Dictionaries | References

तारांबळ

See also:  तारंबळ , तारामळ
ना.  गडबड , गोंधळ , घाई , त्रेधा , तिरपीट , धांदल , धावपळ .
tārāmbaḷa or tārāmaḷa f Commonly तारंबळ.
 स्त्री. १ त्रेधा ; धांदल ; तिरपीट ; गोंधळ ; गडबड ; व्यग्रता ( लग्न , मुंज इ० कांत ताराबल आवश्यक असते . ते साधण्याकरिता मुहूर्त चुकूं नये म्हणून फार धांदल , घाई करावी लागते त्यावरुन तारांबळ पहा . ). मी आपुल्या गृहींची एक । तारंबळ होतसे । - नव २०५५ . २ अडचण ; टंचाईची स्थिति ; ओढघस्तपणा ; खाण्यापिण्याची ददात ; आबाळ . [ सं . तारा = नक्षत्र + बल = बळ ]
 स्त्री. मुहुर्त साधण्यासाठी उडणारी घाई , धांदल . ( विरु . ) तारंबळ ; तारंबळ पहा . ( क्रि० होणे ; उडणे ). ( कदाचित मंगलाष्टके झाल्यानंतर मुहूर्त संपतो तेव्हा तदेव लग्नं ... ताराबलं चंद्रबलं तदेव इत्यादी घाईने म्हणतात त्यावरुन ). एकंदर राज्याची जरी तारांबळ झाली होती तरी तो कबूल झाला नाही . - नि . [ तारा + बल ]
 f  Botheration. Distress.
तारांबळ उडणें   To be in distress or bewilderment.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP