Dictionaries | References

See also:  ओम्
महानुभवी वाड्‌मयांत व बाराव्या आणि तेराव्या शतकांतील जुन्या मराठी वाड्‌मयांत ओ किंवा वो ऐवजीं ' ॐ ' हें अक्षर लिहिण्याचा प्रघात होता . ' देॐ आत्मरमणु । मी कामबाणी विच्छिन्नु ॥ ' - ऋ ४६ .
अ.  अ = विष्णु , उ = शिव , म = ब्रह्मा , ह्माप्रमाणें तिन्ही देवांचें वास्तव्य या शब्दांत आहे .
अ.  
 1. वेद . पुराण , पोथी , स्तोत्र इ० म्हणण्यापुर्वी वसंपविल्यानंतर जो पवित्र शब्द उच्चारतात तो ; प्रार्थनेच्या वेळीं प्रारंभी उच्चारावयाचा शब्द . ' ओम् नमोजी गणनायका । '; ' ओम् श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य । '
 2. आरंभ ; उपक्रम . ३ प्रणवब्रह्मा ; शब्दब्रह्मा ; एकाक्षर ब्रह्मा . ' ॐनमोजी आद्या ॥ ' - ज्ञा १ . १ .
 3. वैदिक काळीं ( मांडुक्य उपनिषदांत ), अ = वैश्वानर , उ = तैजस , म = प्राज्ञ , ओम् = अतर्क्य , अवाच्य व ज्यामध्यें सर्व जगाचा समावेश होतो असें ब्रह्मा , असा अर्थ होता . ओम् हें अक्षरें प्रथम उपनिषदांत आढळतें ,

०कार   ओम् पहा .
०तत्सत्   ॐ (= ब्रह्मा ), तत् (= तें ), सत् (= खरें ,) फक्त ब्रह्मा हें खरें किंवा शाश्वत आहे . ' ओम् , ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु । ' मंत्र किंवा एखादें कर्म एखादें कर्म संपविल्यानंतर हें वाक्य म्हणण्याचा परिपाठ आहं . लक्षणेनें याचा अर्थ संपविनें , पाणी सोडणें असा आहे . ' ॐ तत्सत ब्रह्मार्पण सेवट । ' - दावि २६ .
०पुण्या, पुण्याहम्   
 1. मी प्रणवरूप पुण्यस्वरुप आहें अशा अर्थाचा मंत्र . एखाद्या मंगल संस्कारापूर्वी स्वस्तिवाचन नांवाचें कर्म केलें जातें त्यामध्यें संस्कारकर्त्या यजमानास ब्राह्मण ' ओं पुण्याहं ' असा आशीर्वाद दंत असतात . ' चिंदब्रह्मोंसि लग्न लाविशी । ओं पुण्येसी तत्वता । ' - प्रभा ८ . १ .
 2. लग्न मंत्राचा आरंभ , पुण्याहवाचनाचे वेळीं म्हणण्यांत येणारें मंत्र . ' ॐ पुण्याह म्हणोनियां जाण । लाविलें उभयतांचें लग्न ॥ '- जै ५६ . २० .

०फस होणें   
 1. निष्फळ होणें ; फसणें . ' परिक्षा नापास झाल्यामुळें त्याचे सारे बेत ओंफस झाले व पुन्हां तो कॅलजची वारी करुं लागला .'
 2. लयास जाणें , नायनाट होणें . ( ओम् + फस् = फु फुटल्याचा आवाज )

०भवति   
 1. ( भिक्षां देहि ). बाई भिक्षा वाढा , असा भिक्षा - मागतांना म्हणावयाचा मंत्र .
 2. ( ल .) भिक्षा ( मागणें ); भिक्षाटन . ' नीट वागला नाहींस तर ओंभवती करीत फिरशील वरें !'

०भवति पक्ष   
 1. भिक्षावृत्ति ; भीक मागण्याचा पेषा . ' ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा । ओं ( वों ) भवति या पक्षा ! रक्षिलें पाहिजे॥ ' - दा १४ . २ . १ .
 2.  ( ल . उप .) अर्ज विनंत्या करून ( स्वराज्य ) मागणार्‍यांचा एक पक्ष ; मवाळ पक्ष .


Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP