|
वनश्रीचे वर्गीकरण एखाद्या प्रदेशातील संपूर्ण वनस्पति समुदायांचे (किंवा पादपरुप आच्छादनाचे) लहानमोठे गट करण्याची प्रक्रिया (पद्धती). यामध्ये समावास, संगति, संघात, कृत्तक, संहति, समूह इत्यादी विशिष्ट गटांचे सामान्य स्वरुप, संरचना, विकासाची पातळी, अनुक्रमणाची अवस्था, स्थिरता, स्थलविविधता इत्यादी बाबींना प्राधान्य असते व त्यावरुन समुदायांचे प्रकार व त्यातील दर्जा निश्चित करतात. association formation society.
|