Dictionaries | References

तोड
 स्त्री. १ इच्छेप्रमाणे होईनासे झालेले कार्य इच्छेप्रमाणे होण्याकरिता काढलेली युक्ति ; तडजोड ; समेट . ( क्रि० पाडणे ; तोडीवर येणे ). २ उपाय ; क्लृप्ति ; कल्पना ; तजवीज ; युक्ति ; शक्कल ; गूढ सोडविण्याकरिता काढलेला मार्ग , उलगडा . ( क्रि० पाडणे ). तो पंचवीस म्हणतो , तुम्ही वीस म्हणतां , सरासरी बावीसांवर तोड पाडा . ३ सर्वोत्कृष्ट , सरस कल्पना , शोध ; अपूर्व कृत्य ; वरचढपणा . ह्या चमत्कारिक यंत्रावर कोण्ही तोड करील काय ? हा गवई त्याच्या ध्रुवपदावर तोड करील . ४ अभावणीच्या अर्धेलीचा खोताच्या वहीमध्ये मांडलेला हिशेब . तोड व थळ ह्या दोन शब्दांमध्ये अर्थदृष्ट्या फरक आहे . पहिल्याचा अर्थ हिशेब असा आहे व दुसर्‍याचा अर्थ प्रत्यक्ष मोजलेली रक्कम असा होतो . प्रथम पिकाची अर्धेल अंदाजाने धरुन वहीत मांडण्यांत येते नंतर खोत व कूळ यांच्या परस्पर संमतीने प्रत्यक्ष वसूल किती घ्यावा हे ठरविण्यात येते , याप्रमाणे ठरलेला करार , व ठरविलेला वसूल . ५ एका बाजूने घडलेला , साफ केलेला धोंडा ; एकांगी चौरस दगड ; इमारतीस लागणार्‍या दगडाचा एक प्रकार . ह्याचे मागील तोंड पुढच्या तोंडापेक्षा सुमारे चार इंच कमी असते . हा एका बाजूने साफ व घडीव असतो . चबुतरे अगर ओटे तोडीच्या दगडाचे बांधतात . - भू १ . ६ ( मल्लविद्या ) आपल्यावर केलेल्या डावाचा प्रतिकार . त्याविरुद्ध करावयाची क्रिया , युक्ति . ७ लांकूड इ० तोडण्याकरितां त्यांत कुर्‍हाड इ० नी छेद करितात , घाव मारतात ती . त्या लांकडास वीतभर तोड घेतल्यावाचून ते तूटणार नाही . ८ लांकडाचा , दोरीचा वगैरे तोडलेला तुकडा ; तोडणी . ९ बांबूचे नळकांडे . - बदलापूर १३३ . १० एक बदलेली चाल ( लावणी इ० च्या कडव्यांतून रुढ . ); पद म्हणण्याची वेगळी धाटणी . [ सं . तुड = तोडणे ; प्रा . तोड ]
 स्त्री. १ ( व्यापक ) ( एकसारखा , समान ) डौल ; आकार ; प्रकार ; मान ; माप ; सांच ; मूस . ह्या तोडीचा घोडा कोठे नाही . २ जोड , बरोबरी करणारी व्यक्ति , वस्तु इ० हा बैल त्या बैलाची तोड आहे . [ का . तोडु = जोडी , सारखेपणा ]
 पु. ( ना . ) अनावर इच्छा ; लगट . तापाने फणफणारा इसम पाण्यावर फार तोड करतो .
 स्त्री. ( ना . ) ( सोंगट्याच्या खेळांत ) पहिल्यांदा शत्रूची सोंगटी विशिष्ट प्रकारे मारुन आपल्या सोंगट्या घरांत जावयास मार्ग करतात ती . ( कर . ) तोडी . [ तोडणे ]
 स्त्री. ( तंजा . ) कोंदण केलेली हिर्‍याची कुडी . [ का . ता . ]
०करणे   मात करणे ; पुढे जाणे . पुढे कित्येकांनी यावरही तोड करण्याचे मनांत आणले . - नि ८ . तोडीवर घेणे समेट करणे ; तोड पाडणे . तोडीस नेणे वादांतील मुद्द्यांचा निकाल लावणे . तोडीस तोड देणे डावावरडाव करणे .
.
ना.  उपाय , कल्पना , क्लृप्ती , तोडगा , मार्ग , युक्ती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP