-
पु. ( सोनारी ) अंगठी वगैरेसा वाटोळा आकार द्यावयाचें एक हत्यार ; कण . ( का .)
-
पु. स्त्रिया . लुगडें नेसतांना प्रथम लुगड्याचा वेढां घेतात तो . ( का . कणय = कमरेभोंवती वस्त्राची गांठ )
-
पु. १ पृष्ठवंश ; मानेपासून माकडहाडापर्यंतचा पाठीचा दांडा ; मणक्याची रांग . २ ( ल .) पर्वताची लांबट ओळ . ३ डोंगरा - पर्वतावर चढण्याउतरण्याची पाऊलवाट . ४ दोन्ही बाजूस उतार असलेल्या डोंगराच्या रांगेवरील उंच रस्ता ; दंड , रांग पहा . ५ रांगोळी किंवा पिठानें जमिनीवर , भिंतीवर काढलेला रेघा व आकृती ; गंध , हळदकुंकू यांनी भिंतीवर काढलेली आकृति , ६ रांगोळीची भुकी ; पूड . ७ धान्याची घातलेली लांबट रास , ओळ , रांग , ८ मोटेचा सोंडूर ज्यावरुन ओढला जातो तें लांबट चाक . ९ हातराहाटाचें मधलें लांकूड .' उलट रहाटाच्या कण्याप्रमाणें जागच्या जागीं फिरून फिरुन त्यांची बुद्धि निरुपयोगी होते .' - ब्रवि १६ . १० गाडीच्या चाकाचा आंस . ११ जहाजाचा खालचा भाग ; हा निमुळता व पाठीच्या कण्यासाखा असतो . ' जहाजाचा कणा दगडांत कच्च बसला . ' - मदभं १८९ . ( का . कण = काठी , कणे = उभा किंवा आडवा दांडा , आंस , रूळ ( फिरता ); वै . सं कर्णक = दांडा )
-
m The spine or back-bone. The ridge of a mountain.
Site Search
Input language: