Dictionaries | References

१५

   { पंधरा }
Script: Devanagari

१५     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पंद्रह, पंद्रह

१५     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पंधरा, पंधरा, पंधरा

१५     

Sanket Kosh | Marathi  Marathi
पंधरा अंगें योगाचीं   
१ यम, २ नियम, ३ त्याग, ४ मौन, ५ देश, ६ काल, ७ आसन, ८ मूलबंध, ९ देहाची समता, १० द्दष्टीची स्थिरता, ११ प्राणायाम, १२ प्रत्याहार, १३ धारणा, १४ आत्मध्यान्व १५ समाधि (अपरोक्षानुभूति)
पंधरा अनर्थ द्रव्या मुळें उद्भवतात   
१ चोरी, २ हिंसा, ३ असत्य अथवा फसवाफसवीचा व्यवहार, ४ दंभ, ५ काम, ६ क्रोध, ७ गर्व, ८ मद, ९ भेद, १०, वैर, ११ अविश्वास, १२, स्पर्धा, १३ स्त्री, १४ द्यूत व १५ मद्यपान.
'एते पञ्चदशानर्था ह्मर्थमूला मता नृणाम् ।' ([भाग ११-२३-१९])
एवं ही पंधरा अनर्थ। मूर्ख अथवा पंडित।
जें अर्थसंग्रह करित। अवश्य हे तेथ उठती ॥ ([ए. भा. २३-३-३४])
पंधरा कौरवांचे प्रमुख साह्मकर्ते   
१ भगदत्त, २ भूरेश्रवा, ३ शल्य, ४ कृतवर्मा, ५ जयद्र्थ, ६ सुदक्षिण, ७ नील, ८ विन्द व अनुविन्द ९ केकेय, १० बृहद्वल, ११ शकुनि, १२ बाल्हिक, १३ कर्ण, १४ अलम्बुष, (राक्षस) व १५ संशप्तकगण, ([म. भा. उद्योग. अ १९])
पंधरा तत्त्वें स्थूल शरीराचीं   
१ ते ५ पंच ज्ञानेंद्रियें, ६ ते १० पंचकर्मेंद्रियें आणि ११ ते १५ पंचविषय हीं मिळून पंधरा तत्त्वांचा स्थूल देह निर्माण झाला आहे.
पंधरा तेजस्वी तारे   
तारे व इतर आकाशस्थ ज्योति असंख्य असल्या तरी त्यांत अधिक तेजस्वी असे पंधरी तारे आहेत त्यांचीं नांवें - व्याध, २ अगस्ति, ३ मित्र, ४ अभिजित् ‌, ५ ब्रह्मह्रदय, ६ स्वाती, ७ नील, ८ प्रश्वाअ, ९ अशिर, १० ब्रह्मा, ११ श्रवण, १२ लोहित, १३ रोहिणी, १४ चित्र, व १५ ज्येष्ठा. ([म. ज्ञा. कोअ. २०])
पंधरा प्रकार नमनाचे   
१ दंडवत, २ रामराम, ३ मुजरा, ४ सलाम, ५ कुरनिसात, ६ कुरनिस, ७ अभिनंदन, ८ आदेश, ९ जय - गोपाळ, १० जोहार, ११ आशीर्वाद, १२ जय सीताराम, १३ शिरसाष्टांग, १४ नमस्कार व १५ साष्टांग नमस्कार, (शब्दत्नावली) आधुनिक - हस्तांदोलन हा सोळावा प्रकार होय.
पंधरा प्रतिष्ठा   
१ मान, २ कीर्ति, ३ पत, ४ लौकिक, ५ प्रसिद्धि, ६ बहुमानाच्या जागीं स्थापना, ७ देवालयाच्या सन्मानार्थ उभारलेल्या स्मारकाची स्थापना, ८ देवमूतींची यथाविधि स्थापना, ९ वास्तुशांति, १० स्वतःचें घर असणें, ११ देवाचें वर्षासन इत्यादि, १२ सालंकृत कन्यादान, १३ आयुष्यांत स्थिर व स्थायिक होणें, १४ टोपण नांव व सभा वगैरे ठिकाणीं घेऊन जाण्याचा पोषाख आणि १५ एखादी सन्माननीय पदवी. ([म. श. को.])
पंधरा प्रमुख गंधर्व   
१ विराध, २ तुंबरु, ३ दनु, ४ चित्ररथ, ५ धृतराष्ट्र, ६ किशोर, ७ हूहू, ८ हाहा, ९ विद्याधर, १० उग्रसेन, ११ विश्वावसु, १२ परावसु, १३ चित्रसेन, १४ गोपाल व १५ बल.
'चित्रसेनश्च गोपालो बलः ॥' (ग. ब्रह्म. ९-३)
पंधरा मुख्य प्रकार औषधींचे (आयुर्वेद)   
१ घृत, २ तैल, ३ कषाय, ४ गुटिका, ५ मोदक, ६ पुटपाक, ७ चूर्ण, ८ कल्क, ९ स्वरस, १० लेह ११ अवलेह, १२ यवागू, १३ अरिष्ट, १४ आसव व १५ चूर्णारिष्ट. ([म. ज्ञा. को. वि. ५])
पंधरा स्थितप्रज्ञाचीं लक्षणें   
१ कामनात्याग, २ आत्मसंतुष्ट, ३ दुःखानें उदास होत नाहीं, ४ सुखाची आसक्ति नाहीं, ५ प्रीति, भय व क्रोध यांपासून अलिप्त, ६ ममत्वत्याग, ७ आसक्तिरहित, ८ शुभप्राप्तीचा आनंद नाहीं, ९ अशुभाचा द्वेष नाहीं, १० इंद्रियनिग्रह करून परमेश्वरपरायण ११ संयमी, १२ प्रसन्नचित्त, १३ भोगासंबंधीं उदासीन, १४ स्वस्वरूपीं स्थिर, १५ कामना, ममता व अहंकार वगैरेंचा त्याग, निरिच्छ्ता, ([भ. गीता. २-५५-७१])

१५     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : पन्ध्र, पन्ध्र

Related Words

१५   fifteen   15   xv   १५ औं   १५ तारीख   fifteenth   15th   अंगपत्र   किरडूव   केतकी वज्र   श्रीमंतानीं गू खाल्ला तर औषधासाठीं व गरिबांनीं खाल्ला तर पोटासाठीं   साख्ता   गजवज्र   तीक्ष्णवर्म   कान्हम   कालखडग   कालगिरी   कितेब   कज्जलपात्र   बितर्जुमा   मंडलग्न   मालोवाळीं   मर्दवाण   महाखड्ग   धवलागिरी   नकुलांग   धर्मापाल   नुरोधी   कौक्षेपक   रिष्टें   अंजुळ   अंजुळी   सुरफुरें   साक्ष भोजन   अडगाई   खेतास पडणें   खेतास येणें   कानीं येणें   कंठास लावणें   कुटीरक   कुडजार   बवाजवी   बिल्फैल   मांडें   मवालीपन्हा   त्रिंबिया   कोंदाकोंदी   कोसंब   वाढोळां   सखावतू   सबोंब   वर्जोर   वोसाड   वोसाडा   स्फुरद   देव्हडी   नजीख   नज्दीक   ठावो   ओफाडा   कुर्याट   अकदस   चइत   चइत्र   साळढोकपणा   सावतोल   हवाव   हेवड   सौभाग्य संन्यास घेणें   सरोक   ससेटा   साकीन   सानवणें   सानविणें   गलुफी   गाठून बसणें   गावार   आठुळणें   आडणूक   आडदंड   आधांतरी   आयागमन   आरवसा   जाबीत   जुगली   अदटु   अधांतरीं   अधोशाखा   अनन्योदक   खरसी   खांकरेजणें   खांकरैजणें   खिरंगटणें   खिसाभरित   खैराड   खोकरपण   खोलावणें   खोलिजणें   अव्वडचव्वड   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP