनिराळें आहेत जग सत्य आहे आनि इश्वर निराळा आहे. ह्मा तीन गोष्टी जर वगळल्या तर सांख्य योग आणि वेदान्त ह्या तिहींची संमति होत ॥२८॥

असंगत्वमात्रेंकरुन जीव कृतार्थ आहे असें जर म्हणाल स्वकचंदनादि जे विषय आहेत्यांच्या नित्यत्वें करुनही तो कृतार्थ होईल ॥२९॥

परंतु स्वगादि विषयांचें नित्यत्व सिद्ध होणें अशक्य आहे तसें जग आणि ईश हे प्रत्यक्ष असतांना वाटली, तरी प्रकृतीच्या आहे ॥२३०॥

जरी सांख्य ज्ञानानें तात्कालिक असंगता वाटली तरी प्रकृतीच्या योगानें जीवास पुनः संग लागनारच आणि पुनः त्यांचे ईश्वर तर नियमन करतो; मग त्यास अमोक्ष कोठुन मिळणार ? ॥३१॥

जीवांचा संग आणि इश्वराचे नियमन या दोहोंस कारण अविवेक आहे जर सांख्याच्या मतांत बळेंच मायावाद आला. ॥३२॥

आतां कोनी म्हणेल कीं, आत्मे जे निरनिराळे मानले ते केवळ बंधमोक्षाची व्यवस्था करण्याकरितां तर त्यावर आमचें असें म्हणणें कीं ती व्यवस्था करण्यास सांख्यशास्त्र कशाला पाहिजे ? एक आत्मा जरी मानला तरी ती व्यवस्था करण्यास माया समर्थ आहे ॥३३॥

दुर्घटाचीच मी घटना करतें असें विरुद्ध वाक्य तुम्ही पहात नाहीं काय ? तेथें मोक्ष मायिक नव्हे असें समजुं नये . बांधाप्रमाणेच मोक्षालाही सत्यता देनें हेंश्रुतीस अगदी सह्यज होत नाहीं ॥३४॥

नाश नाहीं उप्त्तत्ति नाहीं वद्ध नाहीं साधक नाहीं मुमुसु नाहीं आणि मुक्तही नाही हाच परमार्थ ॥३५॥

मायानामक कामधेनुचे जीव आणि ईश हे वत्स आहेत. ति द्वैतरुप दृग्ध ते यथेच्च प्राशन करीत बापडे पण खरें तत्त्व जर म्हणाल अद्वैतच आहे. ॥३६॥

कूटस्थ आणि ब्रह्मा यांमधील भेद केवळ नांवाचा आहे. भेदच नाहीं. जसें घटाकाश आणी महाकाश यांचा वियोग कधीच झालेला नाहीं, त्याप्रमाणें त्या दोहोंमध्यें वियोगाच नाहीं ॥३७॥

सृष्टीच्या पुर्वी जें अद्वैत होतें म्हणुन श्रुतींत सांगितलें आहे तेंच आज आहे, आणि यानंतरही तेंच असणार; आणि तेंच मुक्तिनंतरही असणार, मायेंनें सर्व लोकांस व्यर्थ भ्रमंत पाडलें आहे. ॥३८॥

प्रपंच खोटा आणी अद्वैत खरें असें जें बोलतात ते देखील संसार करितात. मग तुमचें ब्रह्माज्ञान घेऊन करावयाचें काय अशी शंका कोणी घेण्याचें कारण नाही. कारण जरी त्यांणी पुर्व कर्माच्या ओघाने संसार केला तरी त्यांस पुर्वीप्रमाणें भ्रांति नसते ॥३९॥

ऐहिक आणि पारलौकिक संसार खरा आहे आणि अद्वैत भासत नाहीं इतकेंच नव्हे तर ते मुळींच नाहीं असा अज्ञानी लोकांचा निश्चय असतो ॥२४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP