Dictionaries | References

गुलाम






 m  The son of a दासी or female slave. A slave. Rogue, rascal, knave. One of the eight suits at cards; also, the king of that suit.
गुलाम जरी झाला, तरी एका खाणीतला
गुलाम असला तरी तो आपल्‍यासारखा मनुष्‍यच असतो.
 पु. १ बटकीचा मुलगा ; दासीपुत्र . २ कामासाठीं विकत घेतलेला माणूस ; दास . ३ ( ल . ) लुच्चा ; वस्ताद ; ठक ; चोर ; हरामखोर ; सोदा . ( हैदराल्लीस उद्देशून ) गुलामानें दगाच केला होता . - ख ८७९ . ४ पत्त्यांतील गुल्ल्या ; गुलम्या . ( इं . ) जॅक . ५ ( कौतुकानें ) हुषार लहान मुलगा . ६ चंगकांचन गंजिफांतील सहावा रंग . [ अर . घुलाम ]
०गिरी   गुलामी - स्त्री . १ दास्य ; गुलामासारखें राबणें ; गुलामवृत्ति ; गुलामाप्रमाणें खुशामत . २ सोदेगिरी ; शाठय ; हरामी ; लुच्चेगिरी . ३ गुलामांचा व्यापार . ४ ( ल . ) हांजी हांजी ; खुशामत ( क्रि० करणें ).
०जादा  पु. ( शिवीगाळ ) हरामखोर ; लुच्चा ; लबाड . गुलामडा - पु . ( तिरस्कारार्थीं ) गुलाम . गुलामपिचणी , गुलामपिसणी - स्त्री . ( पत्त्यांचा खेळ ) प्रथम पानें वाटतांना एक एक उताणें पान देऊन पहिल्यानें ज्याला गुलाम येईल त्यानें करावयाची पिसणी .
The son of a dásí or female slave. 2 A term of opprobrium in general, answering to rogue, rascal, knave. One of the eight suits at cards: also the king of that suit.
ना.  दास , विकत घेतलेला माणूस ;
ना.  कावेबाज , लबाड , लुच्चा , वस्ताद , हुषार ( लहान मुलांना ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP