Dictionaries | References

अष्ट

   
Script: Devanagari
See also:  अष्ट०ग्रह

अष्ट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आठ, आठ

अष्ट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Eight.

अष्ट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
a Eight.

अष्ट     

 पु. बुध , शुक्र , पृथ्वी , मंगल , गुरु , शनि , युरेनस व नेपच्यून .
वि.  आठ संख्या ; सामाशब्द - अष्टगुण , अष्टादश , अष्टविंशति व पुढील शब्द . [ सं . अष्टन ]
०बंध  पु. ( महानु .) अष्टकुल चलपर्वत . ' अष्टबंध पृथ्वीस '. ' अष्टकुलाचळे पर्वतें मेरुमेखला बंध ' - प्रमेय .
०क  न. 
आठ पदार्थांचा समुदाय .
०भोग  पु. सुंगध , वनिता , वस्त्र , गायन , तांबूल , भोजन , शय्या , द्रव्य . - व्यवको .
०वर्ग  पु. आपल्या कुलांतील आठ मनुष्यांचा सत्कार ; विवाहसमयीं दांडार्‍या वेली शेज ( पहा ) नंतरक करतात . उपनयनांतक मातृभोजनाचे वेळीं आठ मुंजे जेऊं घालतात .
पाणिनीच्या व्याकरणाचे ( सूत्रपाठाचे ) आठ विभाग आहेत त्यांतील प्रत्येक .
०विकृति   ( ऋग्वेदाच्या )- पद , क्रम . चजे , माला - शिखर रेखा - ध्वज , दंडक्रम , रथक्रम धन ( सं .)
ऋग्वेदसंहितेचे पठणाच्या सोयीकरतां आठ भाग केले आहेत , त्यांतील प्रत्येक .
आठ श्लोकांचा समूह ; एक काव्यरचनापध्दति . उ० मंगलाष्टकें , करुणाष्टके . [ सं . ] - वि . आठ किंवा आठवा .
०कपाळ्या वि.  
अष्टांगें - दोन हात , दोन पाय , दोन गुडघे , वक्ष : स्थळ आणि कपाळ इतक्यांचा उपयोग करुनहि ज्यास कांहीं मिळत नाहीं तो .
( ल . ) पूर्णपणें दुर्दैवी ; आपदग्रस्त ; भद्र्या ; कपाळकरंटा .
०कर्णिका  स्त्री. कमळाच्या पाकळ्या . माझें ह्रदय दिव्य कमळ । जें तेजोमय परम निर्मळ । अष्टकर्णिका अतिकोमळ । मध्यें घननीळ विराजे । - ह ३५ . १ .
०कुलाचल  पु. मेरुच्या चारी दिशांस जे भारतादि वर्ष आहेत या प्रत्येकाची मर्यादा करणारे ( नील , निषध , विंध्याचल , माल्यवान , मलय , गंधमादन , हेमकूट , हिमालय इ० ) आठ पर्वत .
०अष्टकोन   नी णी वि . आठ सुगंधीं द्रव्यें ( चंदन , अगरु , देवदार , कोष्टकोलिंजन , कुसुम , शैलज , जटामांसी , सुरगोरोचन ) एकत्र करुन केलेलें गंध ; ( सामा , ) उटणें .
०गुण वि.  आठपट . - पु . आठगुण . ब्राह्मणाचे आठ गुण - दया , क्षांति , अनसूया , शौच , अनायास , मंगल , अकार्पण्य , अस्पृहा . बुध्दीचे आठ गुण - शुश्रूषा श्रवण , ग्रहण , धारण , चिंतन , ऊहापोह , अर्थविज्ञान , तत्त्वज्ञान .
०गोल   गोली - वि . - कांठापदरांवर वेलबुट्टी काढलेला ( चौपदरी शेला ). कोणासी पागोटें परकाळा । कोणी मागती अष्टगोली शेला - भक्तवि . ३० . ४१ . [ सं . अष्ट + गोल ].
०गोळी   क्रिवि . सर्वतर्‍हेनें ; एकंदर .
०घाण  स्त्री. अतिशय दुर्गंधी - घाण . [ अष्ट + घ्राण ].
०ताल   झंपाताल पहा . दल वि . आठ पाकळ्यांचें ; आठ पानांचें ; अष्टकोनी ; अष्टभुज . - न .
कमळाच्या आकाराची काढलेली आठ पाकळ्यांचीं किंवा भागांची आकृति . गर्भे रचिलीं उदंडें । अष्टदळें । - ऋ ७३ .
एक प्रकारची रांगोळी .
( ना . ) ताम्हण ; संध्यापात्र ; एक अष्टदळ आणवा .
०दानें  न. अव . आमान्न , उदकुंभ , भूमि , गोदान , शय्या , वस्त्र , छत्र , आसन हीं आठ वस्तूंचीं दानें और्ध्वदेहिकांत द्यावयाचीं असतात .
०दिकपाल  पु. अंतरिक्षाच्या आठ दिशा पालन करणार्‍या देवता . जसें - पूर्वेचा इंद्र , आग्नेयीचा अग्नि , दक्षिणेचा यम , नैऋत्येचा नैऋत , पश्चिमेचा वरुण , वायव्येचा मारुत , उत्तरेचा कुवेर ( सोम ), ईशान्येचा ईश ; अष्टदिग्पाल . इयेवरी सप्तसागर । मध्यें मेरु महाथोर । अष्टदिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिले ॥ - दा ४ . १० . ४ .
०दिग्गज  पु. ऐरावत , पुंडरीक , वामन , कुमुद , अंजन , पुष्पदंत , सार्वभौम , सुमतीक असे अष्ट दिशांस पृथ्वीचे आधारभूत आठ हत्ती आहेत . [ सं . ]
०दिशा  स्त्री. आठ दिशा ; दिकचक्राचे आठ भाग - पूर्व , आग्नेय , दक्षिण , नैऋत्य , पश्चिम , वायव्य , उत्तर , ईशान्य .
०देह  पु. देहाचे आठ प्रकार - पहिले चार पिंडीं व पुढील चार ब्रह्मांडीं . स्थूल , सूक्ष्मकारण । महाकारण , विराट , हिरण्य । अयाकृत , मूलप्रकृति जाण । ऐसे अष्ट देह । - दा ८ . ७ . ४० .
०धा वि.  आठ प्रकारचे ; भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे । [ सं . ]
०धामूर्ति  स्त्री. आठ प्रकारच्या मूर्ती . शैली दारुमयी लौही लेप्या लेख्याच सैकती । मनोमयी मणीमयी प्रतिमा अष्टधा स्मृता ॥ - एभा २७ . ९८ - १०३ ; शैली , दारुमयी , लेप्या , लेख्या , सैकती अथवा सूर्यमंडळीं , जळीं , स्थळीं , अष्टमूर्तिस्वरुप श्रीहरीसी पूजावें । - अमृतध्रृव ६ . अष्टमूर्ति पहा .
( देह ) प्रकृति - स्त्री . पृथ्वी , पाणी , अग्नि , वायु , आकाश मन , बुध्दि आणि अहंकार मिळून आठ प्रकारे विभागलेली ..... प्रकृति . - गीर ७१५ .
( विध ) प्रकृति - असाहि वाक्यप्रचार आहे . सत्व , रज , तम , व मूळ पांच तत्त्वें मिळून आठ प्रकारची प्रकृति पंच भूतें आणि त्रिगूण । ऐसी अष्टधा प्रकृति जाण । - दा ६ . २ . १४ .
०धातू  पु. सोनें , रुपें , तांबे , कथील , शिसें , पितळ , लोखंड , तिखें ( पोलाद ). कोणी पोलादाच्या ऐवजी पारा धरतात . अष्टधातु सायासें । जेवि वेधिजेति स्पर्शे । - ऋ २० .
०धार वि.  आठ धारा असलेलें . तंव तेणें साधकें एक अष्टधार आड धरिलें । - कृमुरा २२ . ९६ .
०नायका   नाईका स्त्री .
अव . श्रीकृष्णाच्या आठ आवडत्या पत्न्या - रुक्मिणी , सत्यभामा , जांबवंती , कालिंदी ( सूर्यकन्या ), मित्रवृंदा ( अवंतिराजसुता ), याज्ञजिती ( यज्ञजितकन्या ), भदा ( कैकेयनृपकन्या ), लक्ष्मणा ( महेंद्रनाथकन्या ).
इंद्राच्या आठ नायका - उर्वशी , मेनका , रंभा , पूर्वचिती , स्वयंप्रभा , भिन्नकेशी , जनवल्लभा , घृताची ( तिलोत्तमा ). अष्टनायिका येऊनि । सर्वां घरीं नृत्य करिती । - ह २६ . २२८ .
( साहित्य ) वासकसज्जा , विरहोत्कंठिता , स्वाधीनभर्तृका , कलहांतरिता , खंडिता , विप्रलब्धा , प्रोषितभर्तृका , अभिसारिका .
०नाग  पु. आठ जातीचे सर्प - अनंत , वासुकी , तक्षक , कर्कोटक , शंख , कुलिक , पद्म , महापद्म .
०पत्री वि.  
कोणत्याही विशिष्ट आकाराच्या ( क्राऊन , डेमी ) छापावयाच्या कागदाचीं आठ पृष्ठें होतील अशा तर्‍हेनें घडी पडणारें छापलेलें ( पुस्तक ) ( इं . ) ऑक्टेव्हो . पांच पांचशें पानांचें अष्टपत्री सांचाचें एक एक पुस्तक .
०पद  पु. 
कोळी वर्गांतील प्राणी - गोचीड , सूतकिडे , विंचू , कातीण वगैरे . ( इं . ) अर्कनिडा .
आठ पायांचा काल्पनिक प्राणी .
०पदरी वि.  आठ पदरांचा ( शेला ), आठसरांची ( माळ ), आठ पेडांचीं , धाग्यांची ( दोरी ) [ सं . अष्ट + पल्लव ]
०पदी  स्त्री. 
आठ पदांचा समुदाय .
आठ चरणांचें एक कवन ; कविताप्रकार .
०पाकूळ  न. ( लुप्त ). आठ पाकळ्याचें फूल .
०पाद   अष्टपद पहा .
०पुत्रा वि.  आठ पुत्र आहेत जिला अशी ( स्त्री ). सौभाग्यवती स्त्रीला असा आशीर्वाद देतात .
०पुत्री  स्त्री. विवाहामध्यें वधूला , काठाला हळद लावून नेसावयास दिलेलें शुभ्र वस्त्र . तिला पुष्कळ अपत्यें व्हावींत या इच्छेचें द्योतक . फेडिलें मायेचें वधूवस्त्र । अष्टपुत्र्या पीतांबर । नेसली कृष्णमय स्वतंत्र । तेणें सुंदर शोभली । - एरुस्व १६ . १५ . म्ह० अष्टपुत्री मेहुणीकुत्री .
०पैलू वि.  
ज्याला आठ पैलू ( बाजू ) आहेत असा ( हिरा , रत्न ).
( ल . ) हुषार ; कलाभिज्ञ ; व्यवहारचतुर ( इसम ).
०पैलू   - ( गोफ ) स्त्री . घोड्याच्या गळ्यांतील दागिना ; आठ पैलू असलेल्या मण्यांची माळ किंवा आठ पदर असलेली माळ .
माळ   - ( गोफ ) स्त्री . घोड्याच्या गळ्यांतील दागिना ; आठ पैलू असलेल्या मण्यांची माळ किंवा आठ पदर असलेली माळ .
०प्रकृति   
०विधप्रकृति   अष्टधाप्रकृति पहा .
०प्रधान  पु. राज्यकारभारांतील आठ प्रधान - प्रधान , अमात्य , सचीव , मंत्री , डबीर , न्यायाधीश , न्यायशास्त्री , सेनापति . अष्टप्रधानांची पध्दत शिवाजीनें सुरु केली . कांहीं जण वैद्य , उपाध्याय , सचीव , मंत्री , प्रतिनिधी , राजाज्ञा , प्रधान , अमात्य हे आठ मंत्री समजतात प्रधान अमात्य सचीव मंत्री । डबीर न्यायाधिश न्यायशास्त्री ॥ सेनापती त्यांत असे सुजाणा । अष्टप्रधानीं नृप मुख्य जाणा ॥ हा श्लोक रुढ आहे .
०फली   ळी ,
०फळ   फल स्त्रीन . अटोफळी पहा .
०भार  पु. ८००० तोळ्यांचा एक भार . असे आठ भार . नित्य प्रसवे अष्टभार सुवर्ण । सूर्यासम प्रभा परिपूर्ण । - ह २५ . १५ .
०भाव  पु. अव . ( साहित्य . ) शरीराचे सत्त्वगुणाचे आठ भाव , प्रकार - स्तंभ , स्वेद , रोमांच , स्वरभंग किंवा वैस्वर्य , कंप किंवा वेपथु , वैवर्ण्य , अश्रुपात , प्रलय . पर्याय - कंप , रोमांच , स्फुरण , प्रेमाश्रु , स्वेद , हास्य , लास्य , गायन . - हंको . आठवीया दिवशीं नाश अष्टभावा । अद्वयानुभवासुखें राहे ॥ - ब ११० . अष्टभावें होऊनि सदगद । आनंदमय जाहला ।
०भैरव  पु. भैरव ही शिवगणांतील स्वतंत्र देवता असून तिचीं पुढील आठ स्वरुपें आहेत - असितांग , संहार , रुरु , काल , क्रोध , ताम्रचूड , चंद्रचूड , महा . यांतील कांहीं नांवांऐवजीं कपाल , रुद्र , भीषण , उन्म्त्त , कुपति इत्यादि नांवें योजेलेलीं आढळतात .
०भोग  पु. आठ प्रकारचे भोग :- अन्न , उदक , तांबूल , पुष्प , चंदन , वसन , शय्या , अलंकार .
०म वि.  आठवा . - स्त्री . अष्टमा .
०मंगल वि.  ( विरु ) अष्टमंगळ .
ज्याचें तोंड , शेपूट , आयाळ , छाती व चार खूर शुभ्र आहेत असा ; कित्येकांच्या मतें ज्याचे पाय , शेपूट , छाती व वृषण शुभ्र आहेत व जो कटिप्रदेशीं भोवर्‍यांनीं युक्त ( नवांकित ) असून ज्याच्या कपाळावर कमलाकृति केसांचें वेटोळें असतें असा ( घोडा ).
( सामा . ) आठ शुभलक्षणांनीं युक्त असा ( घोडा ). - न . पुढील आठ मंगल वस्तूंचा समुदार - ब्राह्मण , अग्नि , गाय , सुवर्ण , घृत , सूर्य , जल व राजा . कांहींच्या मतें सिंह , वृषभ , गज , पूर्णोदककुंभ , व्यजन , निशाण , वाद्यें व दीप ( राज्याभिषेकाच्या समयीं या अष्ट मंगलकारक वस्तू लागतात ).
०मंगलघृत  न. वेखंड , कोष्ट , ब्राह्मी , मोहर्‍या , उपळसरी , सेंधेलोण , पिंपळी व तूप या औषधांच्या मिश्रणानें विधियुक्त बनविलेलें तूप . हें बुध्दिवर्धक आहे . - योर २ . ६७० .
०महारोग  पु. आठ मोठे रोग - वातव्याधि , अश्मरी , कृछ्र ( किंवा कुष्ठ ), मेह , उदर , भगंदर , अर्श ( मूळव्याध ). संग्रहणी , महारोग पहा .
०महासिध्दि   
अणिमा = शरीर अत्यंत सूक्ष्म होणें ;
महिमा = शरीर मोठें होणें ;
लघिमा = शरीर वजनांत हलकें होणें ;
प्राप्ति = सर्व प्राण्यांच्या इंद्रियाशीं त्या त्या इंद्रियांच्या अधिष्टात्री देवतांच्या रुपानें संबंध घडणें ;
प्राकाश्य = ऐकून ठाऊक असलेल्या व स्वर्गादि पारलौकिक स्थानीं , व दिसण्याजोगे इहलोकाच्या स्थानीं भोग व दर्शनाचें सामर्थ्य येणें ;
ईशिता = शक्तीची , मायेची व तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणीं व इतरांच्या ठिकाणीं असणारी प्रेरणा ;
वशिता = विषय भोगीत असूनहि त्यांच्या ठिकाणीं आसक्त न होणें ;
प्राकाम्य = ज्या ज्या सुखाची इच्छा करावीं तें तें सुख अमर्याद प्राप्त होणें . - एभा १५ . ४२ ते ४७ .
०मर्यादागिरी  पु. आठ मोठे पर्वत - हिमालय , हेमकूट , निषध , गंधमादन , नील , श्वेत , शृंगवान व माल्यवान . हे जंबुद्वीपांत असून ते त्यांतील नऊ वर्षां ( भागां ) च्या मर्यादा आहेत .
०मांगल्य  न. त्रैवर्णिकांचा एक संस्कार . अठांगुळें पहा .
०मातृका  स्त्री. आठ ईश्वरी शक्ती - ब्राह्मी , माहेश्वरी , कौमारी , वैष्णवी , वाराही , इंद्राणी , कौबेरी , चामुंडा . सामान्यत : कौबेरी सोडून या सात असतात . विवाहादि मंगलप्रसंगीं यांची पूजा करतात . वेगे आल्या अष्ट मातृका । एकी चढिन्नली वृश्चिका । वाराही ते सूकरमुखा । वर्‍हाड देखा निघालें ॥ - एरुस्व १४ . ५८ .
०मांश  पु. 
आठवा अंश ; भाग .
( वैद्यक ) ज्वर नाहींसा होण्यासाठीं आठभाग पाण्याचे सात भाग आटवून एक अंश उरवितात तो काढा .
०मी  स्त्री. चांद्रमासांतील प्रतिपदेपासून आठवी तिथि ; या महिन्यांतून दोन येतात - शुध्द व वद्य .
०मूर्ति  स्त्री. पृथ्वी , जल , तेज , वायु , आकाश ; सूर्य , चंद्र व ऋत्विज या परमेश्वराच्या आठ मूर्ति ; शंकर ; महादेव ; अष्टधामूर्ति पहा .
०योगिनी  स्त्री. अव . आठ योगिनी ; पार्वतीच्या सख्या ; या शुभाशुभ फल देणार्‍या आहेत - मंगला , पिंगला , धन्या , भ्रामरी , भद्रिका , उल्का , सिध्दा , संकटा . दुसरा पाठ - मार्जनी , कर्पुरा तिलका , मलयगंधिनी , कौमुदिका , भेरुंडा , माताली , नायकी , जया ( शुभाचारा ). यांत कधीं कधीं सुलक्षणा , सुनंदा हींहि नांवें आढळतात .
०वक्र   अष्टावक्र पहा .
०वर्ग  पु. 
आठ औषधींचा समुदाय - ऋषभ , जीवक ; मेद , महामेद , ऋध्दि , वृध्दि , काकोली , क्षीरकाकोली .
मौजीबंधनांत मातृभोजनांत भोजनाच्या वेळीं आठ मुंज्या मुलांना भोजनास बोलावितात तें कर्म
०वर्ग्य   र्ग्या पु . अष्टवर्गास जेवणारा बटु ; उपनयनाच्या दिवशीं मातृभोजनाच्या वेळीं आठ बटू भोजनास बोलावितात ते प्रत्येक .
०वर्षा वि.  आठ वर्षे वयाची ( कुमारिका ); ( त्यावरुन लग्नाला योग्य झालेली ) उपवर .
०वसु  पु. अव . प्रतिमन्वंतरांतील आठ वसू . चालू मन्वंतरांतील धर्मऋषि व दक्षकन्या वसु यांचे पुत्र - धर , ध्रुव , सोम , आप , अनिल , अनल , प्रत्यूष , प्रभास . भागवतांत द्रोण . प्राण , ध्रुव , अर्क , अग्नि , दोष , वसु , विभावसु अशीं नांवें आढळतात . इंद्र चंद्र वरुण कुबेर । अष्टवसु गंधर्वकिन्नर । - ह २५ . १४१ .
०वायन  न. आठ वस्तूंचे दान ; हळकुंड , सुपारी , दक्षिणा , खण , सूप , कंकण , धान्य , कांचमणी , या आठ पदार्थांचे वायन ( वाण ) सौभाग्यसंपादनार्थ लग्नांत आठ ब्राह्मणांपैकीं प्रत्येकाला वधूकडून दिलें जातें .
०विध   - स्त्री . समाधियोगाचे आठ प्रकार - यम , नियम , आसन , प्राणायाम , प्रत्याहार , धारणा , ध्यान व समाधि .
समाधि   - स्त्री . समाधियोगाचे आठ प्रकार - यम , नियम , आसन , प्राणायाम , प्रत्याहार , धारणा , ध्यान व समाधि .
०विधा   - ( साहित्य ) अष्टनायका पहा .
शृंगारनायका   - ( साहित्य ) अष्टनायका पहा .
०विनायक  पु. अव . गणपतीचीं आठ स्थानें - १ मोरेश्वर गणनाथ , ( जेजुरी नजीक मोरगांव जिल्हा पुणें ). २ बल्लाळेश्वर ( मूळ मुरुड हल्लीं पाली , खोपवली नजीक - जिल्हा कुलाबा ). ३ विनायक ( कर्जत नजीक मढ - जिल्हा कुलाबा ). ४ चिंतामणी ( लोणी नजीक थेऊर - जिल्हा पुणें ). ५ गिरिजात्मक ( जुन्नर नजीक लेण्याद्रि - जिल्हा पुणें ). ६ विघ्नेश्वर ( जुन्नरनजीक ओझर - जिल्हा पुणें ). ७ गणपति ( नगर सडकेवर रांजणगांव - जिल्हा पुणें ). ८ गजमुख ( दौंड नजीक सिध्दटेक - जिल्हानगर ).
०विवाह  पु. विवाहाचे आठ प्रकार - १ ब्राह्म = सालंकृत कन्यादान ; २ गांधर्व = उभयतांच्या अनुमतीनें ; ३ राक्षस = जबरीनें कन्या हरण करुन ; ४ दैव = यज्ञप्रसंगीं ऋत्विजास कन्यादान करुन ; ५ आर्ष = गाय , बैल घेऊन कन्यार्पण ; ६ प्राजापत्य = धर्माचरणार्थ कन्यार्पण ; ७असुर = शुल्क घेऊन ; ८ पैशाच = कन्या चोरुन आणून पत्नी करणें . सविस्तर माहिती धर्मसिंधु परिच्छेद ३ पूर्वार्ध पहा .
०सात्विक   - अष्टभाव पहा .
भाव   - अष्टभाव पहा .
०सावध वि.  पुष्कळ गोष्टींकडे एकदम लक्ष पुरविणारा - देणारा ; अष्टावधानी .
०सिध्दि   अष्टमहा सिध्दि पहा . अष्ट सिध्दि चामरें घेऊनी । वरी वारिती अनुदिनीं । - ह १ . १५ .
०सृष्टि  स्त्री. काल्पनिक , शाब्दिक , प्रत्यक्षा , चित्रलेपा , स्वाप्नी ( स्वप्नसृष्टि ), गंधर्वा , ज्वरिका ( ज्वरसृष्टि ), दृष्टिबंधना . - दा ६ . ६ . ५१ . [ सं . ].
०क्षार  पु. पळस , निवडुंग , सज्जी , अघाडा , रुई , तीळ , जव व टांकणखार .

अष्ट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अष्ट  mfn. 1.mfn. (√ अक्ष्; cf.निर्-√ अक्ष्) ‘marked, branded’, only in comp. with -कर्ण
अष्ट   2.fr.1.अश्. See अ॑-समष्ट-क्°.
अष्ट   3 (in comp. for अष्टन्).
अष्ट   4. or अष्टा with the final अ,आ blended in comp.

अष्ट     

noun  सप्ताधिकम् एकम् अभिधेया।   Ex. चत्वारः अधिकं चत्वारः अष्ट जायते।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अष्टौ
Wordnet:
asmআঠ
bdदाइन
benআট
gujઆઠ
hinआठ
kanಎಂಟು
kasٲٹھ , ۸ , 8
kokआठ
malഎട്ട്
marआठ
panਅੱਠ
telఎనిమిది
urdآٹھواں , ۸واں
adjective  सप्ताधिकम् एकः।   Ex. अस्य ग्रन्थस्य अष्ट काण्डाः सन्ति।
MODIFIES NOUN:
क्रिया दशा तत्वम्
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
Wordnet:
asmআঠ
benআট
gujઆઠ
hinआठ
kanಎಂಟು
kasٲٹھ
kokआठ
malഎട്ട്‌
marआठ
mniꯅꯤꯄꯥꯟ
nepआठ
oriଆଠ
panਅੱਠ
tamஎட்டு
telఎనిమిదైన
urdآٹھ , ہشت , ۸ , 8

Related Words

   अष्ट   eight   अष्ट-कर्ण   अष्ट कुलाचल   अष्ट दानें   अष्ट दिक्पाल   अष्ट दिग्गज   अष्ट (देह) प्रकृति   अष्ट धातु   अष्ट नाग   अष्ट नायका   अष्ट प्रधान   अष्ट भैरव   अष्ट मंगल   अष्ट मंगल घृत   अष्ट मर्यादागिरी   अष्ट महारोग   अष्ट महासिद्धि   अष्ट मातृका   अष्ट मुद्रा   अष्ट मूर्ति   अष्ट योगिनी   अष्ट लवण   अष्ट लोह   अष्ट वर्ग   अष्ट वसु   अष्ट वायन   अष्ट विनायक   अष्ट विवाह   अष्ट सिद्धि   आठ   8   viii   ٲٹھ   ఎనిమిదైన   eighter   eighter from decatur   octad   octet   octonary   ogdoad   আট   আঠ   दाइन   എട്ട്   ਅੱਠ   ଆଠ   આઠ   எட்டு   ಎಂಟು   ఎనిమిది   अष्टौ   octose   अष्टास्तना   अष्टास्र   अभ्रनागः   दुर्मिलः   मृष्टशलाक   octa-   रासः   घनमूलम्   सिन्धुरः   सानिटः   आटुक   आट्टखुरी   आठिव   आभारः   अट्ठावन्न   अष्टभावः   अष्टमूर्त्ति   अष्टसिद्धिः   आटकूल   डंडळविणे   बङ्गलुरु आनुग्रामिकमण्डलम्   पुर्य   अष्टकमलम्   अष्टदिश्   अष्टलोहक   अष्टश्रवस्   अष्टारचक्रवत्   अष्टास्त्र   आस्तारपङ्क्तिः   पदं   सुखः   आपवणें   अष्टविध   अष्टाङ्गयोगः   अवधातु   octennial   सुरसाष्ट   अठ्ठा   गमनपिण   अष्टकर्ण   अष्टगव   अष्टचत्वारिंशत्   अष्टमान   अष्टागव   अष्टावधानी   अष्टाह   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP