TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

सरकार

See also कुंपणी
ना.  राज्यकारभार चालवणारी यंत्रणा , राज्यसत्ता , राज्यसंस्था , शासनसंस्था .
नस्त्री . १ शासनसंस्था ; राज्यसंस्था ; देश , प्रांत , संस्थान वगैरेचा राज्यकारभार चालविणारी सत्ता . २ राजा ; राज्यप्रतिनिधि ; राज्यधिकारी ; शासनसंस्थेचा प्रमुख ; सत्ताधिष्ठित व्यक्ति . ३ ( व्यापक ) कोणतीहि कचेरी ; जिल्हा , प्रांत , तालुका वगैरेची कचेरी ; न्यायाधीश व त्याची कचेरी ; तसेंच इतर कोणत्याहि खात्याच्या अधिकार्‍यास व त्याच्या कचेरीस हा शब्द सामान्यतः लावतात . अंमलदार ; अधिकारी वर्ग . सरकांर म्हणजे येथील अधिकारी वर्ग , इंग्लंडचे लोक नव्हेत . - टिव्या . ४ मालक ; धनि ; वरिष्ठ अधिकारी , व्यक्ति . सरकारचे घोडयावर मजसारख्यानें कसें बसावें . सरकारस्वारी येत आहे . - रत्नप्रभा २२ . ५ प्रांत ; देशविभाग . उत्तर सरकार कोठें कोठें सरकार हा सुभ्याचा किंवा प्रांताचा पोटविभाग आहे । - गांगा ४२ . सरकार जुन्नर - समारो १ . ६५ . ६ ( बंगाल ) हिशेबनीस ; घरचा कारभारी . [ फा . ] म्ह० सरकारचें तेल पदरांत घ्यावें . ( वाप्र . ) सरकारकामास येणें - लढाईत मरणें . सामाशब्द -
 स्त्री. इं . कंपनी ; ईस्ट इंडिया कंपनी ( इंग्रजाची ); हि हिंदुस्थानांत व्यापारी सनद घेऊन १६०४ . मध्यें आली पुढें हिनें हिंदुस्थानाचें राज्य कामावल्यावर तिला कुंपनी सर कार अशी संज्ञा . मिळाली . ( इं . कंपणी .)
०अमल   असामी - पु . सरकारी अंमल , सत्ता ; सरकारी मनुष्य .
०अमली वि.  सरकारावर अवलंबून ; सरकारच्या आश्रित , ताब्यांतील , अधिकारांतील . याचे उलट परभारा अमली म्हणजे इतर सत्तेखालील .
०खराब वि.  सरकारी पडीत जमीन .
०गुझश्त  स्त्री. गोष्ट ; हकीकत ; इतिहास ; परिस्थितीचा आढावा .
०जमा वि.  खालसा ; सरकारांत सामील केलेलें ; जप्त . मोरोपंतांना पन्हाळगडचें आपलें घर सरकारजमा करून पन्हाळगड सोडण्याची पाळी आली . - भक्तमयूरकेका ६ . पुस्तकें सरकारजमा करण्यांत आलीं असतीं . - केले १ . ३७ .
०धारा  पु. जमीन महसूल ; सरकारी देणें ; चावडी .
०महशूर वि.  १ कुप्रसिध्द ; सर्वांस माहीत झालेलें ; लहानापासून थोरांस ठाऊक असलेंले . २ सार्वजनिक ; सर्वश्रुत ; सर्वज्ञात .
०वाडा  पु. राजप्रसाद ; राजवाडा ; राजमंदिर ; राजाचें किंवा सरकारी अंमलदाराचें निवासस्थान ; सरकारी कचेरी .
०स्वारी  स्त्री. राजा ; धनी ; मालक ; वरिष्ठ अधिकारी . सरकारी - वि . शासनसंस्थेसंबंधीं ; राज्यासंबंधीं ; राज्याच्या मालकीचें ; राज्यव्यवस्थेसंबंधींचें ; राज्यकचेरीसंबंधीं . सरकारी अमल - पु . १ राज्यसत्तेचा अधिकार , हुकमत . २ शासनसंस्थेंतील अधिकार , पद , स्थान .
०असामी  स्त्री. १ सरकारांतील अधिकाराचें स्थान , नोकरी . २ सरकारी अंमलदार , अधिकारी .
०चिन्ह  न. सरकारी निशाणी , शिक्का , खूण , मुद्रा .
०जाहिरात  स्त्री. सरकारनें काढलेला जाहीरनामा , प्रसिध्दिपत्रक .
०तोहमत  स्त्री. सरकारचा दोषारोप , किटाळ , आरोप , वहिम ; घोरपड .
०नोकरी  स्त्री. सरकारांतील चाकरी , हुद्दा , अधिकार .
०पाहुणा  पु. ( ल . ) कैदी . सरकारी पाहुण्यांची बडदास्त सरकार नीट ठेवीत नाहीं . - के १२ . ७ . ३० .
०बोली  स्त्री. सरकारमार्फत लिलांव चालला असतां सरकारतर्फे आरंभीं पुकारण्यांत येणारा किंमतीचा आंकडा .
०रोखा  पु. सरकारनें आपल्या हमीवर काढलेल्या कर्जाचा दस्तऐवज ; सरकारी कर्जपत्र ; ऋणपट .
n f  The government of a state; the supreme power. The Government.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पोखरणें

  • v t  To hollow by scooping or scratching out, to excavate. To fleece, to 
  • $eat out$. 
RANDOM WORD

Did you know?

तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.