-
क्रि.वि. पु.
- ( बायकी ) एकदाणी ; एकावली ; एक पदरी माळ . एकदाणें पहा . [ सं . ]
- एका ओळींत , रांगेंत , ओघांत ; पळते जाहले एकसरें । - रावि २७ . ९७ .
- ( ल . ) एकदम ; एकवेळीं ; एकाएकीं .
- हांक दिधली महावीरीं । बाण सुटले एकसरी । यादव सैन्याचा महागिरी । शरधारीं झाकोळला । - एरुस्व ८ . ४९ .
- तुटे संशयाचें मूळ । येकसरां । - दा १ . १ . २८ .
- लालसेचेनि भरें । चोरिलीं तिहिं अंतरें । कां जें आपणचि जावें एकसरें । साधेल कृष्ण । - रास १ . १७८ .
-
ēkasara-rā-ṃrī-ṃrēṃ ad In one line or stream. Ex. ए0 सुटले शंभर बाण ॥ Hence, 2 At one time, at once. Ex. तुका म्हणे देह दिल्ह्या ए0 ॥ तयासी दुसरें नाहीं जन्म ॥
-
वि . एकसारखा ; निव्वळ ; निर्भेळ .
- तें ब्राह्मण एकसर साबडें । माणुस नेणें फुडें । - शिशु २०४ .
- होती देहबुद्धी एकसरी । - ज्ञा १० . २१ .
- स्थावरीं बहु भरु । तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया । - ज्ञा १३ . ८१३ .
[ सं . एक + सृ - सर ; प्रा . एक्कसरिअ ; तुल० फा . यक + सर ]
-
क्रि.वि. अकस्मात , अचानक , अवचितपणे , एकदम , एकाएकी .
Site Search
Input language: