-
पु. १ मोठा दगड ; पत्थराची जमीन ; दगडाची रांग ; कातळ ; शिळा , धोंडा ; खडपा ; पाषाण . ' ज्वालामुखींतुन चळवळींत रस बाहेर घेऊन ... त्याचें थराथर थर बसतात . या थरांतील उष्णता निघुन गेली म्हणजे त्यांचेच खडकाचे थर बनतात .' - सृष्टि ( खगोल ) ३८ . २ कातळांचा समुह ; शिला . ३ मोठा खडक ; कातळ . ४ ( ल .) कठोर , अंतःकरणाचा ; पाषाण . हदयीं माणुस . ' खडकाशीं धडका घेऊन काय फळ . ' म्ह०खडकावर पेरलें व्यर्थ गेलें . - वि . १ वाळुन कोरडा ठणठणीत झालेला ; खडखडीत ( धुतलेलें कापड , काष्ठ ); ' हीं काष्ठें खडक झाली आहेत .' अगदी कोरडी , आटलेली ( विहीर , तळें गाई - म्हशींची कास , किंवा एखाद्या स्त्राचें स्तन ). ३ लक्ख ; चकचकीत ( प्रभात , उषा ). ४ तीव्र , कडक ( ऊन , भूक .) याशिवाय आत्यंतिक , पुर्ण , तीव्र याअर्थी वापराअत . कित्येक वेळी ' कडक ' शब्दबद्दलहि योजतात . ( सं . काठ = खडक , दगड ; काठक . तुल० ध्व . खड ; किंवा सं . कटक ; प्रा . कटग - पर्वतभाग , माची ) ( वाप्र .)
-
Stiff or hard from dryness--a washed cloth, a stick &c.: utterly dry--a well, tank, udder, breast; broad or broadly--dawn, dawning: fierce or fiercely--sunshine &c.: keen or keenly--hunger &c., and numerous similar applications involving the conception of extremeness, fullness, or sharpness. 2 In some senses and by a class of speakers used for कडक ad.
-
०लागणें नफा किंवा सुपारिणामाची आशा धरली असतां निष्फळ होणें . ' त्यांचे घरी रुपयांसाठीं गेलो होतों परंतु तेथें खडक लागला . ' खडकावर पोट भरणें - कोठेंहि पोट भरणें . सामाशब्द -
-
०खडक खडक (- वि .) पहा .
Site Search
Input language: