-
वि. नववा - वे . आठ सगुण ब्रह्म । नवे निर्गुण ब्रह्म । - दा ७ . ३ . ८ . नवा महिन्या तुम्ही देखाल बालासी । - रामदासी २ . १०३ . [ नव = नऊ ]
-
वि. १ नवीन ; नूतन ; अस्तित्वांत येऊन फार दिवस झाले नाहीत असा . २ ( एखाद्या कार्यांत , व्यवहारांत , धंद्यात ) नवशिका ; अनभ्यस्त ; ( नवशिक्या माणसास अनुलक्षून ) अंगवळणी न पडलेले ( त्याचे कार्य ). या कामांत तो नवा आहे आणि हे काम त्यास नवे आहे . ३ उपयोग इ० कानी मलिन , अस्ताव्यस्त , जर्जर , जुना न झालेला . ही शालजोडी नवी आहे . ४ अभूतपूर्व ; अपूर्व ; अपरिचित ; अदृष्टपूर्व . आज नवे झाड पाहिले . आज यांनी नवाच श्लोक म्हटला . ५ न उपभोगिलेला , उपयोगिला गेलेला . ही स्त्री अझून नवी आहे कोणी भोगिली नाही . ६ नुकतीच ज्याने ( कार्याची , कारभाराची ) सूत्रे हातांत घेतली आहेत असा ( कारभारी , त्याचा कारभार ) - शास्त्रीको . ७ . तरुण . नव पहा . [ सं . नव ; प्रा . नवओ ; सिं . नओ ; हिं . नया ; फ्रें . जि . नेवो ] ( वाप्र . )
-
०जुना - जुना बदलून नवा घेणे , करणे ( करारनामा , हिशेब , करार , अंमलदार इ० ).
-
करणे - जुना बदलून नवा घेणे , करणे ( करारनामा , हिशेब , करार , अंमलदार इ० ).
Site Search
Input language: