-
पु. १ विस्मरण ; विस्मृति ; आठवण नाहींशी होणें . विसर हा बरा काय । - मोआश्रम २ . १०२ . २ विसराळूपणा ; स्मरणशक्तींतील दोष , व्यंग . ३ स्मृतिभ्रंश ; भ्रम ; भूल ; भुरळ ; धारणाशक्तीचा र्हास . ( क्रि० पडणें ; होणें . ) [ सं . वि + स्मृविस्मरण ; प्रा . विस्सरण ] विंसर पाडणें , विंसर घालणें - विसरावयास लावणें . जो मातृस्नेहाचा चित्तीं स्नेहें निजें विसर घाली । - मोभीष्म ४ . ३९ . विसरीं पाडणें - विसरविणें ; विसरावयास लावणें . विसरणें - अक्रि . १ विस्मृति होणें ; विसर पडणें ; आठवण न राहणें . पशु चरों विसरेती - दाव १८३ . २ हयगय करणें ; हेळसांड करणें . कीं देहभावो विसरैली । - दाव १७२ . विसरत बोलणें - असंबध्द , विसंगत बोलणें ; विचूक बोलणें . डुलत चालणें । विसरत बोलणें । नेणों काकहास्य करणें । श्रीहरी नाथासीं । विसरभोळा , विसरभोळया - वि . विसराळु ; विसरण्याचा स्वभाव असलेला ; निष्काळजी ; बेफिकीर . विसरभोळया - क्रिवि . विस्मरणामुळें ; विसराळूपणानें ; चुकून ; हयगयीनें ; अज्ञानामुळें . विसरशील - विसराळू . - मोऐषिक १ . १९ . विसरसांड - स्त्री . दुर्लक्ष्य ; हेळसांड ; हयगय ; क्षमा ( अपराधाची ). विसराळू , विसराळ - वि . १ विसरभोळा ; लवकर विसरणारा ; विसरण्याचा स्वभाव असलेला . २ निष्काळजी ; हयगयखोर ; बेफिकीर . विसरी - स्त्री . विस्मृति ; विस्मरण ; विसर . ते भोगूनि त्याची विसरी पडे जिवा । - सिसं ७ . १६ . पाडून विसरी अवचित कोणीकडून येतो । ठरवून दृष्टीहि वत्सें सोडून देतो । - होला ३६ विसरून - क्रिवि . विस्मरणानें ; चुकून . परी कहीं न करिशी संभाषण । विसरौनियां । - शिशु ८८ .
-
ना. भूल , लक्षात , न राहणे , विस्मरण , विस्मृती , स्मृतिभ्रंश .
-
Forgotten state, oblivion. Forgetfulness, badness of memory. 3 Loss of memory or remembrance of. v पड, हो. विसरीं पाडणें To cause to forget; to blind, lull, beguile, put to sleep. Also विसर पाडणें with in. con. विसर पडणें g. of s. To be forgotten.
-
विसरः [visarḥ] 1 Going forth.
Site Search
Input language: