Dictionaries | References

होळकरी टाकी

   
Script: Devanagari
See also:  होळकर टाकी

होळकरी टाकी     

जेजुरी हें होळकर घराण्याचें देवस्थान. तेथें नेहमीं त्या सरकारचीं काहींना काहीं बांधकामें चालू असतात. त्यामुळें त्या ठिकाणीं अनेक इमारती दिसतील. यावरुन कधीं न संपणार्‍या किंवा फार दिवस चालणार्‍या कामासंबंधानें म्हणतात. रेंगाळणार्‍या कामास कोणी कंटाळला म्हणजे ‘ तुझी होळकरी टाकी चालू दे, म्हणजे काम शेवटास जाईल ’ असे धीराचे शब्द सांगण्यांत येतात. -भारतवर्ष, जुन्या ऐति. गोष्टी, पृ. १९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP