Dictionaries | References

मोडणें

   
Script: Devanagari

मोडणें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  साबुद्द वचपाची आनी आंग फडफडपाची व्याधी   Ex. मोडण्याची पिडा बरी जावं येता
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मल्लूक झीट फीट
Wordnet:
asmমৃগী
bdमिरगि बेराम
benমৃগী
gujવાઈ
hinमिर्गी
kanಅಪಸ್ಮಾರ ರೋಗ
kasمِرگی
malപക്ഷവാതം.
marअपस्मार
mniꯁꯥꯔꯩ꯭ꯍꯧꯕ
nepछारेरोग
oriମୁର୍ଚ୍ଛା
panਮਿਰਗੀ
sanअपस्मारः
tamகாக்காய்வலிப்பு
telమూర్చ
urdمرگى , صرع
See : आताक

मोडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of unprofitable trudging. मोडून काढणें or टाकणें To foil or non-plus in argument; to confound, confute, pose.
. 12 To break; to lose force, vehemence, intensity. Ex. रगडून पाऊस पडेल तेव्हां गरमी मोडेल. 13 As मोडणें active is contradistinguished from तोडणें, so मोडणें neuter is contradistinguished from तुटणें, which verb therefore see. मोडतें घेणें To decline, recede, fall back.

मोडणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Break; destroy; break up.
Change. Spend.
v i   Be included in. Pass. Become desolate.
मोडून काढणें-टाकणें   Non-plus in argument; confute.

मोडणें     

स.क्रि.  उकरणें . जैसा न मोडिलिया विहिरा । मग आपलिया उगमीं झरा । भरोनि ठाके । - ज्ञा १५ . २६९ . [ सं , मुट , मुड = मोडणें ; सं . मोटन ; प्रा . मोडण ; हिं . मोडन ] मोडणें शब्द उत्तरपदीं येणारे कांहीं वाक्यप्रचार ( एखाद्याचें ) मन मोडणें = त्याच्या इच्छेविरुद्ध जाणें , न ऐकणें ; त्याची आज्ञा निष्फळ करणें ; मर्जीच्या उलट जाणें . घर मोडणें = कुटुंबातील माणसांची पांगापांग करणें . प्रॉमिसरी नोट मोडणें = ती बाजारभावानें विकून मोबदल्याचे पैसे घेणें . दिवस मोडणें = दिवस खर्च करणें . भय मोडणें = भय घालविणें ; भीति वाटेनाशी करणें . चालरीत मोडणें = चालरीत सोडणें , ती न पाळणें . मातीचे चित्र मोडणें = तें छिन्नभिन्न करणें .
अ.क्रि.  
स.क्रि.  
तोडून खाली टाकणें , पाडणें ; नाश करणें ; बिघाड करणें , ( इमारत इ० ); विस्कळित करणें ; भग्न करणें ; नाहींसें करणें ( मोडणें आणि तोडणें ह्या दोन्हीहि क्रियापदांचा हा सर्वसामान्य अर्थ आहे . तरी पण दोहोंच्या अर्थांत बराच भेद आहे . ( तोडणें पहा . ) तोडणे याचा अर्थ कांहीं तरी मोठें , अचानक , भयंकर कृत्य करुन तीक्ष्णधारी जोरकस हत्याराचा उपयोग करुन किंवा जोरानें किंवा एकदम हिसकून एखाद्या वस्तूचा नाश करणें . आणि मोडणें म्हणजे पदार्थांच्या आकारांत , स्थितींत बदल करणें . उदा० रान तोडणें आणि रान मोडणें हे दोन वाक्यप्रचार घेतले तर पहिल्यांतील तोडणें याचा अर्थ रानांतील झाडें तोडून , छाटून , खांडून नाहींशी करणें व मोडणें याचा अर्थ रानांतील झाडझुडूप काढून साफसफाई करणें असा अर्थ ध्वनित होतो . ) जसें :- देशपद्धति मोडणें . त्याचें लग्न त्यानें मोडलें .
भग्न होणें ; छिन्नविच्छिन्न होणें ; विस्कळित होणें .
तुकडे करणें ; भाग किंवा अवयव वेगवेगळे करणें ( यंत्राचे इ० ).
र्‍हास पावणें ; अपकर्ष पावणें ; कमी होणें .
( एकादशी ) निष्फळ होणें .
वांकवून तुकडा करणें ( कांठी , वेत , लांकूड इ० चे ) खुडणें . ( धान्याचीं कणसें , भुट्टे इ० ). जादुगारानें काठी मोडलेली आम्ही पाहिली .
तोडणें ; नाहींसा करणें ( मैत्री , संगत , दुकानदारी , व्यवहार इ० ).
मोडून जाणें ; भाराखालीं , दाबाखालीं नमणें .
प्रकृति खालावणें ; र्‍हास होणें .
विस्कळित होणें ; विस्कट होणें ; पांगापांग होणें ( बाजार , मंडळी , सभा , कौन्सिल इ० ची ). म्हैस उधळल्यामुळें सभा मोडली .
ओसाड होणें ; निर्जन होणें ; लोकांची वस्ती नाहीशी होणें .
खुरदा किंवा नाणें करुन आणणें ( मोहरा , रुपया यांचें ) एक रुपाया मोडून नाणें , खुर्दा घेतला . पैसे करणें ; ( दागिन्याचे , धातूच्या भांड्याचें ). विक्री करुन पैसे घेणें ( जनावराचे , वस्तूचे ).
दिवाळें वाजणें ; मोडतोड होणें .
भंग करणें ; अडथळा करणें ; बिघाड करणें ( झोपेचा , शांततेचा , चालू कामाचा , उद्योगाचा इ० ).
बंद पडणें ; चालूं नसणें ( उद्योग , कारखाना , धंदा ).
बिघडविणें ; नाखूश करणें ; अवमानणें ( मन , मर्जी , इच्छा , हेतु ). पितृसत्यपालना प्रभु कैकेयीचें न चित्त मोडून । - मोरामायणें १ . ४८४ .
बिघाड करणें ; रचना , जुळणी नाहींशी करणें ; विस्कटणें ( पागोटें , निर्‍या इ० ).
नांवाखालीं येणें ; मध्यें अंतर्भाव होणें ; जाणीव होणें ; पोटांत , सदरांत येणें , अंर्तभूत होणें . पुणें शहरांत भांबुर्डा मोडतो हिंदुस्थानांत लंका मोडते .
स्मृतीतून नष्ट होणें ; विस्मरण पडणें ( आचार , रुढी , पद्धत यांचें ).
नाहींशी करणें ; ओसाड पाडणें ; ( वस्ती , गांव , वसाहत ).
खंडण करणें ; पाडाव करणें ( पक्ष , मत , वाद इ० चा ).
( अशक्तपणामुळें , अधिक श्रमामुळें ) ढिलें पडणें ; हतबल होणें ; त्राण नाहींसा होणें ; कसकसणें .
खर्च करणें ; नाश करणें ; गमावणें ; घालविणें ; बुडविणें ( वेळ , काळ , दिवस ).
तुटणें . अंग मोडून येणें , मोडून येणें - कसकस येणें ; तापाची कसर येणें ; हातपाय मोडून येतात . मोडतें घेणें - नाकबूल करणें ; इनकार करणें ; नाकारणें ; माघार घेणें ; मागें हटणें ; पाऊल मागे घेणें . मोडता काळ - पु . अपकर्षाचा , मंदाईचा काळ . मोडत्या काळीं जो धर्म करील तो धर्मात्मा . [ सं . मुट = चूर्ण करणें ; ठार करणें ]
जोर हटविणें , नाहींसा करणें ; शमविणें ; दाबून टाकणें ; घालविणें . ( तहान , भूक , काळजी , संशय , भय ).
जिरविणें ; कमी करणें ; घालविणें ( खोड , व्यसन , गर्व , इ० ).
स्थिरस्थावर करणें ; सांत्वन करणें ; नाहींसे करणें ( भांडण , झगडा , दंगा ).
भंग करणें ; अतिक्रमण करणें ; उल्लंघन करणें ( कायदा , हुकूम , आज्ञा , वचन , करार इ० ).
रद्द करणें ; बंद करणें ; काढून टाकणें ( कायदा ; नियम , विधी , संस्कार , समारंभ ).
दिवाळें काढणें ; नाश करणें ; मोडतोड करणें .
पुसून टाकणें ; नाहींशी करणें ; खरडून टाकणें ; मागमूस दिसूं न देणें . गाडीची वाट फेसाटीनें मोडावी . मोडणें हें तोडणें या क्रियापदाहून भिन्न आहेच परंतु याच अर्थासारखें भासणारें फोडणें या क्रियापदाहूनहि भिन्न आहे . फोडणें पहा . मोडून टाकणें , काढणें -
म्हणणें किंवा बोलणें खुंटविणें ; गोंधळविणें ; कुंठित करणें ; निरुत्तर करणें .
पराजित करणें ; फजित करणें . त्याचा हा परिपाक आजि दिसतां या पंडिता मोडिलें । - सारुह ६ . ६४ .

Related Words

माज मोडणें   रग मोडणें   आंख मोडणें   दुगही मोडणें   मोडणें   घडी मोडणें   सुंठ मोडणें   हळकुंडासाठीं लग्न मोडणें   हाडें मोडणें   हातपाय मोडणें   हात मोडणें   हातापायाचे डगळे मोडणें   जीभ मोडणें   खुबड मोडणें   खोडकी मोडणें   खोड मोडणें   आंकडा मोडणें   आज्ञा प्रभूची मोडणें, हेंच प्राणास मुकणें   छत्र मोडणें   तीळ खाऊन व्रत मोडणें   तुकडा मोडणें   तुकडे मोडणें   डोळे मोडणें   तजा मोडणें   कांटा मोडणें   काडी मोडणें   कद मोडणें   कमर मोडणें   उठवण मोडणें   अर्ध्या हळकुंडानें लग्न मोडणें   बाजलें मोडणें   बी मोडणें   दुकान मोडणें   बोटें मोडणें   बजबजपुरी मोडणें   भाकर पायानें मोडणें   भाकरीपायानें मोडणें   भाजला पापड न मोडणें   भात मोडणें   भिंवया मोडणें   भिवई मोडणें   मांडी मोडणें   मागमूस मोडणें   मान मोडणें   मुद्दा मोडणें   मूळ मोडणें   मन मोडणें   मर्जी मोडणें   मर्यादा मोडणें   देह मोडणें   नाक मोडणें   नेत्र मोडणें   पाटे मोडणें   पाण्याचा कांटा मोडणें   पाय मोडणें   पदर मोडणें   पेकाट मोडणें   रुपयाची मान मोडणें   रुपया मोडणें   रेच मोडणें   शेवटच्या बांधण्यास पाणी मोडणें   छारेरोग   अपस्मार   अपस्मारः   मिरगि बेराम   मिर्गी   مِرگی   പക്ഷവാതം   காக்காய்வலிப்பு   ମୁର୍ଚ୍ଛା   ਮਿਰਗੀ   વાઈ   ಅಪಸ್ಮಾರ ರೋಗ   মৃগী   epilepsy   మూర్చ   मल्लूक   हात इचकणें   सोई बसविणें   सोय बसविणें   धीर चेपणें   खवडा जिरविणें   आज्ञोल्लंघन   इराडा काढणें   भजेडवणें   मोटाळणें   मोडें   पगडी हरणें   गळमोडी   फळी फुटणें   अंतर पाडणें   खाकटणें   आज्ञातिक्रमण   बालंटावर येणें   बालंटावर सरणें   बालंटास येणें   बालंटास सरणें   बोड करणें   मेटें टेंकणें   रग जिरविणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP