-
पु. १ कल ; ओळंब्यांतून एकीकडे कलणें ; झुकणें ; तोल ( क्रि० जाणें ). डोंगरावरून उतरतांना झोक गेला तर रसातळाला जाण्याची भीति . २ ( ल . ) वळण ; रोंख ; कल ; दिशा ; मोडणी ; रीत ; चाल ; वृत्ति ( सैन्य कूच करतांना , स्वभावाची , भाषणाची इ० ). वामनरावांचे बोलण्याचा झोक माझे लक्षांत आला . ३ वार्याचा मोठा झोत ; वादळाचा तडाखा , झटका . ४ झपाटा ( वस्त्राच्या पदराचा ). ५ ( ल . ) भाषणाचा प्रवाह , वेग . कोणी कसाहि शब्द सांगितला तरी हा बोलण्याचे झोंकाखालीं नेतो . श्लोक वाचण्याचा झोंक थांबवून अर्थाकडे धांवावें लागतें . - विवि ८ . ७ . १२४ . ६ प्रवृत्ति ; तालमान ; रीत . देशा - काळाचा झोंक पाहून वागावें . [ हिं . झुकणें झोक ]
-
m Inclination, leaning over. Direction, bent, bearing, tendency. An air or affected manner. A forceful sweep.
-
. Ex. कोण्हीं कसाही शब्द सांगितला हा बोलण्याच्या झोंका- खाली नेतो. देशाकाळाचा झोंक पाहून वागावें We should conform ourselves to the requirement of time, place, and circumstances.
-
०चिट्टी चिठ्ठी - स्त्री . १ एखाद्यानें , एखाद्यास , एखाद्यावर काम न होण्याजोगी दिलेली चिठ्ठी ; रोखा , करारपत्र ( ज्यामुळें ती घेणाराची निराशा होईल असें ). २ ( ल . ) व्यर्थ दिलेला हेलपाटा ; कपटवचन ; खोटी आशा . ( क्रि० देणें ).
Site Search
Input language: