|
स्त्री. १ लहान टिकला , ठिपका . २ वाफ्यांतून उपटून दुसरीकडे पुन्हां लावावयाचें भाजीपाल्याचें रोप , रोपटें . ३ बायकांच्या कपाळावर लावतात तो कुंकवाचा , काचेच्या लहान तुकडयाचा लहान टिकला ; लहान वाटोळी वस्तु ( अभ्रक , मेण , पोळी , रोटी , कांच , जरतार , झीग इ० ची ); लहान पोळी ; चांदकी . ४ एक औषधी वनस्पति . हिचीं पानें नखाएवढीं बारीक व फुलें तांबडीं किंवा पांढरीं असतात . [ टिकला , लघुत्वदर्शक ] ०मिकली स्त्री. टाकमटिकला ; वेणीफणी ; नट्टापट्टा ; चट्टीपट्टी ; टिळाटोपी ; नखरा . [ टिकली ]
|