Dictionaries | References

२५

   { पंचवीस }
Script: Devanagari

२५     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पचीस, पचीस

२५     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पंचवीस, पंचवीस, पंचवीस

२५     

Sanket Kosh | Marathi  Marathi
पंचवीस तत्त्वें काव्याचीं   
९ नवरस (नवाचेअ अंकीं) व १६ अंगें मिळून पंचवीस तत्त्वें - १ ललित्य, २ अर्थ, ३ गौरव, ४ साहित्य, ५ संगीत, ६ श्रृंगार, ७ टेव (रचना), ८ पद, ९ सिद्धांत, १० भाव, ११ ह्ष्टांत, १२ न्याय, १३ वर्णक, १४ उपमा, १५ श्लेष, आणि १६ समयोचित प्रकरण.
"जे नवरस आणि सोळा आंगें ; ते काव्य महापवित्र सांगें ॥ (गोपाळकविकृत रूक्मिणी स्वयंवर)
पंचवीस तत्त्वें (सांख्यशास्त्र)   
१ प्रकृति, २ पुरुष, ३ बुद्धि, किंवा महत्तत्त्व, ४ अहंकार, ५ मन, ६ ते १० पंच ज्ञानेंद्रियें, ११ ते १५ पंच कर्मेंद्रियें, १६ ते २० पंच तन्मात्रें म्हणजे पंचमहाभूतांचे सूक्ष्म अंश, उदा - १ शब्दतन्मात्रा, २ स्पर्शतन्मात्रा, ३ रूपतन्मात्रा, ४ रसतन्मात्रां, आणि ५ गंधतन्मात्रा व २१ ते २५ पंचमहाभूतें, या पंचवीस तत्त्वांवर सृष्टीची उभारणी आहे, असें सांख्याशास्त्र मानतें, सांख्य शब्दाचे दोन अर्थ आहेत - एक ज्ञान अथवा तत्त्वज्ञान.
विशेषेंकरून कपिलमुनींनी प्रतिपादिलेलें दर्शन असा बोध होतो. सांख्य शास्त्रांत सृष्टीची उभारणी पंचवीस तत्त्वांवर झाली असल्यामुळें व इतर अनेक प्रकारांतहि विवक्षित संख्या निर्दिष्ट केली असल्यामुळें सांख्या म्हणजे मोजणारें शास्त्र असाहि दुसरा अर्थ आहे. या पंचवीस तत्त्वाच्या पलीकडला जो सविसावा तो वेदान्तप्रतिपादित परमात्मा. या पंचवीस तत्त्वाचें ज्ञान होईल त्या पुरुषाला तो ब्रह्मचारी, गृहस्थ वा संन्यासी असो तो सर्व दुःखापासून मुक्त झाल्याशिवाय रहात नाहीं. असें सांख्यशास्त्र मानते.
पंचविंशतितत्त्वज्ञो यत्र तत्राश्रमे वसन् ।
जटी मुण्डी शिखी वापि मुच्य्ते नात्र संसयः ॥ (सां. का. गौडपादभाष्य)
पंचवीस तत्त्वें (स्थूल शरीराचीं)   
१ अस्थि, २ मांस, ३ त्वचा, ४ नाडी, ५ केंस (पृथ्वीचे गुणधर्म), ६ लाळ, ७ मूत्र, ८ रक्त, ९ रेत आणि १० स्वेद ([आप]), ११ क्षुधा, १२ तृषा, १३ आलस्य, १४ निद्रा, १५ मैथुन (तेज), १६ चलन, १७ वलन, १८ निरोधन, १९ प्रसरण, २० आकुंचन ([वायु]) २१ काम, २२ क्रोध, २३ लोभ, २४ मोह आणि २५ भय (आकाश गुण) ([दासबोध १७-८])
पंचवीस दोष (गायकाचे)   
१ दांत चावूण गाणें, २ ओरडून गाण्याचा विरम करणें, ३ सू सू असा आवाज निघणें, ४ भीत भीत गाणें, ५ गडब्डीनें गाणें, ६ कंपयुक्त, ७ तोंड वंडेंवाकडें करणें, ८ बेसूर, ९ कर्कश, १० बेताल, ११ मान उंच करून गाणें, १२ बकर्‍याप्रमाणें तोंड करून गाणें, १३ चेहरा फुगवणें, १४ मान वांदडी करणें, १५ तुंब्याप्रमाणें तोंड फुगवून गाणें, १६ हात व पाय आपटणें, १७ डोळे मिचकावून गाणें, १८ रसहीन, १९ रागांत न लागणारे स्वर लावून गाणें, २० स्वर आणि वर्ण यांचा उच्चार बरोबर न करणें, २१ स्वरांच्या योग्य जागीं आवाज लागत नाहीं असे, २२ नियमाप्रमाणें न गाणें, २३ एका रागांत अनेक अयोग्य राग मिश्रण करून गाणें, २४ वेफिकीर गाणें व २५ नाकांतून आवाज काढून गाणें.
मिश्रकोऽनवधानश्च तथाऽन्यःसानुनासिकः।
पंचविंशतिरित्येते गायका निन्दिता मताः ॥ ([संगीतरत्नाकर])
पंचवीस वाद   
१ अद्वैतबाद, २ द्वैतवाद, ३ विशिष्टाद्वैतवाद, ४ कर्मवाद, ५ कालवाद, ६ ईश्वरवाद, ७ योगवाद, ८ सांख्यावाद, ९ ब्रह्मवाद - शुद्धाद्वैतवाद, १० निराकारवाद, ११ अंहब्रह्मवाद, १२ वायुवाद, (दरवेश), १३ पृथ्वीवाद ([योगी]), १४ चंद्रमुक्त स्वयं - शिलावाद (जैनी), १५ महादाकाशवाद (जंग,), १६ पौराणिक स्वर्गवाद, १७ ज्ञानस्वरोदयवाद, १८ शब्दवाद, १९ ज्योतिषवाद, २० नास्तिकवाद, २१ शून्यवाद (बौद्ध), २२ वीर्यवाद (नास्तिकविषयी) २३ देहवाद - भौतिकवादी पाश्चात्त्य, २४ भक्तिवाद, आणि २५ (मुस्लीम).
असे अघ्यात्मांत पंचवीसवाद वा मतमतांतरें आहेत. ([पंचग्रंथी])
वेताळ पंचविशी   
एक कथासंग्रह. यांत वेताळानें सांगितलेल्या लोकप्रिय अद‌भुत अशा पंचवीस कथा आहेत. म्हणून यास वेताळपंचविशी म्हणतात. हा ग्रंथ जंभलदत्तकृत असून तो सोळाव्या शतकांत होऊन गेला असें म्हणतात.

२५     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : पच्चीस

Related Words

२५   २५ तारीख   25   xxv   twenty-five   सरिकत   काठाडी   ईश्वरप्रणतिता   मुढ्ढ्याचा हात   अंधारु   घरके जोगी जोगडा, बाहेरके जोगी सिद्ध   सिंप   सिंपला   आतित्य   झिडकझिडकुं   चिच्या   चित्रकलालेखन   चिनगी   ठेवणा   ठेवणाईत   उमाटा   ऊपाळणें   बौद्धिक गोत   नबेदा   विजयाख्य   शोभा होणें   संग्रही असणें राहणें   वताळणे   वसूयव   chamaeophyte   जीऊ   ज्याचें पोट दुखतें तो ओंवा मागतो   झांबवला   अजिसबब   अडवेल   खिस्मस   खुर्दसाल   जमोनीस   जहांदीद   चब   तनहा   तन्हा   तशफ्फी   तीए   कायाकुरवंडी   उरवठ्यास पुरवठा उरोट्याला पुरोटा   इग्लाई   एकतुका   कंपरेदार दगड   कुइजट   बिछाद   दशदार   दुघडपण   दुहुळा   भांडी   मांगानीज   मुसाइबत   थबाबणे   नौखंडा   खटमार   परवर्दा   पैठा करणें   पोख्तकार   सडिव   सनीध   समळ   संताई   संसार मातींत जाणें   (वर) तलवार धरणें   वळिवट   वोराड   जीवाभ्य   खल्लारी माता   दील   गुंजासी   आमलाफै ला   आरुच   आरूच   ज्युबिलो   खाइर   चबाबणें   झुपकी   अपजाल   उन्हारी   उखरें   अवयोग   एकयेकमेळ   बारडी   बालदस्त   दिल कच्चा होणें   मर्गज   दगडाची साल काढणें   नवाजिक   दौरेश्रुत   नाताळे   नाथाळे   नित्यकृत   नेमिकृष्ण   कैसेन   कैसेनी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP