मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|शंकर आरती संग्रह|
मंगेश महारूद्रा जय पार्वत...

शंकराची आरती - मंगेश महारूद्रा जय पार्वत...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.

मंगेश महारूद्रा जय पार्वतीवरा ॥
आरती ओवाळीन । शिवा भोळ्या शंकरा ॥ धृ. ॥
आपुले म्हणविसी । देशील आणिका हाती हांसतील संतजन ॥
कृपासागरमूर्ती ॥ मंगेश. ॥ १ ॥
सर्वत्र व्यापलासी । जळी स्थळी पाषाणी ॥
कृपेचा सागर हो । आम्हां पावे निर्वाणी ॥ मंगेश. ॥ २ ॥
विभूती व्याघ्रांबर । गजचर्म परिधान ॥
वासुकी हार शोभे । आला कृष्ण शरण ॥ मंगेश. ॥ ३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP