Dictionaries | References

रेखणे

स.क्रि.  
क्रि.वि.  ओरडणे ; रेंकणे पहा . आडवे होऊनि रेखत गेले । - दावि ४८४ . [ रेंकणे ]
( जमीन , कागद , भिंत इ० वर ) रेषा किंवा रेघोट्या काढणे .
( चित्र , कांही आकृती ) भिंत , कागद इ० वर रेघांच्या योगाने काढणे .
घासून गुळगुळीत करणे .
( देव , साधु इ० च्या प्रतिमा मूर्ती ) मनांत ठसवून घेणे ; कल्पिणे . अंग , कपाळ इ० वर ( गंध इ० ) रेघांच्या रुपाने चिन्हित करणे . कोरणे ; नीट करणे ; प्रमाणांत लावणे , काढणे . चतुर्भुज माळा रुळे येकावळी । कस्तुरी निढळी रेखिलीसे । - तुगा ८ .
. वस्त्राच्या चुण्या किंवा डोईच्या केसांच्या पट्ट्या चापूनचोपून बसविणे .
वर्णन करणे ; बिंबविणे ; ठसा उमटविणे ; चित्रित करणे . ऐकोनि जो स्वहृदयांतचि रेखिला हो । प्रत्यक्ष तोचि नयनी हरि देखिला हो । [ रेखा , रेषा ] रेखला , रेखलिया - वि .
नीटनेटका ; प्रमाणबद्ध .
कोरीव ; कोरलेला ; रेखलेला ; सुंदर .
योग्य ; बरोबर ; तंतोतंत .
चित्र काढलेला . म्हणोनि माझी वैखरी । मौनाचेहि मौन करी । हे पाणियावरी मकरी । रेखिली पां । - अमृ १० . १७ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP