-
वि. सोळा ( संख्या ). [ सं . ]
-
०पदार्थ पु. अव . ( तर्कशास्त्र ) या शास्त्रांतील १६ विभागः - प्रमाण , प्रमेय , संशय , प्रयोजन , दृष्टांत , सिध्दांत , अवयव , तर्क , निर्णय , वाद , जल्प , वितंडा , हेत्वाभास , छल , जाति , निग्रहस्थान . कांहींच्या मतें सोळांच्या ऐवजीं सात विभाग आहेत ; त्यांना सप्तपदार्थवादवादी म्हणतात . व वरच्यांना षोडशपदार्थवाद - वादी म्हणतात .
-
०महादानें न. अव . सोळा प्रकारचीं मोठमोठीं दानें . १ तुला पुरुष ( हा शब्द पहा ). २ हिरण्यगर्भ - ब्रह्मदेवाची सोन्याचीं प्रतिमा . ३ ब्रह्मांड = सोन्याचा पृथ्वीचा गोल . ४ कल्पवृक्ष , या झाडाची प्रतिमा . ५ गोसहस्त्र = हजार गाईचें दान . ६ हिरण्य कामधेनु = कामधेनूची सोन्याची मूर्ति . ७ हिरण्याश्व = सोनेरी घोडा . ८ हिरण्याश्वरथ = सोनेरी रथ व घोडा . ९ पंचलांगलक = पांच नांगरांचें दान . १० धरा = जमीन इनाम देणें ( जमीन विकत घेण्यास पैका देणें ). ११ विश्वचक्र = एकाच्या बाहेर एक अशा सोळा फेर्यांचें एक सोनेरी चक्र . १२ कल्पलता = एक सोनेरी वेल . १३ सप्तसागर = या सात समुद्रांचे प्रतिनिधी म्हणून दूध , दहि , मध , तूप ० देणें . १४ रत्नधेनु = रत्नांची बनविलेली गाय . १५ महाभूतघट = महादेव किंवा विष्णू यांच्या नांवानें द्यावयाची सोन्याची घागर . १६ ( काम ) धेनु .
-
a Sixteen.
Site Search
Input language: