-
वि. १ दाताखालीं फोडतांना आवाज देणारा ; कुडकुडीत ; कुडूंकुंड वाजणारे ( तळलेले वाटाणे वगैरे ). २ अतिशय उष्ण ; कढत ( ऊन , पाणी इ० ). अति प्रखर ; ऐन ( दुपार ). ' कडकडित दुपारी चेंतला अग्निभारी । ' - मुंव १२६ . ३ ताजी ; तयार ; पक्की ; चांगली अवगत ( विद्या , ज्ञान ); त्या विद्येनें भूषित ( माणुस ). ४ भाडभीड न ठेवतां केलेलें ; स्पष्ट ; मोकळें खुलें ( भाषणें , व्यवहार ); अशा स्वभावाचा ; स्पष्टवक्ता ; तापट ( मनुष्य ). ५ अक्षरश ; शास्त्रोक्त आचरविचार पाळणारा ; फार सोवळा ; अत्यंत शुद्ध ; पवित्र ; कट्टा ( माणुस , सोवळें ) ' रामायणाचें वैशिष्ट स्थापन करणार्या अनेंक गोष्टीपैंकी कडकडीत चातुर्वर्ण्य ही एक गोष्ट असल्यामुळें आम्ही या गोष्टीस फार महत्व दिलें आहे .' - मसाप २ . २ . ११ . ' स्वतः पंतचरित्रकारहि तत्पूर्वीच्या पंतलेखकाचे बाबतीत कडकडीत सोंवळें राहिले आहेत असें नाही ' - भक्तमयूर केका प्रस्तावना १५ . ६ वाळलेलें आणि कडकड आवाज करणारें ; शुष्क ( कापड ). ७ नैष्ठिक ; अत्यंत नियमित ; न चुकतां पाळलेलें ; अतिशय कठिण ( व्रत , ब्रह्माचर्य , तपश्चर्या , वैराग्य इ० ). ८ खरेखुरें ; जागृत ( पिशाच्च , वारें , संचार ). ९ ( काव्य ) खडबडीत ; रखरखीत . ' तंव वल्कलें कडकडीत कठिन । नेसतां नये सीतेलागुन । ' - रावि १० . १४९ . ( ध्व . कडकड )
-
वि. कढत , प्रखर , फार गरम , रखरखीत ( पाणी , ऊन ;)
-
वि. काटेकोरपणे , न चुकता , नैष्ठिक ( व्रत , नियम पालन );
-
वि. अत्यंत पवित्र , फार सोवळा ( आचार धर्म );
Site Search
Input language: