Dictionaries | References

लीळा

   
Script: Devanagari
See also:  लिळा , लीला

लीळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
As it were in play; easily. See अवलीळा.

लीळा     

 स्त्री. 
क्रीडा ; खेळ ; कौतुक ; मौज ; गुण . बुझावी हरी तेचि लीळा वदावी । - वामन , भामाविलास ( नवनीत पृ . ९८ ).
सहज घडणारी क्रिया ; स्वाभाविक गोष्ट - कृति . जयांचेनि लीलेमाजी नीति । जियाली दिसे । - ज्ञा ९ . १९२ .
( लीलावतार याचा संक्षेप ) विष्णूचा अवतार . - क्रिवि . ( काव्य ) सहज ; स्वाभाविकपणे ; खेळांतल्याप्रमाणे . लीलाकमल घेतां हाती । कृष्णचरण आठवती । - एरुस्व ५ . ६६ . [ सं . लीला ] लीलाधारी - पु . अवतार घेणारा .
०चरित्र  न. सहज केलेला चमत्कार . रविकुळी अवतरला श्रीधर । कैसे केले लीला - चरित्र । - रावि १ . १०३ .
०मुद्रा  स्त्री. खेळकर किंवा आनंदी चेहरा ( अर्जदाराच्या केविलवाण्या किंवा आशाळू चेहेर्‍याला उद्देशून कुत्सितपणे उपयोगांत आणण्याखेरीज इतर विशेष उपयोग नाही ).
०विग्रह  पु. लीलेने धारण केलेले शरीर ; भक्तांच्या इच्छा पुरविण्याकरितां देवाने धारण केलेला देह .
०विग्रही  पु. लीलेने देह धारण करणारा ; मौजेने देहधारी झालेला . तोचि जाहला जी साकार । लीलाविग्रही श्रीकृष्ण । - एरुस्व १ . २० . लीलांजन न . नीरांजन . [ लीला + अंजन ] लीलाधारण न . लीलावतार पु . लीलेने धारण केलेला अवतार ; विष्णूने केवळ लीला म्हणून घेतलेला अवतार [ लीला + अवतार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP