-
वि. १ क्रमाने दुसरा . एक्या पदे भूमि भरुनि थोडी । पाये दुज्या अंडकटाह फोडी । - वामन , वानचरित्र १ . ३१ . २ आणखी ; आणीक ; दुसरा ; अन्य ; इतर . मरे येक त्याचा दुजा शोक वाहे । - राम १६ . येक्या ग्रंथे निश्चय केला । तो दुजयाने उडविला । - दा ७ . ९ . ४ . ३ भिन्न ; वेगळा ; निराळा ; परका . मला तुम्ही दुजा मानूं नका . त्यजि असू तो गमला दुजा न देहे । - मोरा पुष्पिताग्रा श्रीरामायण कल्पलता १५ . १ . ३६६ . [ दु = दोन + जा प्रत्यय ? ]
-
०भाव पु. १ मनाचा दुटप्पीपणा ; आंत एक बाहेर एक अशी वृत्ति . २ मीतूंपणा ; भेदबुद्धि ; हा माझा , हा परका असे लेखण्याचा स्वभाव , वृत्ति ; परकेपणाची भावना ; आपपरभाव . ३ मतभिन्नता ; मतभेद ; कल्पनेत , समजुतीत फरक , अंतर . [ दुजा + भाव ]
-
a Another, a second. Other, more.
-
dujā a Another, a second. 2 Other, more, some besides. 3 Different or diverse.
Site Search
Input language: