Dictionaries | References

१६

   { सोळा, षोडश }
Script: Devanagari

१६     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सोलह, सोलह

१६     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सोळा, सोळा

१६     

Sanket Kosh | Marathi  Marathi
षोडशाक्षरी मंत्रः   
(अ)"हरेराम हरेराम रामराम हरेहरे।"
(आ)"हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरेहरे।"इति षोडशकं नाम्नां कलिकत्मषनाशनम् ॥
या मंत्राच्या जपानें सर्व पापांचा नाश होतो असें कलियुगांतील महान् साधन म्हणून हिरण्यागर्मानें नारदास उपदेशिलें आहे. (कलि - संतरणोपनिषद् ‌).
षोडशोषचार (पूजेचे)   
१ आवाहन, २ आसन, ३ पाद्य, ४ अर्व्य, ५ आचमन, ६ स्नान, ७ वस्त्र, ८ यज्ञोपवीत, ९ गंध, १० पुष्प, ११ धूव, १२ दीप, १३ नैवेद्य, १४ नमस्कार, १५ प्रदक्षिणा व १६ मंत्र - पुष्प (पूजेचे मंत्र)"समर्पण."(मेरूतंत्र प्रकाश ११)
षोडशावतार श्रीदत्तात्रयारे   
१ योगिराज, २ अत्रिवरद, ३ द्त्तात्रेय, ४ कालग्निशमन, ५ योगीजन वल्लभ, ६ लीला विश्वंमर, ७ सिद्धराज, ८ ज्ञानसागर, ९ विश्वंमर, १० मायामुक्त, ११ मायायुक्त, १२ आदिगुरु, १३ शिवरूप. १४ देवदेव, १५ दिगंबर आणि १६ कृष्णश्याम कमलनयन (माऊली विशेषांक १९६०)
षोडशकला (चंद्राच्या)   
(अ)१ शंखिनी, २ पदि‌‍मनी, ३ लक्ष्मणी, ४ कामिनी, ५ पोषिणी, ६ पुष्टिवर्धनी, ७ आल्हादिनी, ८ अश्वपदिनी, ९ व्यापिनी, १० प्रयोदिनी, ११ मोहिनी, १२ प्रभा, १३ क्षीरवर्धनी, १४ वेधवर्धनी, १५ विकाशिनी, व १६ शौमिनी ([क. क.]);
(आ) १ अमृता, २ मानदा, ३ पूषा, ४ तुष्टि, ५ पुष्टि ६ रति, ७ धृति, ८ शशिनी, ९ चंद्रिका, १० कांति, ११ ज्योत्स्ना, १२ श्री, १३ प्रीति, १४ अंगदा, १५ पूर्णा आणि १६ पूर्णामृता.
अमृता मानदा पूषा तुष्टिः पुष्टि रतिर्घृतिः।
शशिनी चंद्रिका कांतिर्ज्योत्स्ना श्रीः प्रीतिरेव च।
अंगदा च तथा पूर्णाऽमृता षोडश वै कलाः।
अशा चंद्राच्या सोळा कला असून सतरावी अमृतकळा म्हणून मानिलि आहे.
ऐशा तुझ्या षोडशकला। सत्रावी बोलिजे अमृतकळा ॥ ([काशीखंड - १७. १९])
षोडश दर्शनें (तत्त्वज्ञानविषयक)   
१ चार्वाक, २ बौद्ध (माध्यमिक, योगाचार, सौत्रान्तिक व वैमाषिक या चार पोटमेदासह) ३ जैन किंवा आर्हत, ४ रामानुज, (विशिष्टाद्धैतवादी), ५ माध्व किंवा पूर्णप्रज्ञ (द्वैतवादी), ६ नकुलीश पाशुपत, ७ शैव, ८ प्रत्यमिज्ञा, ९ रसेश्वर, १० औलुक्य किंवा काणाद अथवा वैशेषिक, ११ अक्षपाद किंवा गौतम अथवा न्याय, १२ जैमिनी किंवा पूर्वमीमांसा, १३ पाणिनीय - व्याकरण दर्शन, १४ सांख्य किंवा कापिल, १५ पातंजल किंवा योग आणि १६ शाङ्रकर किंवा अद्वैत.
निरनिराळ्या आस्तिक आणि नास्तिक तत्त्वज्ञान विषयक विचारांचे हे सोळा दर्शन ग्रंथ होत. (सर्वदर्शनसंग्रह)
सोळा अंगें अथवा मूलाधार (हिंदु संस्कृतीचे)   
१ सदाचार, २ अद्विचार, ३ वर्णाश्रचधर्म, ४ सतीत्व प्राधान्य, ५ आश्रच धर्म, ६ दैवावर विश्वास, ७ परमेश्वरी अवतारावर विश्वास, ८ योग आणि भक्तिमूलक उपासना, ९ मूर्तिपूजा, १० शुद्धाशुद्ध विवेक, ११ यज्ञ, १२ वेद, स्मृति पुराणें यांवर विश्वास, १३ कर्मव संस्कार यांवर निष्ठा, १४ पुनर्जन्म, १५ सगुण व निर्गुण उपासना आणि १६ जीवाला कैवल्य प्राप्ति. ([कल्याण हिंदु सं. अंक])
सोळा अंगें मंत्रयोगाचीं   
१ भक्ति, २ शुद्धि, ३ आसन, ४ पंचांग सेवन (१ उपास्य देवतेची गीता, २ सहस्त्रनाम, ३ स्तव, ४ कवच व ५ ह्रदय) ५ आचार, ६ धारणा, ७ दिव्यदेश सेवन, ८ प्राणक्रिया, ९ मुद्रा, १० तर्पण, ११ हवन, १२ बलि, १३ याग, १४ जप, १५ ध्यान व १६ समाधि, (शक्तिपात रहस्य)
"प्राणक्रिया तथा मुद्रा तर्पणं हवनं बलिः।
योगो जपस्तथा ध्यानं समाधिश्चेति षोडशः ॥"([योगशास्त्र])
सोळा आणे   
सोळा आण्यांचा एक बंदा रुपया होतो. तसें कोणतेंहि काम संपूर्णपणें पूर्ण झाल्यावर उत्तम या अर्थी 'सोळा आणे' असा संकेत मानला जातो. आतां दशमानपद्धति रूढ करण्यांत आल्यामुळें आणा हें नाणें व्यवहारबाह्म झालें आहे.
सोळा आधारस्थानें (मानवी शरीरांतील जीवनकार्य चालविणारी)   
१ पादांगुष्ठाधार, २ मूलाधार, ३ गुदाधारा, ४ मेंढ्राधार ५ उड्डियानाधार, ६ नाभ्याधार, ७ ह्रदयाधार, ८ कंठाधार, ९ घंटिकाधार, १० तत्त्वाधार, ११ जिह्लामूलाधार, १२ ऊर्ध्व दंतमूलाधार १३ नासाग्राधार, १४ भ्रूमध्याधार, १५ ललाटाधार व १६ ब्रह्मरंघ्राधार.
षट् चक्रं षोडशाधारं द्विकल्पं योगपञ्चकम् .
स्वदेहे ये न जानन्ति कथं सिध्यन्ति योगिनः ॥ (गोरक्षशतक)
सोळा आश्चर्यें (गीतेंतील)   
१ अनंत अर्थ, २ संज्ञा, क्रिया, सर्वनाम आणि अव्यय याचें आधिक्य, ३ मंत्रोद्धार, ४ कोटयवधि सूक्तें, ५ सर्व धातूंची प्राप्ति, ६ सूत्ररूप लिखाण, ७ सुलभता, ८ स्पष्ट शब्दांत नामोच्चार, ९ अर्थचमत्कार, १० वर्ण्य विषयाची इतर ग्रंथांशीं साम्यता, ११ सर्व शब्दशास्त्रांची उपपत्ति, १२ सर्व शास्त्रज्ञांची एकवाक्यता, १३ सर्व तत्त्वेत्त्यांची निष्ठ, १४ गूढार्थ, १५ दुर्जनांना अगग्य आणि १६ सर्व वर्णो - च्चारांचा समावेश, ([कल्याण - श्रीमद्भगवद्नीतांक])
सोळा आयुर्येद (प्राचीन) ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ अनुक्रमें   
१ धन्वन्तरि - चिकित्सातत्त्वविज्ञान, २ दिवोदास - चिकित्सादर्पण, ३ काशीराज - दिव्यचिकित्साकौमदी, ४-५ दोघे अश्चिनी कुमार - चिकित्सासारतन्त्र, ६ नकुल - वैद्यकसर्वस्व, ७ सहदेव - व्याधिसिंविमर्दन, ८ यमराज - ज्ञानार्णव, ९ च्यवन - जीवदान, १० जनक - वैद्यसंदेहभंजन, ११ बुध - सर्वसार, १२ जाबाल - तन्त्रसार, १३ जाजलि - वेदाङ्‌‍गसार, १४ पैल - निदानतन्त्र, १५ करथ - सर्वधरतन्त्र आणि १६ अगस्ति - द्वैधनिर्णयतन्त्र.
धन्वन्तरिर्दिवोदासः काशीराजोऽश्विनीसुतौ।
नकुलः सहदेवोऽर्किश्चवनो जनको बुधः ॥
जाबालो जाजलिः पैलः करथोऽगस्त्य एव च।
एते वेदाङ्र्वेदज्ञाः षोडश व्याधिनाशकाः ॥ ([ब्रह्मवैवर्त, ब्रह्मखंड अ. १६])
सोळा कला व त्यांच्या नियामक सोळा देवता   
१ प्राण - वायु, २ श्रद्ध - भारती, ३ आकाश - गणेश, ४ वायु - प्रवाह वायु, ५ अग्नि - अग्नि, ६ जल - वरून, ७ पृथिवी - शनैश्वर, ८ इंद्रिय - सूर्यादिदेवता, ९ मना - रुद्र अथवा अनिरुद्ध, १० अन्न - सोम, ११ वीर्य - वरुण, १२ तप - पावक, १३ मंत्र - स्वाहा, १४ कर्म - पुष्कर, १५ लोक - पर्जन्य व १६ नाम - उषा,
"परिद्रष्टुः इमाः कलाः पुरुषायणाः पुरुषं प्राप्यास्तं गच्छन्ति"([प्रश्नोपनिषद])
सोळा कला पुरुषाच्या (वेदान्तशास्त्र)   
१ प्राण, २ श्रद्धा, ३ आकाश, ४ वायु, ५ तेज, ६ आप, ७ पृथ्वी, ८ इंद्रियें, ९ मन, १० अन्न ११ वीर्य, १२ तप, १३ मंत्र, १४ कर्म, १५ लोक व १६ नाम - अशा सोळा तत्त्वांनीं पुरुष व्याप्त असतो. ([म. भा. शांति. अ. ३३०१])
सोळा कामधेनु   
१ सुमना, २ सुनंदा, ३ सुशील, ४ सुरभि, ५ कपिला, ६ क्रपिलधारा, ७ कमोदिनी, ८ मधुगा, ९ सिद्धि, १० पूर्ण - भद्रा, ११ महासिद्धि, १२ कामभूता, १३ ब्रह्मघातिनी, १४ मोक्षावती, १५ वसुमती व १६ त्रिपदा अथवा प्रणवी. या सोळा कामधेनु दधि, समुद्रमंथनांतून निघाल्या अशी कथा आहे. ([काशीखंड ६१. ५७])
सोळा चिन्हे भगवंताचे चरण कमलीं असलेलीं   
१ उजवा चरण - १ चक्र, २ कमल, ३ ध्वज, ४ वज्र, ५ अंकुश, ६ यव, ७ स्वस्तिक, ८ ऊर्ध्वरेखा ; डावा चरण - ९ अष्टकोण, १० इंद्रचाप, ११ त्रिकोण, १२ कलश, १३ अर्धचंद्र. १४ अंबर, १५ मत्स्य आणि १६ गोष्पद ([कल्याण])
वर्ष. ३२ अंक. ३)
सोळा तिथींचे सोळा अधिपति   
१ प्रतिपदा - अग्नि, २ द्वितीया - ब्रह्मा, ३ तृतीया - यक्षराज, ४ चतुर्थी - गणेश, ५ पंचमी - नागराज, ६ षष्ठि - कार्तिकेय, ७ सप्तमी - सूर्य, ८ अष्ट्रमी - रुद्र, ९ नवमी - दुर्गा, १० दशमी - यमरज, ११ एकादशी - विश्वश्वर, १२ द्वादशी - विष्णु, १३ त्रयोदशी - मदन, २४ चतुर्दशी - शंकर, १५ पौर्णिमा - चंद्र व १६ अमावास्था - पितर.
देवेम्यस्तिथयो द्त्ता भास्करेण महात्मना।
यस्यैव यद्दिनं द्त्तं स तस्यैवाधिपः स्मृतः ॥ (भ. ब्रा. १०२-९).
सोळा तेजाचीं प्रतीकें   
१ सिंह, २ वाघ, ३ सर्प, ४ अग्नि, ५ ब्राह्मण ६ सूर्य, ७ हत्ती, ८ तरस, ९ सोनें, १० जल, ११ गाय, १२ पुरुष, १३ वृषभ, १४ वायुः पर्जन्य, १५ क्षत्रिय व १६ दुन्दुभि अश्व.
हीं तेजांची निरनिराळीं प्रतीकें होत. ([अथर्व - अनु. मराठी भाग २ रा])
सोळा दुःखें अथवा दुःखकारणें (प्रपंचांत)   
१ पारतंत्र्य, २ आधि - मानसिकाचिंता ३ व्याधि, ४ मानखंडना, ५ शत्रु असणें, ६ कुमार्या, ७ दारिद्य. ८ कुग्रामवास, ९ दुर्जन सेवा, १० कन्या संतति अधिक असणें, ११ म्हतारापण, १२ दुसर्‍याच्या घरीं राहण्याचा प्रसंग येणें, १३ पर्जन्यकाळीं प्रवास, १४ दोन भार्या असणें, १५ दुर्गुणी नौकर आणि १६ वाईट नांगरानें केलेली शेती - अयोग्य साधनानें करावे लागणारे कोणतेंहि काम. ([न्यायकोश])-(कविकल्पलता)
सोळा ध्रुवताल   
१ जयंत, २ शेखर, ३ उत्साह. ४ कंदर्य, ५ जयमंगळ, ६ मधुर, ७ निर्मल, ८ कुंतल, ९ कमला, १० चारी, ११ नंदन, १२ चंद्रशेखर, १३ कामद, १४ विजय, १५ तिलक आणि १६ ललित. (गायन प्रकाश)
सोळा नांवें तुळशीचीं   
१ तुळस, २ श्री, ३ आवश्यक, ४ लक्ष्मी, ५ महालक्ष्मी, ६ विद्या, ७ यशःश्री, ८ धर्माधर्म, ९ देवी, १० देवदेवी,
११ सखी, १२ शुभ, १३ भूमि, १४ अचल, १५ अमिला व १६ अमला. ([ब्रह्मांड पुराण])
सोळा नांवें श्रीविष्णूचीं व तीं घेण्याचा काळ   
१ विष्णु - औषध, २ जनार्दन - भोजन, ३ पद्मनाम - शयन, ४ प्रजापति - विवाह, ५ चक्रधर - युद्ध, ६ त्रिविक्रम - प्रवास, ७ नारायण - अंतकाल. ८ श्रीधर - प्रिय - संग समयीं, ९ गोविंद - दुःखप्न, १० मधुसूदन - संकट, ११ नारसिंह - अरण्य, १२ जलशायिन - अग्निंत, १३ वराह - जलांत, १४ रघुनंदन - एर्वत, १५ वामन - गमनकालीं व १६ माधव - सर्वप्रसंगीं ([बृहत्स्तोत्र रत्नाकर])
सोळा भूषण श्रृंगार (स्त्रियांचे)   
१ पातिव्रत्य - हा जरताती पाटाव,
२ संसार - व्यवहार - दक्षता - जरतारी चोळी,
३ शिशु संगोपन चातुर्य - कमरपट्टा
४ सासू सार्‍यांची सेवा - कर्णभूषणें,
५ शुद्ध - अश्रमधर्म - सांगसंपादनत्व - हस्तभूषणें,
६ निर्मल गृह व्यवस्थ,
७ अतिथिसत्कार - मस्तकभूषन,
८ लेखन वाचनादिकला - मोहनमाळ,
९ ईश्वर आस्तिक्य - मंगळसूत्र,
१० मृदु मंजुळ भाषण - मूदाराखडी,
११ परिस्थितीनुरूप कालक्रमण - गोठ,
१२ पतिसेवा परायणत्व - कुंकुमतिलम
१३ दुःखितांस साह्म - बिजवरा,
१४ अढल घैर्य - बुगडी,
१५ संकटकाली वीरता - काप आणि
१६ स्वकुलधर्मामिमान - कंकण.
या सोळा श्रृंगारांनीं युक्त असते ती जगद्वंद्य होते. (गृहिणी रत्नमाला. वर्ष १ अंक. १, १९३६)
सोळा पदार्थ   
१ प्रमाण, २ प्रमेय, ३ संशय, ४ प्रयोजन, ५ द्दष्टांत ६ सिद्धांत, ७ अवयव, ८ तर्क, ९ निर्णय, १० वाद, ११ जल्प, १२ वितण्डा, १३ हेत्वभास, १४ छल, १५ जाती, व १६ निग्रहस्थान,
या सोळा पदार्थांचे उद्देश - लक्षण - परीक्षा इत्यादींनीं तत्त्वज्ञान होतें. गौतमप्रणीत न्यायदर्शनांत असे सोळा पदार्थ मानले आहेत व त्यामुळें दुःख नाश होऊन निश्रेयस मिळतें असें न्यायशास्त्र मानतें, (न्यायशास्त्र).
सोळा प्रतीकें लक्ष्मीचीं   
१ श्री (लक्ष्मी), २ भूति, ३ श्रद्धा, ४ मेधा, ५ सन्नति, ६ विजिति, ७ स्थिति, ८ धृति, ९ सिद्धि, १० कांति, ११ समृद्धि, १२ खाहा, १३ स्वधा, १४ संस्तुति, १५ नियतित व १६ स्मृति. ([म. भा. शांति. अ. २२२])
सोळा प्रकारच्या जपमाळा   
१ करमाला, २ वर्णमाला, ३ माणिमाला, ४ रुद्राक्ष, ५ तुळसी, ६ शंख, ७ पद्मबीज, ८ जीवपुत्रक, ९ मोतीं, १० स्फटिक, ११ मणि, १२ रत्न, १३ सुवर्ण, १४ चांदी, १५ चंदन आणि १६ कुशमूळ (दर्भमूळ). (श्रीगायत्रीजप - जज्ञविधि)
सोळा प्रकारची पत्री   
१ अशोक, २ अघाडा, ३ कण्हेर, ४ चाफा, ५ जाई, ६ डाळिंब, ७ तुळस, ८ दूर्वा, ९ धोतरा, १० पुन्नाग
(नागचाफा), ११ बकुल, १२ बेल, १३ बोर, १४ रुई, १५ विष्णुक्रांता व १६ हदगा. अशी सोळा प्रकारची पत्री मंगलागौरीच्या पूजेला लागते. (ब्रतराज)
सोळा प्रकारचे संधि (तह)   
१ कपालसंधि - बरोबरीचा तह, २ उपहारसंधि - खंडणी देऊन, ३ संतानसंधि - सोयरीक करून, ४ संगत - संधि - मैत्री करून, ५ कांचनसंधि, ६ उपन्याससंधि - हेतु धरून, ७ प्रतिकार - संधि - परस्पर कार्य साधेल असा, ८ संयोगसंधि - सामायिक उद्देशानें, ९ पुरुषांतरसंधि - शर्त ठेवून केलेला, १० अद्दष्टपुरुषसंधि - शत्रूची शर्त पतकरून, ११ आदिष्टसंधि - प्रदेश देऊन, १२ आत्मदिष्टसंधि - प्राण संरक्षण करण्याकरितां, १३ परिक्रयसंधि - सन्मान्यांचें रक्षण व्हावें म्हणून, १४ उच्छिन्नसंधि - भूमि देऊन, १५ बरभूषसंधि - जमिनीचें सर्व उत्पन्न देऊन, १६ स्कंधोप - नेयसंधि - जमिनींतील पीक आपण वाहून नेऊन देऊन देऊन. ([हितोपदेश])
सोळा प्रमुख वैदिक छंद   
१ अत्यष्टि, २ अनुष्टुभ, ३ आष्टि, ४ अस्तारपंक्ति, ५ उष्णह, ६ ककम, ७ गायत्री, ८ जगती, ९ त्रिष्टुप् ‌, १० पंक्ति, ११ प्रस्तार पंक्ति, १२ बृहती, १३ महापंक्ति, १४ विराज्, १५ शक्करी व १६ सतोबृहती. ([ऋग्वेददर्शन])
सोळा प्रमुख शिष्य गौतम बुद्धाचे   
१ सारीपुत्र, २ मोग्गलान, ३ अज्ञात कौण्डिण्य, ४ महाकाश्यप, ५ महाकात्यायन, ६ आनंद, ७ अनुरुद्ध, ८ भद्दिय, ९ सुभूति, १० सोण, ११ बक्कुल, १२ उपालि, १३ स्वाती, १४ नंद. १५ सुनीत व १६ सोपाक. (बुद्धदर्शन)
सोळा भारतीय संवत (कालगणना)   
१ कल्पाब्द, २ सृष्टिसंवत्, ३ वामन संवत्, ४ श्रीराम संवत्, ५ श्रीकृष्ण संवत्‌, ६ यधिष्ठिर संवत, ७ बौद्ध संवत्, ८ महावीर (जैन संवत्‌,) ९ श्रीशंकराचार्य संवत ‌, १० विक्रमसंवत ‌, ११ शालिवाहन संवत्, १२ कलचुरी संवत, १३ वलभी, १४ नागार्जुन, १५ बंगला आणि १६ हर्षाब्द संवत ‌, ([कल्याण हिं, सं. अंक]) शिवशक हा सतरावा संवत् होय.
सोळा माता   
१ स्तनपान करविणारी, २ गर्मधानी, ३ भक्ष्यदात्री, ४ गुरुपात्नी, ५ इष्टदेवपत्नी, ६ सापत्नमाता, ७ कन्या, ८ गर्मारमागिनी, ९ स्वामिपत्नी, १० सासू, ११ आईची आई, १२ बापाची आई, १३ बन्धुपत्नी, १४ मावशी, १५ आत्या व १६ मामी.
मातुःअ पितुश्च भगिनी मानुलानी तथैव च।
जनानां वेदविहिता मातरः षोडश स्मृताः ॥ ([ब्रह्मवैवर्त गणपति खंड])
सोळा मातृका (पुण्याहवाचनांतील)   
१ गौरी, २ पद्मा, ३ शची, ४ मेधा, ५ सावित्री, ६ विजया, ७ जया, ८ देवसेना, ९ स्वधा, १० स्वाहा, ११ माता, १२ लोकमाता, १३ धृति, १४ पुष्टि, १५ तुष्टि व १६ कुलदेवता.
या सोळा मातृकांचें सर्व शुभकार्यांत गणपतिपूजनाबरोबर पूजन केलें जातें.
सोळा मुहत   
१ रौद्र, २ श्चेत, ३ मैत्र, ४ चार्व, ५ जयदेव, ६ रोचन, ७ वैतुर, ८ अभिजित्, ९ रावण, १० बालव, ११ बिमीषण, १२ नंदन, १३ याम्य, १४ सौम्य, १५ भग व १६ सावित्र. ([ज्योतिष])
सोळा राज्यें भारतीय संघराज्यान्तरगत   
१ आंध्र, २ आसाम, ३ उत्तरप्रदेश, ४ ओरिसा, ५ केरळ, ६ गुजराथ, ७ जम्मू व काश्मीर, ८ नागाप्रदेश, ९ पूर्वपंजाब, १० पश्चिम बंगाल. ११ बिहार, १२ महाराष्ट्र, १३ मद्रास, १४ मध्यप्रदेश, १५ म्हैसूर व १६ राजस्थान.
सोळा विकारात्मक मनुष्य देह   
५ ज्ञानेंद्रियें व त्यांचे ५ विषय (शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध) ५ कर्मेंद्रियें व १६ वें मन.
अस सोळा विकारात्मक मनुष्य देह आहे असें अध्यात्मांत मानलें आहे.
सोळा विद्या   
१ सत्यविद्या, २ दहरविद्या, ३ वैश्वानरविद्या, ४ पंचाग्निविद्या (ओंकाराचें ध्यान), ५ षोडषकला विद्या (या विद्येच्या साहाय्यानें विवेकी पुरुषाला प्रत्यक्ष ब्रह्मात्मा प्रसन्न होतो), ६ उद्निथविद्या, ७ शांडिल्य विद्या, ८ पुरुषविद्या, ९ पर्यंकविद्या - पर्थंकावर बसून अभ्यास करितां करिता, ब्रह्मदेवाकडे जाऊं लागतो, १० अक्षरविद्या, ११ संवर्गविद्या, १२ मधुविद्या - सृष्टीची उपासना, १३ प्राणविद्या, १४ उपकोसलविद्या - उपकोसल नामक शिष्याला सांगितलेली १५ सद्विद्या - सत्यब्रह्माचें परोष ज्ञान, १६ भूमाविद्या - अपरोक्ष ज्ञान.
वेदान्तांत (उपनिषदांत) सांगितलेल्या विद्यांपैकीं या सोळा मुख्य विद्या होत. (श्रीतत्त्वसारायण रामगीता अ. १७)
सोळा वृत्ति (मनोव्यापार) अंतःकरणाच्या   
१ संज्ञान (चेतनभाव), २ आज्ञान (ईश्वरभाव), ३ विज्ञान, ४ प्रज्ञान, ५ बुद्धि, ६ द्दष्टि, ७ धृति, ८ मनन, ९ इच्छा, १० युति (मनाची व्यग्रता), ११ स्मृति १२ संकल्प, १३ क्रतु, १४ प्राणवृत्ति, १५ विषयतृष्णा व १६ लोभ.
([ऐतरेयोपनिषद् ५-२])
सोळा श्रृंगार   
(अ) १ मज्जन, २ चीर, ३ हार, ४ तिलक, ५ अंजन, ६ कुंडळ, ७ नासामौक्तिक, ८ केशपाशरचना, ९ कंचुक, १० नूपुर, ११ सुगंध (अंगराग), १२ कंकण, १३ चरणराग (अलक्तक), १४ मेखलारणन (क्षुद्रघंटिका), १५ तांबूल आणि १६ करदर्पण (आंगठयांत घालावयाचा एक अलंकारविशेष, यावर आरसा बसविलेला असे त्यांत मुखो - लोकन करतां येत असे.)
आदौ मज्जनचीरहारतिलकं नेत्राज्जनं कुंडले
नासामौक्तिककेशपाशरचना सत्कंचुकं नूपुरौ।
सौगन्धं करकङ्‌‍कणं चरणयो रागो रणन्मेखला
ताम्बूलं करदर्पणं चतुरता श्रृंगारकाः षोडश। ([सु.]) (कविवल्लभदेव - पंधरावें शतक.)
(आ) १ मज्जन, २ वस्त्र, ३ आलक्तक, ४ केशपाश, ५ सौगंघ्य, ६ भूषण, ७ मुखसुत्रास, ८ कज्जल, ९ भाषण, १० हास्य, ११ चातुर्य, १२ चालन, १३ पातिव्रत्य, १४ गान, १५ कटाक्ष व १६ क्रीडा. ([दुर्बोध श. कोष.]); (इ) १ शौच, २ उटणें, ३ स्नान, ४ वेणीफणी, ५ वस्त्र - आभूषणें, ६ काजळ. ७ अळत्याचा रंग, ८ देंतरंजन, ९ तांबूल, १० वसंत, ११ अलंकार, १२ सुगंध, १३ पुष्ह्पहार, १४ कुंकू, १५ तिलक व १६ हनुवटीवर गोंदणें, (तत्त्व - निज - विवेक)
सोळा श्रृंगार (हिंदी दोहरा)-
(इ) १ चार चतुष्पद, चार खगपद, चार फूल, फल चार राधाजीके बदनपर ये सोला सिनगार, स्पष्टीकरण असेः -
चार चतुष्पद
१ तुरंगवत् - घुंगट.
२ कुरंगव्त् ‌- नेत्र.
३ गज - गति.
४ सिंह - कटि.
चार खगपद
१ कोकिला - स्वर.
२ भ्रमराकृति - भोंवई.
३ शुकचंचुवत् ‌- नासिका.
४ मीनखेचनावत् ‌- चंचलता.
चार फूल
१ चंपकवत् - कांति.
२ केतकीवत् - सुगंध.
३ कमलाकृति - नाभि.
गुलाबवत - गाल.
चार फल
१ कपित्थवत्‌‍ - कुच.
२ दाडीमीबीजवत् - दंत.
३ आम्रबीजापरि - हनुवटी.
४ प्रवालाप्रमाणें - अधर.
सोळा संस्कार   
१ गर्भाधान, २ पुंसवन, ३ सीमंतोन्नयन, ४ जातकर्म, ५ नामकरण, ६ निष्कमण, ७ अन्नप्राशन, ८ चौल. ९ उपनयन. १० ते १३ वेदव्रतचतुष्टय - (१०) महानाग्नीव्रत, ११ महाव्रत, १२ उपनिषद्‌‍व्रत व १३ गोदान, १४ केशान्त, १५ समावर्तन आणि १६ विवाह.
गर्भाधानं पुंसवनं सीमंतोन्नय्नं तथा।
जातकं नामसंस्कारो निष्कमश्चान्नभोजनम् ॥
चौलकर्मोपनयनं वेदव्रतचतुष्टयम्।
केशान्तः स्नानमुद्वाहः संस्काराः षोडशाः स्मृताः स्मृताः ॥ (ज्योतिर्मयूख)
सोळा (सांधे) मानव शरीराचे   
१ मान, १ कंबर, २ खांदेअ, २ कोपरे (हाताचे) २ मनगटें, २ मनगटें, २ बोटांचे, २ जांघा. २ गुडघे आणि २ घोटे मिळून सोळा.
घरा सोळा सांदी। बहात्तर कोठे (कोठडया)।
नवही दारवंटे। झाडीत होतें ([ज्ञा. रूपकात्मक अभंग])
सोळा स्वर   
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ल, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः,
सोळा स्त्री - जीवनाचे आंतर व बाह्म श्रृंगार   
आंतर श्रृंगार - १ दया, २ क्षमा, ३ शांति, ४ प्रीति, ५ नीति, ६ भक्ति, ७ चातुर्य, ८ धैर्य, ९ पातिव्रत्य, १० परोपकार, ११ मनमिळाऊपणा, १२ समाधान, १३ सत्यवचन, १४ नम्रता, १५ सहिष्णुता व १६ ज्ञानलालसा ;
बाह्म श्रृंगार - १ चोळी, २ डोकीवरून पदर घेणें, ३ दागिने बेतानें घालणें, ४ हळू चालणें, ५ हरिणाक्षी, ६ वेणीफणी नित्य करणें, ७ वस्त्र व्यवस्थित असणें, ८ काजळ घालणें, ९ कुंकूं लावणें, १० सडपातळ असणें, ११ गौर वर्ण १२ अल्प निद्रा, १३ हंसतमुख, १४ मधुर भाषण, १५ हात राखून खर्च करणें व १६ आदरातिथ्य राखणें,
हे सोळा स्त्री जीवनाचे अनुक्रमें आंतर व बाह्म श्रृंगार शास्त्रकारांनीं सांगितले आहेत.
"नारीणां षोडश कला श्रृंगारास्तत्प्रमाणकाः"(ब्रंह्मवैवर्त श्रीकृष्णखंड ३८-११०)
सोळा लिपी भारतांत प्रचलित असलेल्या   
१ देवनागरी, २ गुरुमुखी, ३ गुजराथी, ४ ओडीया, ५ आसामी, ६ बंगाली, ७ तेलगु, ८ कन्नड, ९ तामीळ, ११ मल्याळम् ‌, १२ अरबी, १३ फारसी, १४ उर्दू, १५ मोडी व १६ रोमन.

Related Words

१६   १६ तारीख   16   xvi   sixteen   भाटयाची जमीन   सीमूर   मुष्टावर्त   मोरवंड   मोरवंडी   तर्जन्यावर्त   कंठवर्त   नाराणूक   गोल पोलीस   साखाळा   गुल्मपद्धति   जुजगल   आच्यावाच्या   तुरंबणी   ठाणांतर   कसोसी   कामाणुक   आश्लेषणें   आसलग   बतारीख   मोहतोपदर   नेष्टा   पाठीं हटणें   राटावळी   शायस्ता   आणा दोन आणे   डुर   तृतीय प्रकृति होणें   वाउर   वाउळ   अचोज   घडिया   सिरयाणी   सिराणी   सिरियाणी   सौरा   साज्ञ   गालबता   गीर्दपेश   गॉथिक टंक   आडधाया   आडवंकी   आडवंगी   आवर्तणें   जिराह   अण्णाठें   अनुक्षणीं   खसासित   खोबजणें   आंके   आंध्य   चोरळी   चांथी   चिदगगन   झुलार   टोलेवारी   ढेम   तक्वेत   कवडीहि न फेडणें   उपसवें   उलसन   कटपट   आहाण   इष्टदा   अळसिणी   अळाण्यावळाण्या   अवकाट   अवगमणें   अवरतमाना   उसिणें   एकवंक   ओढाळा   कीलना   कुबोल   कुरुपणें   कुवारी   कुवारीण   दुमाणूं   दुमान   दुमानूं   बोलु   बोलू   फौज खर्चाचें तोंड   माखली   मादुरी   मायवणी   मायेवणी   रमेदी   त्रिसरेणू   थबाबणे   धुधाट   ध्वनविणे   नमिता   खणाणां   पाताशहागर्दी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP