-
पु. १ तर्कशास्त्र ; न्यायशास्त्र ; प्रत्यक्ष , अनुमान इ०कांवरुन पदार्थाचा निर्णय समजण्याची विद्या . तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे । - ज्ञा १ . ११ . २ अटकळणे ; अनुमानाने जाणणे ; ताडणे . ३ अनुमान ; सिद्धांत ; अनुमिति ; अनुमान , सिद्धांत . ( क्रि० करणे ; बांधणे ). ४ लक्षणदर्शनावरुन झालेले एखाद्या पदार्थाचे , गोष्टीचे ज्ञान , कल्पना ; अनुमान . अविद्या नाशी तर्का । तैसे होये । - अमृ ६ . ४६ . विचार करुं लागले म्हणजे अनेक प्रकारचे तर्क उत्पन्न होतात . ५ पूर्वलक्षणांवरुन भावी गोष्टीचा केलेला अंदाज , अजमास , अटकळ . हा तर्क करीत बसण्यापासून आपल्याला लाभ नाही . - कोरकि ३०२ . यंदा पर्जन्य चांगला लागला त्यावरुन स्वस्थता होईल असा तर्क दिसतो . ६ अक्कल ; बुद्धि ; मति . त्या शास्त्रांत माझा तर्क चालत नाही . ७ कुतर्क ; कुकल्पना ; मूर्खपणाचा विचार , कल्पना , युक्ति . ८ ( ल . ) खबर ; वर्तमान ; वृत्त . कोठे तरी कृष्ण लपवावा । बाहेर तर्क कळो न द्यावा । - ह ३ . १७२ . [ सं . ] सामाशब्द -
-
वि. ताळतंत्र , मर्यादा ( बोलण्याला काही ताळतंत्र / मर्यादा हवी की नको ). भान , शुद्धी ;
-
वि. आसपास , मागेपुढे ( वीस तारखेच्या सुमारास दिल्लीला असेन );
-
०कौशल्य न. अनुमान , अटकळ , कल्पना करण्याचे चातुर्य , प्रावीण्य ; कल्पनाचातुर्य . [ तर्क + सं . कौशल्य = कुशलता ] गम्य वि . तर्काने जाणतां येणारे ; अनुमेय ; तर्क्य . [ तर्क + सं . गम्य = जाणण्यासारखे ]
Site Search
Input language: