मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|शंकर आरती संग्रह|
आरती रत्नेश्वराची । करु य...

शंकराची आरती - आरती रत्नेश्वराची । करु य...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.

आरती रत्नेश्वराची । करु या राऊळनाथाची ॥

धससी धामणसे भुवनी नमिते तवभक्त सदाचरणी ।

पडतां भक्त हाक कानीं । संकटी येता धांवोनी ॥

चाल - उमावृष नाहीं मनीं तेव्हां रुपतव सगुण , सदाकरि चिंतन , अनन्य होऊन ,

आसधरी तुमची , कराया सेवा चरणाची ॥ आ . ॥

रत्नासुर तव भक्ति करी । पूजिती पार्थिव लिंग करी ॥

तोषवि तुजत्या वर देसी । मातला असुर जन त्रासी ॥

चाल - रक्षणा यावें या समया , वधुनि तो असुर जन त्रासी ॥

चाल - रक्षणा यावें या समया , वधुनि तो असुर नाम रत्नेश्वर , स्वयंभू लिंगवर तेणे सकलाची लोपली भीति तव जनांची ॥ आ . ॥


संनिध वाहे सोम गंगा श्रीविष्ठेद् ‌ भूतहि वारिधिगा । स्नानार्चन अभिषेकाला । इतर जलीं आवड ना तुजला ॥

कृपेने पाहि पाहि आम्हां । तुजवांचोनी नाहीं आम्हा कुणी ॥

दयार्द्र नयनीं करी कणव अमुची , घाली पाखर मायेची ॥ आ . ॥


ऎसे वर्णू किती देवा । अमितगुण समुह कसा गावा ॥

अमुचा कल्मष नासावा ॥ सतत तव घडो चरण सेवा ॥

चाल - इहपर पुण्य फला देई ॥

ध्यात तव चरण , सदा तुज शरण , अनंतज

अजाण दामोदर विनंती भवदु : ख्न हरायाची ॥ आ . ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP