-
स्त्री. १ चलनवलनादि क्रिया , व्यापार ; ( जिवंत प्राण्याची ) हालचाल ; चळवळ . जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे । - ज्ञा ३ . ५३ . २ हावभाव ; वेडीवांकडी उडी ; प्रयत्न . ३ खोडी ; चीड आणणारें कृत्य ; टवाळकी ; खिजवणारें भाषण . ४ दुसर्याला सतावण्याला एखाद्या पिशाच्चास उठवणें . [ सं . चेष्टा = हालचाल , चलनवलन , कर्म ]
-
०करणें थट्टा करणें ; चिडविणें ; खिजविणें . - वणें , विणें - सक्रि . १ एखाद्याला दुसर्याविरुध्द भांडण्यास प्रवृत्त करणें . २ एखाद्याविरुध्द पिशाच्चाला चेतविणें , उठविणें . [ चेष्टणें ] - ष्टेखोर , बाज - वि . थट्टेखोर ; मस्करी करणारा ; खोडया , टवाळया , कुचाळया करणारा .
-
०वणी स्त्री. १ खोडी ; कुचाळी ; चीड आणणारी गोष्ट . २ ( एखाद्याविरुध्द ) पिशाच्चास चेरवणें . [ चेष्टाविणें ]
-
०वणीचें न. १ ( एखाद्यास सतावण्याकरितां ) चेतविलेलें , उठविलेलें भूत , पिशाच . २ ( ल . ) ( एखाद्याविरुध्द ) भांडण करण्यास चिथविलेला शांत व निरुपद्रवी मनुष्य .
Site Search
Input language: