Dictionaries | References

दृष्टी

   
Script: Devanagari
See also:  दृप्त , दृप्तदृष्टी

दृष्टी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याने मनुष्य, जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती   Ex. गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
HYPONYMY:
काकदृष्टी
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नजर
Wordnet:
asmদৃষ্টিশক্তি
bdनोजोर
benদৃষ্টি
gujનજર
hinदृष्टि
kanದೃಷ್ಟಿ
kasنظر , بٔصٲرَت
kokनदर
malകാഴ്ച
mniꯃꯤꯠꯌꯦꯡ
nepदृष्टि
oriଦୃଷ୍ଟି
panਦ੍ਰਿਸ਼ਟੀ
tamபார்வை
telదృష్టి
urdنظر , قوت نظر , قوت دید
noun  पाहण्याची क्रिया अथवा पद्धत   Ex. ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
HYPONYMY:
दृष्ट रागीट नजर अधोदृष्टी
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नजर
Wordnet:
asmচাৱনি
benদৃষ্টি
gujનજર
hinदृष्टि
kasنظر
panਦ੍ਰਿਸ਼ਟੀ
sanदृष्टिक्षेपः
telదృష్టి
urdمنظر , نگاہ , تیور , چتون
See : समज

दृष्टी     

 स्त्री. नृत्य . दृष्टीमध्ये निश्चलता , विकसितपणा व सात्विकता दाखविण्याचा अभिनय . हा अभिनय उत्साहवृत्तीस अनुकूल आहे .
 स्त्री. १ नेत्रगोलस्थित जे पाहण्याचे इंद्रीय आहे त्याची वृत्ति , कार्य तिने झालेले ज्ञान ; पाहण्याचे सामर्थ्य ; नजर . २ ( ल . ) ( एखाद्या गोष्टीकडे द्यावयाचे ) लक्ष्य ; अनुसंधान . निरंतर शास्त्राकडे दृष्टि ठेवावी तेव्हा शास्त्र येते . त्यास पागोटे द्यावयाचे खरे परंतु माझी दृष्टी चुकली . ३ ( ल . ) सत , असत जाणण्यासास कारणीभूत असलेली मनोवृत्ति ; एखादुयाकडे पहाण्याचा , एखाद्याशी बोलण्याचा . एखाद्याशी वगण्याचा . रोख ; कल ; मनोवृत्ति . अलिकडे त्याची दृष्टी फिरली आहे . ४ ( राजा . ) पाषाणाच्या देवाच्या मूर्तीस रुपे इ० कांचे डोळे बसवितात त्या डोळ्यांपैकी प्रत्येक . ५ दृष्ट ; वाईट , बाधक नजर . दृष्ट २ पहा . ( क्रि० होणे ; काढणे ). राधा म्हणत्ये हा ! मज पुत्रवतीची लागली दृष्टि । - मोस्त्री ५ . ५ . - वि . पाहणारा , दर्शी पहा . समासांत उपयोग जसे - गुणदृष्टि ; स्थूलदृष्टि ; दोषदृष्टी इ० . [ सं . ] ( वाप्र . )
०ओळखणे   ( एखाद्याच्या ) नजरेवरुनच , चेहर्‍यावरुन त्याचे मनोगत ओळखणे .
०काढणे   उतरणे ओवाळून टाकणे एखाद्यास वाईट दृष्टीची झालेली बाधा मंत्रतंत्र , तोडगा इ०काने काढून टाकणे . खालून जाणे ( एखादी गोष्ट , वस्तु इ० एखाद्याच्या ) डोळ्याखालून , नजरेतून जाणे ; स्थूलपणे माहित असणे . ज्यांचे दृष्टीखालून गेले । ऐसे कांहीच नाही उरले । - दा १ . ६ . ९ .
०घालणे   १ डोळा मोडणे , मिचकावणे , डोळ्याने इशारा करणे . २ ( एखाद्या गोष्टीकडे ) काळजीपूर्वक पहाणे , लक्ष देणे , मन लावणे . स्वर्गांगनेसी जरि साम्य आली । परंतु तेथे दृष्टी न घाली । - रामदासी २ . ४३ .
०चढणे   गर्वाने फुगणे ; उन्मत्त होणे ; डोळ्यांवर धूर येणे .
०चुकणे   विसरणे ; गोंधळून जाणे ; घोटाळ्यांत पडणे .
०चुकविणे   चारणे - ( एखाद्याच्या ) डोळ्यास डोळा न देणे ; नजरेस पडण्याचे टाळणे .
०चोरणे   नजर भारुन टाकणे ; नजरबंद करणे . की पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे । परि नवल लाघव तुझे । जे आपणपे चोरे । - ज्ञा १४ . ५ .
०ठेवणे   देणे - राखणे - ( एखाद्या गोष्टीची , वस्तूची ) काळजी घेणे ; लक्ष देणे . ठेवीना गर्भीही दृष्टिस ती नीट जळहि सेवीना । - मोअश्व ४ . ८ .
०देखणे   ( काव्य ) पाहणे .
०निवळणे   १ बिघडलेले , आलेले डोळे पूर्ववत स्वच्छ होणे . २ ( ल . ) गर्व , ताठा , उन्माद नाहीसा होणे .
०पडणे   होणे लागणे - ( एखाद्याच्या ) वाईट नजरेची बाधा होणे ; दृष्ट होणे .
०फांकणे   १ गोंधळून जाणे ; भांबावून जाणे . २ नजर बेताल , ओढाळ होणे .
०फाटणे   ( एखाद्याची ) आकांक्षा , महत्त्वाकांक्षा , हेतु इ० वाढणे , विस्तृत होणे .
०फिरणे   १ राग येणे . येतां दृष्टी त्याची फिरली म्हणे । - रामदासी २ . ९८ . २ ताठा चढणे ; गर्व इ० ने दृष्टि अंध होणे ; धुंदी चढणे .
०बंद करणे    - नजर भारुन टाकणे ; मोडून टाकणे ; नजर बंद करणे ; दृष्टि चोरणे .
०भर पाहणे    - पोटभर , डोळे भरुन तृप्ति होईपर्यंत , मनमुराद पाहणे . पाहा जा सदृढ दृष्टि भरुनि । - दावि ४६ .
०मरणे   तीच वस्तु अनेक वेळां पाहिल्याने , तीच गोष्ट अनेक वेळा केल्याने , तिच्याबद्दलची भीति , आश्चर्य , हिडिसपणा इ० वाटेनासे होणे . माडावर चढून चढून भंडार्‍याची दृष्टि मेलेली असते . दृष्टीची मुरवत राखणे ( एखाद्याच्या ) भावनेस मान देणे ; ( एखाद्यास ) न आवडेल अशी गोष्ट त्याच्या समक्ष न करणे . दृष्टीचे पारणे फिटणे जे पाहण्याविषयी उत्कठा आहे ते पाहण्यास न मिळाल्याने समाधान पावणे . दृष्टीत आणणे न जुमानणे . ऐसे वदोनि आणित नव्हतासि च बा परासि दृष्टीत । - मोमहाप्रस्थानिक २ . २० . दृष्टीत येणे ( एखाद्यास ) तुच्छ लेखणे ; कःपदार्थ मानणे . - मोकर्ण ६ . ६६ . दृष्टीने शिवणे डोळ्यांनी पाहणे . म्हणतो नाही शिवलो दृष्टि आढळून येणे ; नजरेस येणे ; अनुभवास येणे . दृष्टीस फांटा फुटणे दृष्टि फाटणे ; दृष्टीचे सामर्थ्य वाढणे . जैसे डोळ्यां अंजन भेटे । ते वेळी दृष्टीसी फांटा फुटे । - ज्ञा १ . २३ . चार दृष्टी होणे भेट होणे ; नजरानजर होणे . अडव्या दृष्टीने पाहणे वांकड्या , काण्या डोळ्याने पाहणे . दृष्टीचा अंमल पु . १ पाहण्यांत , नजरेत आलेला काळाचा अवधि . हा दरिद्र्याचा श्रीमंत झाला हे माझ्या दृष्टीच्या अंमलातले . २ नजरेचे कार्यक्षेत्र . कर्तबगारी . चित्र काढणे हे दृष्टीच्या अमलांत . दृष्टीचा खेळ पु . नजरेने , दृष्टीने करावयाची चमत्कृतिपूर्ण कुशलतेची गोष्ट ; नजरेचा खेळ . पाहून लिहिणे , चित्र काढणे , इ० दृष्टीचे खेळ आहेत . दृष्टीचा खोटा पापी वि . दुसर्‍याचे चांगले पाहून मनांत जळफळणारा ; मत्सरबुद्धीचा . दृष्टीचा पसारा पु . डोळ्यांना दिसणारे विश्व . त्या दृष्टीने त्या धोरणाने , बुद्धीने . पुत्राकडे पुत्रदृष्टीने पाहिले असतां ममता वाटते , नाहीतर सर्व एकच आहे . म्ह ० १ दृष्टीआड सृष्टी आणि वस्त्राआड जग नागवे = जे आपल्या देखत घडत नाही त्याला आपण जबाबदार नाही व त्याचा प्रतिकार करणेहि कठिण . २ ( व . ) दृष्टी माया भात भूक = दृष्टीस मूल पडले की माया उत्पन्न होते , व भात पाहिला तर भूक लागते . दृष्टीसमोर कांही वाईट घडले तर वाईट वाटते . सामाशब्द -
०अभिनय  पु. ( नृत्य . ) पापण्या , पापण्यांचे केस , बुबुळे , बाहुल्या व भिंवया यांच्या मदतीने केलेल अभिनय . याचे ३४ प्रकार आहेत . तेः - कान्त , भयानक , हास्य , करुण , अद्भुत , वीर , बीभत्स , शांत , स्निग्ध , हृष्ट , दीन , क्रुद्ध , दृप्त , भयान्वित ; जुगुप्सित , विस्मित , शून्य , लज्जित , म्लान , विषण्ण , शंकित , मुकुल , कुंचित , जिह्म , अभितप्त , ललित , अर्धमुकुल , विभ्रांत , विलुप्त , आकेकर , विकसित , मध्यमपद , अधमपद व त्रस्त .
०कोन  पु. विचार करण्याचे , पाहण्याचे धोरण , रोंख , मनोवृत्ति ; विचारसरणी . ( इं . ) अँगल ऑफ व्हिजन . आमचा दृष्टिकोन भिन्न असल्यमुळे त्यांनी योजिलेली भाषा आम्हांला साहजिकच पटत नाही . - मसाप २ . २ . १११ . [ दृष्टि + कोन ]
०गुण  पु. नजरेने पाहिल्यामुळे पाहिलेल्या वस्तूंचे , मनुष्याचे बरे वाईट करण्याची ( एखाद्यांतील ) विशिष्ट शक्ति .
०गोचर वि.  डोळ्यांना दिसणारे ; पाहतां येणारे ; दृष्टीस पडणारे . [ दृष्टी + सं . गोचर ]
०चरित   क्रिवि . जाणूनबुजून , बुद्धिपुरस्सर केलेले ( पाप इ० ). - ज्ञाको ( क ) १३८ . [ दृष्टि + सं . चरित = आचरलेले ]
०चोर  पु. दुसर्‍याचा डोळा चुकवून चोरण्याचा , पळण्याच्या ज्याचा स्वभाव आहे असा मनुष्य . [ दृष्टि + चोर ]
०देखत   देखतां क्रिवि . समक्ष ; पहात असतांना ; डोळ्यांदेखत . [ दृष्टि ]
०पथ  पु. दृष्टीची रेषा , टप्पा . [ दृष्टि सं . पथिन = रस्ता ]
०परीक्षा  स्त्री. ( वैद्यक शास्त्र ) रोग्याच्या डोळ्यांवरुन , दृष्टीवरुन रोगाची चिकित्सा करणे . [ दृष्टि + परीक्षा ]
०पात  पु. १ ( एखाद्या वस्तूवर , मनुष्यावर ) नजर पडणे , वळणे ; अवलोकन . २ नजर बाधणे ; दृष्ट लागणे . [ दृष्टि + सं . पात = पडणे ]
०पिंड  पु. डोळ्यांतील पारदर्शक भिंग ; ( इं . ) लेन्स . कांही मुलांस जन्मतः दृष्टिपिंडास विकार होऊन , त्या पिंडाची पारदर्शकता नाहीशी होते . - बालरोग चिकित्सा १२६ . [ दृष्टि + पिंड ]
०फोड  स्त्री. १ बारीक पाहणी ; चौकशी . २ डोळ्यांस त्रास होईल अशा प्रकारचे जिकीरीचे काम ; डोळेफोड सर्व अर्थी पहा . - वि . १ डोळ्यांना त्रास , ताण देणारे ( कलाकुसरीचे काम , किचकट लिखाण इ० ). २ ( क्व . ) डोळ्यांस हिडिस दिसणारे ; ओंगळ . [ दृष्टि + फोडणे ]
०बंध   बंधन पुन . मंत्रसामर्थ्याने डोळे भारुन टाकणे ; नजरबंदी की पुढिलाची दृष्टी चोरिजे । हा दृष्टबंधु निफजे । - ज्ञा १४ . ५ . [ दृष्टि + सं . बंध , बंधन = बांधणे ]
०भरु वि.  देखणा ; सुंदर ; डोळ्यांत भरणारा . [ दृष्टि + भरणे ]
०भेंट  स्त्री. आसन्नमरण मनुष्यास त्याच्या लांबच्या पुत्रादिक आप्तांची झालेली शेवटची दृष्टादृष्ट . २ दृष्टादृष्ट ; नजरानजर . [ दृष्टि + सं . मंडल = वर्तुळ ]
०मणी  पु. लहान मुलास दृष्ट होऊं नये म्हणून त्याच्या गळ्यांत मनगटाला बांधावयाचा कांचेचा पांढर्‍या ठिपक्यांचा काळा मणी .
०मर्यादा  स्त्री. मनुष्याच्या डोळ्यांना जेव्हढा पृथ्वीचा भाग दिसू शकतो तेवढी जागा ; दृष्टीच्या टप्प्यांतील भूभाग ; क्षितिज ; काळीधार ; चक्रवाल . [ दृष्टि + मर्यादा = सीमा ]
०रचना   रचनेचाउभार स्त्रीपु . ( काव्य ) डोळ्यांना दिसणारा इहलोकचा , सृष्टीचा पसारा .
०विकार  पु. १ वाईट मनुष्याची ( लहान मुलास ) नजर लागून झालेली बाधा . २ दृष्टीचा रोग ; डोळे बिघडणे . [ दृष्टि + विकार = बाधा ]
०र्‍हस्वता  स्त्री. लांबचे न दिसणे ; ( इं . ) शॉर्टसाइट . हा विकार मुलांना सात ते नऊ वर्षात होतो . एकाग्रतेने पाहाण्याने अगर वाचनाने हे व्यंग चांगल्या मनुष्यांसहि नवीन होऊ लागते . - ज्ञाको ( अं . ) ९५ . [ दृष्टि + सं . र्‍हस्वता = आंखुडपणा ]
०हेळा  स्त्री. कृपाकटाक्ष . जयाचिये दृष्टिहेळाचि संसारु । निरसोनि जाय । - विपू २ . २८ . दृष्ट्यगोचर वि . अदृश्य ; न दिसणारे . [ दृष्टि + सं . अगोचर - इंद्रियगम्य नव्हे असे ]

Related Words

दृष्टी   कार्यावर दृष्टी देणें   दृढ छाती, सूक्ष्म दृष्टी, मृदु हात जाणें, अशीं असावीं शस्त्रवैद्याचीं लक्षणें   दृष्टी मरणें   दृष्टी माया, भाता भूक   দৃষ্টিশক্তি   vision   eyeshot   दृष्टिः   దృష్టి   ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ   दृष्टि   visual modality   visual sense   नदर   കാഴ്ച   দৃষ্টি   ଦୃଷ୍ଟି   பார்வை   નજર   ದೃಷ್ಟಿ   नोजोर   view   sight   choriovetinitis   artist's vision   अन्जार   binocular vision   साखाळा   धुवाटी   stereoscopic vision   अधोदृष्टी   खरागणें   खिळणे   आंगठसा   चिडचिप   चिडीचिप   आसुमाई   कृपादृष्टी   दृष्टीस फांटा फुटणें   धनीने सुझे ढांकणीमां, पडोशीने सुझे आरसीमां   सत्तीस   उठी   आंधळा   आणियाळें   काकदृष्टी   कुलीयात   धावती   निंबलोण करणें   निकरट   निसरबोडी   अंतर्चक्षु   गोरटी   घूकदृष्टि   कामला   कामळ   उल्बाण   कडिये   कडियेला   आहाळबाहाळ   एकवाट   एकवाटी   कुलियात   येकवोढी   दृष्टि घालणें   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   सपा   अंधळा तिंधळा   अंधळा तिरळा   गोरटा   खेचरी मुद्रा   जळजळीत   तमाषबिनी   ढींव   उपनणें   कुची   दिपणे   वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ   शंकित   देखणा   आलाफ   उपहसित   नजरेचा खेळ   राहट   रुष्ट   अंतर्मुख   अठी   खेचरी   आज्ञाचक्र   चांचरी   चाचारी   चाचारें   भडका   देखी   निंबलोण   घार   चाचरी   उफराटा   उल्बण   नाट्य   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP