-
पु. १ चालविणे ; कारभार ; संपादणूक ; निवाडा ; निकाल ; व्यवस्था ; तडीस , सिद्धीस नेणे . त्याचा सारा मकाजीने घ्यावा ऐसा निर्वाह केला . - वाडबाबा २ . ४४ . २ वर्तणूक ; रीत ; खरी स्थिति . मग सांगितला निर्वाह । चिंता न करा म्हणतसे । - ब ४६६ . ३ तात्पर्य . हा उपदेशी मुख्य निर्वाहो । - एभा ३ . ३३८ . ४ आश्रय देणे ; पालन करणे ; संरक्षण . ५ भरंवसा . परि इस भगवंती थोर निर्वाह आहे । - सारुह २ . ७६ . ६ पार नेणे ; खरे करुन दाखविणे ( प्रमाण दाखवून भाषण , लेख वगैरे ). मी बोललो , मी लिहिले याचा निर्वाह मला करणे प्राप्त आहे . ७ दूर करणे ; उपद्रव न होईल असे करणे ( भूक , थंडी , पाऊस इ० त अन्न , वस्त्र इ० नी ). ८ निश्चय . तदुपरि मग दोही हाच निर्वाह केला । - सारुह २ . ११३ . ९ कार्यक्षमता . नसे हे निर्वाहे जननि मज सामर्थ्य भजनी । - सारुह २ . २२ . १० धोरण . प्रस्तुत तेणे निर्वाहे । निरुपण आइका । - ज्ञा १८ . ५९ . ११ उदरनिर्वाह ; गुजरा ; योगक्षेम . [ सं . निर + वह ]
-
m Conducting. Supporting. Carrying off.
-
०करणे १ पोट भरणे . २ व्यवस्था करणे ; चालविणे . निर्वाहक वि . व्यवस्थापक ; चालक . २ शेवटास , सिद्धीस नेणारा ; निभाव लागणारा निर्वाहणे उक्रि . १ चालविणे ; व्यवस्था लावणे ; जोपासना करणे . निर्वाहती होय धनंजया । - ज्ञा १७ . ८४ . २ पार नेणे ; दूर करणे . ३ राहणे ; एका स्थितीत असणे . तरी निर्वाहो कां एकसारिखे । - ज्ञा १७ . २५२ . निर्वाह्य वि . चालू ठेवण्यास , पार नेण्यास , निर्वाह करण्यास योग्य , आवश्यक .
-
निर्वाह करणें To manage with; to shift with.
Site Search
Input language: