-
पु ; हट्ट ; हेका ; अठ . ' त्याचा अड असा आहे . कीं , बोलाचाली झाली नसतां आधीं कोकटनुरांत व तेलसिंग्याचें ठाण्यांत आपले लोक आधी घ्यावे , मग बोलाचाली करणें ती करावी .' - पेद ११ . १२ . ( का . अटट )
-
स्त्री.
-
अ. कमीपणा , उणेपणा , दुय्यमपणा , न्यूनता , गौणता दर्शविणारें उपपद . हें लागून कित्येक सामासिक शब्द बनतात ; जसें अडघोडा , अडधोतर ; अडलंड , अडसर . इ० . अडच्या ऐवजीं कधींकधीं आड असें रुप येतें सामान्यत : देशावरील लोक अड असें योजितात ; कोंकणांत आड असें वापरतात तेव्हां अड आणि आड यांनीं आरंभ होणारे शब्द एकमेकांत घुसडले जातात . त्याकरिता इष्ट शब्द एकाखालीं नसल्यास दुसर्याखालीं सांपडेल . सूचना :- संकृत अर्ध या शब्दापासून बनलेले व कानडी अड्ड ( = अडवा , हट्ट ; दुराग्रह ) या शब्दापासून बनलेले सामासिक शब्द यांचा घोंटाळा होऊं देऊं नये , म्हणून प्रथम अड - अर्ध पासून संभवलेले शब्द दिलेले आहेत ; नंतर कानडी अड्ड पासून साधलेले शब्द घेतले आहेत . कांहीं शब्द या दोन्ही वर्गांतहि पडतील ; पण ते कोंठेंतरी एका ठिकाणीं दिले आहेत . ज्यांचा संबंध या दोहों अडनीं नाहीं किंवा जे महत्त्वाचे वाटले , ते स्वतंत्रच दिले आहेत . [ सं . अर्ध ; प्रा . अड्ढ ].
-
आड, आडवें पहा.
Site Search
Input language: