TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ११

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अभंग ११

चहुं देहाची साक्षिणी । उभी असे गोल्हाटगगनीं ।

अवस्था तें उन्मनी । भोगिती योगी ॥११॥

टिकाः

चहुं देहाची साक्षिणीं । उभी गोल्हाटीचें गगनीं । गोत्‍हाट गगन गेलें भरोनि । सुशुप्तिया ॥१॥

अवकाश अथिष्ठान । तेणेंचि अस्तिभाति गुण । सकळही अवस्था संपन्न । तेणेंचि योगें ॥२॥

तेणेंचि प्रियाप्रिय जालें । तेणेंचि सत्य उदया आलें । नामरुप गुणें केलें । झाकोळलें ॥३॥

तेणेंचि जाले बोलाबोल । निर्मियेंलें दृश्यपडळ । सुषुप्ति व्यापिलें केवळ । गोल्हाटा गगन ॥४॥

तेथ चित्काळ साक्षिनी । चहुं देहांची स्वामिणी । सुखदुःखाची कहाणी । सांगतसे ॥५॥

सुखदुःखाची जाणीव तेथ । तेचि होय परावर्त । तेणेचि सुखदुःख भासत इंद्रियासी ॥६॥

पहातां सुखीदुःखी कोणी । व्हावे कायसे म्हणोनि । भ्रांतियोंगे जाणीवपणी । सुखदुःख ॥७॥

सुखदुःख जाय जेथें । चित्कळेंपाशिया निरुते । साक्षीरुप चित्काळा तें । सवेंद्य कोण ॥८॥

म्हणोनि सुखदुःख पाही । कांही उरलेचि नाहीं । आपाआपण या ठायीं । आपणाचि ॥९॥

म्हणोनि या निशिदिनी । पावली अवस्था उन्मनी । मन घालें रामकृष्नीं । हृदयातु ॥१०॥

मनाचें हरलें मनपण । म्हणोनि अवस्था उन्मन । सकळ इंद्रिये समाधान । हरिनामें ॥११॥

ऐसी उन्मन अवस्था योगी । रामकृष्णनामीं भोगी । सकळ इंद्रिये असंगी । सर्व संगीं ॥१२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:02:43.7100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अवगुण

  • पु. 
  • दुर्गुण ; वाईट गुण ; खोडी ; वाईट संवय ; दोष . सकळ अवगुणामधें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । - दा १९ . ८ . ८ . 
  • वाईट परिणाम ; अपायकारक प्रयोग ; अनिष्ट किंवा इजा करणारी क्रिया ( औषध , उपाय , इत्यादिकांची ). [ सं . ] 
  • ना. कुप्रवृत्ती , खोडी , दुर्गुण , दोष , वाईप गुण , वाईट सवय . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.