-
सना . जो याचें स्त्रीलिंगी एक वचनी रूप .
-
ind A particle of respect in compellation, corresponding to Sir! A particle expressing assent from an inferior. It is an affix to proper names. Ex. बाळाजी, आप्पाजी pro. Who or which. (Relating to a feminine antecedent.)
-
१ नांवाच्या पुढें आदरार्थीं , बहुमानार्थीं लावावयाचा प्रत्यय . जसें - गणपतरावजी ; हनुमानजी ; रामचंद्रजी ; साहेबजी ; २ हांक मारतांना विशेष परिचयदर्शक असा योजावयाचा प्रत्यय . अरे खंडूजी ३ प्रश्नार्थक संबोधन ( यांत उत्तर गृहीतच असतें ). तिला स्वशिशुवंचनें अदयता शिवे काय जी ! - केका १०६ . ४ महाराज ; सरकार , स्वामी याप्रमाणें विनयार्थी संबोधन . ॐ नमो जी ! आद्या । - ज्ञा १ . १ . ५ मान्यता , होकार दर्शविण्यासाठीं हो ! आज्ञा ! या अर्थाचा सेवकानें योजावयाचा शब्द . अरे हें काम करशील ? जी महाराज . ६ व्यक्तीच्या विशेषनामास लाववयाचा सन्मानार्थीं प्रत्यय . उदा० अपाजी , रघूजी , संभाजी इ० ; ब्राह्मणांत पंत किंवा वडिलाचें नांव जोडावयापूर्वी योजितात . जसें - कृष्णाजीपंत , बाळाजी विश्वनाथ . [ सं . जयिन ; प्रा . जइ ] जीजी करणें , जी म्हणणें - हांजीहांजी करणें ; खुषमस्करी करणें .
-
उद्गा . पोवाडा , लावणी यांच्या कडव्यांच्या शेवटीं साथ करतांना उच्चारावयाचा शब्द . [ घ्व ]
Site Search
Input language: