Dictionaries | References

बाही

See also :
बाह , बाहा , बाहे
quivering or itching to fight.
 स्त्री. बाहु ; हात . आदिशून्य तरोनि जावें । कैउतें बाहीं । - ज्ञा १० . १७८ . [ सं . बाहु ]
 स्त्री. 
( खांद्यापासून मनगटापर्यंतचा ) सबंध हात .
अंगरख्याचा हात ; अस्तनी . रक्तवस्त्रें भिजली बाही । - ऐपो १६१ .
दाराच्या चौकटीचे दोन बाजूचे दोन उभे खांब . दारापासीं येवोनि त्वरित । बाह्यांसि लाविले दोन्ही हस्त । - महिकथा ५ . २३ .
बाजू . कुंचे ढळती दोहीं बाहीं । - तुगा २७८ .
( व . ) मत ; बाजू . आमच्या बाहीं तो मेला .
०देणें   खांदा देणें ; मदत करणें ; हातभार लावणें .
०धरल्याची   धरणें - आश्रयास आलेल्याचें धर्मबुद्धीनें रक्षण करणें ; त्याची बाजू घेण्यांत अभिमान धरणें . बाह्या थापटणें , पिटणें , मारणें - लढण्याला तयार असल्याबद्दल दंड थोपटणें ; कुस्तीला तयार असणें . बाह्या फुरफुरणें , बाही फुरफुरणें , फुरारणें , उसासणें , उडणें - अंगांत लढण्याची खुमखुमी येणें ; मारामारीला उत्सुक असणें .
लाज   धरणें - आश्रयास आलेल्याचें धर्मबुद्धीनें रक्षण करणें ; त्याची बाजू घेण्यांत अभिमान धरणें . बाह्या थापटणें , पिटणें , मारणें - लढण्याला तयार असल्याबद्दल दंड थोपटणें ; कुस्तीला तयार असणें . बाह्या फुरफुरणें , बाही फुरफुरणें , फुरारणें , उसासणें , उडणें - अंगांत लढण्याची खुमखुमी येणें ; मारामारीला उत्सुक असणें .
०दार वि.  
पाठीराखा ; मदत करणारा ; बाजू घेणारा .
हमी देणारा ; जामीन होणारा , राहणारा .
०दारी  स्त्री. 
मदत ; पाठिंबा .
जामिनकी ; हमी ; जिम्मेदारी . ( क्रि० करणें ).
०दुट्टा  पु. 
चोळीच्या बाह्या होण्याइतका खणाचा किंवा कापडाचा तुकडा .
चोळीच्या दोन्ही बाह्या , अस्तन्या .
०बळ  न. मन गटांतील ताकद ; शरीरसामर्थ्य ; बाहुबल .
 f  A jamb (of a door).
 f 
बाहु  m  The whole arm. The sleeve of a garment.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.