-
पु. १ ताठरपणा ; न वांकणे किंवा वळणे ; लवचीकपणाचा अभाव . २ ( अतिश्रमामुळे , बराच वेळ बसून राहिल्यामुळे शरीर इ० कांस आलेला ) ताठपणा ; जाड्य . ३ ( ताजवा इ० कांचे ) वजनांतील विचलन ; अशुद्धता ; तंतोतंतपणाचा अभाव . ( क्रि० होणे ; देणे ). ह्या ताजव्यला ताठ इतका आहे की एक गुंज टाकली तरी कांटा बराबर ४ गर्व ; दिमाख ; ताठा . - वि . १ ( शब्दशः व ल . ) न वांकणारा ; न लवणारा ; कडक ; न नमणारा ; ताठर . ना तो संशृतीसि ताठ । वज्रलेप । - ऋ ११ . २ न बदलणारा ; आपले धोरण न सोडणारा ; अचंचल ; निश्चयी ; करारी . ३ घट्ट ; अंगास चांगले बसणारे ; सैल , लहान न होणारे ( वस्त्र , अंगरखा ). ४ ताणलेला ; ताणून लांब केलेला ( दोर इ० ). ५ तारवट ; ताठरलेला ; ओढलेला ( डोळा इ० ). ६ धष्टपुष्ट ; धट्टकट्टा ; मजबूत बांध्याचा . ७ पुरेपूर ; भरपूर ; तब्बल ; पुरता . येथून तो गांव कोसभर आहे . तो ताठ सहा फूट उंच आहे . ८ ठसठसीत ; भरदार ; घसघसीत ( रोप , ऊंस , धान्य इ० ). ९ अविनयी ; गर्विष्ठ . [ सं . दृढ - तट्ठ - ताठ - भाअ १८३२ .; तुल० सं . तटस्थ . ]
-
०वडा पु. १ गुर्मी ; मगरुरी . २ दिमाख ; ताठपणा . उर उघडा घडोघडी करुन कुच , दाखविता तुज ताठवडा । - प्रला १६२ . [ ताठ + वट - ड प्रत्यय ]
-
वि. करारी , न वाकणारा , निश्चयी , मानी , सरळ ;
-
वि. कठीन , कडक , ताठर , ताणलेला .
Site Search
Input language: