-
पु. १ प्रांत ; प्रदेश ; भाषाभेदाने भिन्न झालेला प्रांत . देशासारखा वेष . २ जागा ; स्थान . वृक्षाचे मूळदेशी सेचन केले म्हणजे अग्रदेशीहि टवटवी येते . ३ योग्य स्थान ; सभोवतीची परिस्थिति , भूमि . देश , काल पाहून काम करावे . ४ सह्याद्री , बालाघाट , कर्नाटक व गोदावरी नदी यांमधील देश . ५ ( ज्योतिष ) औरस चौरस १०० योजने यांनी व्याप्त असणारा भूभाग . ६ परिसीमायुक्त भूमिभाग . जसे - देश ( महाराष्ट्र , कर्नाटक देश इ० ); प्रांत ( पुणे , वाई प्रांत इ० ). या खेरीज सुभा , परगणा , तालुका , जिल्हा , महाल , कसबा , पेटा , पुठा , मौजा , संमत , तरफ , टप्पा , मजरा , मुजरी इ० आणखीहि भूमिभाग आहेत . यांची माहिती त्या त्या शब्दाखाली पहाणे . [ सं . दिश = दाखविणे . तुल०झें . दिश ; ग्री . देइकनुमि ; लॅ . दिकेरे ; गॉ . तैहन ; प्रा . ज . झीगऑन ; लिथु . झेन्क्लास = खूण ; आर्मे . लेशी ; लेशवाव ( गांव ) ] ( वाप्र . )

०घेणे आपला देश घेणे - आपल्या स्वतःच्या कामांत लक्ष घालणे . देशाचा पाटावरवंटा होणे - बेचिराख , ओसाड करणे . देशी जाणे - स्वदेशास जाणे . ( सामाशब्द )

Site Search
Input language: