-
पु. १ धुंडाळणे ; हुडकणें ; पहाणें . २ चौकशी ; तपास ; विचारपूस . ३ परिक्षा ; निरीक्षण ; बारकाईनें पहाणें . ४ चौकशी ; तपास वगैरेचा निकाल , फळ , परिणाम ; निरीक्षणापासून बनलेला निश्चय . ५ चुकीची दुरुस्ती ; गाळलेला मजकूर घालून केलेली शुद्धि ; गळलेला अगर चुकीचा शब्द सुधारून समासांत लिहिण्याची क्रिया . कोठे कांही कोठें कांही । शोध ठायी स्थळासीं । - तुगा २६२० . ६ शुद्ध करणें ; स्वच्छ करणेंल दुरुस्त करणें वगैरे . शोधन पहा . [ सं . शुध् = शोधण , शुद्ध करणें ] शोध ठेवणें - लक्ष्य ठेवणें , चौकशी करणें , तपास करणें ; विचारपूस करणें ; नजर ठेवणें . शोधक - वि . १ चौकस ; शोधणारा ; हुडकणारा ; धुंडाळणारा . २ तपास , चौकशी करणारा . जे यावाचूनि शोधक आन नसे । - ज्ञा १८ . १३८ . ४ ( गणित ) बाद करावयाचा ऋण ( अंक ). शोधणूक - स्त्री . शोध ; तपास ; परीक्षा . शोधणें - उक्रि . १ धुंडाळणे ; हुडकणें ; शोध करणें . मग तळवे तळहाती शोधी । - ज्ञा ६ . २३२ . २ चौकशी , तपास करणें ; निरीक्षण करणें ; परिक्षा करणें जाणोनि शोधावी चित्रे - दा । ११ . १० . २२ . ३ शुद्ध करणें ; निर्मल करणे . तुझ्या बहुत शोथिले अघनिधि ... । - केका ३ . ४ दुरुस्त करणें ; चुका काढून टाकणें ; निर्दोष करणें . शोधन - न . १ शुद्धि ; स्वच्छ , शुद्ध , पवित्र , निर्मल करणें . २ ( गणित ) वजाबाकी . ३ ऋणादान ; कर्जफेड . ४ जखम धुण्याची क्रिया . शोधनीय - वि . शुद्ध करावयाचा ; पवित्र करावयाजोगा . शोधनपत्रक - न . शुद्धिपत्र ; ग्रंथांतील शुद्धाशुद्ध दाखविणारे पृष्ठ . शोधामणी - स्त्री . ( बडोदे ) १ कागदपत्र वगैरे शोधण्याची क्रिया . २ पूर्वीचे कागदपत्र शोधण्याकरितां द्यावा लागणारा पैसा , शुल्क ; फी . नकला मागण्याचे अर्जाबरोबर येणारी शोधामणी ... - कलावंतखाते नियम . शोधारणें - सक्रि . शुद्ध करणें पाठी सात्विकेधीरेंतेणें । शोधारली तिथें करणें । - ज्ञा १८ . १०१८ . शोधित , शोधीव - वि . शुद्ध , स्वच्छ केलेले . आतां जे कां अनायिक । शोधितसत्त्वाचे सात्त्विक । - एभा ३ . ३३० .
-
ना. चौकशी , तपास , विचारपूस ;
-
ना. बारकाईने पाहणे , निरीक्षण ;
-
m Search; inquiry. Cleansing. Scrutiny.
Site Search
Input language: