-
पु. १ प्रतिबंध अटकाव ; कैद ; अडथळा . बेझंटबाईंचा निरोध करुन ... स्वराज्याच्या चळवळीस धोका आणण्यांत शहाणपण कोणता ? - टि ३ . ३४१ . १ नियमन ; संयमन ; बंधन ; प्रतिकार . [ सं . ] निरोधक - वि . १ दाब , आटोका , ताबा , बंधन इ० त ठेवणार ; दमन करणारा . २ अटक , प्रतिकार करणारा ; अडथळा आणणारा . निरोधणे - सक्रि . १ निग्रह , दमन , संयमन करणे . परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनि । - ज्ञा ३ . ६४ . २ बंधन , ताबा इ० मध्ये ठेवणे ; अटकाव ; हरकत करणे . ३ रुद्ध करणे ; आडवणे ; रोखणे . - एभा ६ . ३२२ . वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि । - तुगा १४ . निरोधन - न . १ निग्रह ; दमन ; दाब ; बंधन . २ अटकाव ; प्रतिकार ; अडथळा . ( इं . ) पिकेटिंग . विदेशी कापड विकण्याबद्दल अहमदाबाद स्वयंसेवकांनी निरोधन करुन अन्नत्याग केला . - के २ . १२ . ३० .
-
ना. अटकाव , अडथळा , अडसर , आडकाठी , प्रतिबंधन , मनाई , मनाव , हरकत ;
-
ना. नियमन , बंधन संयमन .
-
m निरोधन
Site Search
Input language: