Dictionaries | References

तुणतुणे

See also:  तुणतुने

 न. एक पक्षी . [ ध्व . ] म्ह ० मोर नाचे म्हणून तुणतुणे नाचे . ( मोठ्याचे अनुकरण लहानास उपहासास्पद होते यावरुन ). तुणतुणे - ने - न . गोंधळी लोकांचे एकतारी वाद्य . हे काडीने वाजवितात . यांतून साथीस उपयोगी असा तुणतुण आवाज निघतो . [ सं . तूणा ; प्रा . तुणय ; ध्व . ] ( वाप्र . )
०वाजविणे   लावणे ( ल . ) ऐकणारांना कंटाळा आला तरी पुन्हां पुन्हां आपलीच हकीगत सांगत सुटणे ; आपलीच गोष्ट पुन्हां पुन्हां काढणे ; स्वतःचे मत प्रतिपादणे . देशांत किती जोराने विचारक्रांति होत आहे याची या लोकांस दादच नाही , आपले प्रायश्चित्ताचे तुणतुणे ते अद्याप वाजवीतच आहेत . तुणतुण्या वि . १ तुणतुणे वाजविणारा ( गोंधळी इ० च्या मागे ). २ ( ल . ) दुसर्‍याची री ओढणारा ; बोलल्या गोष्टीचा मागून अनुवाद करणारा . [ तुणतुणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP