|
पु. भिजविलेल्या पिठाचा गोळा . ( भाकरी , पोळी करण्यासाठीं तयार केलेला ). उडीद आणि तांदूळ यांच्या पिठाचे गोळे शिजवून एक खाद्य पदार्थ तयार करतात तो ; खाजी करंजी , घ्याजी दाजी , आग्रह करिती , साखरमांडा , उंडा भर पुरणाचा धोंडा । - अमृत ७३ . आमच्या आया तुमच्या आया । खातील काय दूध उंडे . - भोंगा गोळा . तोचि दधी भाताचा उंडा वामकरी । - दाव ३८५ . ( कर्ना . ) लाडू ; गुंडाळें ( उंडी = लाडू ). आळवाच्या पानाच्या वड्या करण्याकरतां पानांस पीठ लावून तीं गुंडाळून त्यांचे किंवा कळण्याचे वरवंट्याच्या आकाराचे गोळे करतात ते , नंतर ते शिजवून , कापून , तळून वड्या करतात . [ प्रा . उंडी = गोळा , पिंड ; का . उंडे = गोळा ; ता . ते . तु . वगैरे सर्व भाषांतूनहि हा शब्द आढळतो . गो . उंडो ]
|