Dictionaries | References

गुलालाटु


 पु. १ ( मल्लविद्या ) एक कुस्तीचा डाव . याचे दोन प्रकार आहेत . ( १ ) जोडीदाराच्या हाताचें मनगट त्याच्या पायांमधून बाहेर धरून आपला दुसरा हात जोडीदाराच्या बगलेंतून घालून त्याच्या मानेवर पंजा ठेवावा व पंज्यानें जोडीदाराची मान दाबून व त्याच्या पायांतून काढून घेतलेला हात वर उचलून त्याला चीत करावें . ( २ ) जोडीदाराचा एक हात पायांतून बाहेर काढून आपल्या एका हातानें त्याचें मनगट धरावें व दुसर्‍या हातानें जोडीदाराची मान दाबून आपला बाहेरील ( उजवा किंवा डावा जो बाहेर असेल तो ) पाय त्याच्या मानेवर घालून गुढघ्याच्या लवणीनें जोडीदाराची मान दाबावी व त्यास चीत करावें . [ हिं . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP