-
पु. १ लांकडाचा तुकडा ; धलपी ; उघडुन अलग ठेवण्यासाठीं किंवा लावुन घट्ट बसण्यासाठीं दोन वस्तुंत बसविलेला लाकडी तुकडा , पाचर , खुंटा ,; कोयंड्यांत कडी बसविल्यावर घालण्यांत येणारें अडकण ; फिरकीची खीळ ; अडकवण म्हनुन घातलेली चीप ; लांकडी दठ्ट्या ; कठड्याचा लहानसा गज ; चाकाची खीळ . २ दाराचा लहानसा लांकडी अडसर , कुत्रें ३ ( ल .) अडथळा ; अंतर . ' सरळ स्नेहामधेयं पडलि खिटी । ' - प्रला १६७ . ( सं . खिट ) ( कामांत ) ०घालणें - मध्यें अडथळा आडकाठी आणणें .
-
ना. अडकण , अडसर ( दाराला लावायचा ), कडी , खीळ , खुंटा , पाचर , लाकडी दट्ट्या .
-
खिटी घालणें
-
मध्ये अडथळा आणणें
Site Search
Input language: