Dictionaries | References ग गुलाब Aryabhushan School Dictionary | English | m Common rose, Rosa centifolia. मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | गुलाबाचे फूल १. गुलाब झाडाचे फूल. हे फार नाजूक असते यावरून, २. नाजूक स्त्री, मूल वगैरे. ‘अशा उन्हांत आपली नाजूक काय करपेल. आपण आपले हे गुलाबाचे फूल घरात नेऊन जपून ठेवा.’-त्राटिका. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. १ एक फुलझाड . हें झाड सरळ वाढतें . याचीं पानें सुंदर असून झाडाच्या सर्वांगांस कांटे असतात . फुलाचा रंग तांबडा , गुलाबी , पिंवळा , पांढरा असतो . फुलांपासून अत्तर काढतात व गुलकंद तयार करतात . २ त्याचें फूल . ३ गुलाबपाणी व अत्तर . गुलाबशिसे उत्तमसे तीन चार पाठविलेत तर बरें होतें . - ब्रच २५३ . [ फा . गुल = फूल + आब = पाणी ; हिं . गुलाब = गुलाबाचें फूल ] ०कंद पु. गुलकंद . गुलाबकंद वजन पक्के एक शेर पाठविल तो घेणें . - ब्रच १२९ . ०कळी स्त्री. गुलाबाची कळी ; ही औषधी असते . ०चक्री छकडी - स्त्री . साखरेच्या पाकांतील गुलाबाची मिठाई . ०छकडी स्त्री. १ चटकचांदणी स्त्रे ; एक प्रकारचें गाणें . ०छडी पु. खडीसाखरेची कांडी . ०जांब जामून - पुन . मैद्यामध्यें तूप व खवा मिसळून तुपांत तळून आणि नंतर जिलबीसारखी पाकांत मुरत टाकून केलेली मिठाई . - गृशि १ . ४३६ . [ फा . गुलाबजामन = एक फळ ] ०दान दाणी - नस्त्री . गुलाबपाणी ठेवण्याची व तें शिंपडण्याची झारी . [ फा . गुलाब्दान ] गुलाबदान - पु . द्राक्षाची ( पांढर्या रंगाच्या ) एक जात . - कृषि ५१२ . ०पाणी न. गुलाबाच्या फुलापासून तयार केलेलें सुगंधी पाणी . हें पानसुपारीच्या वेळीं अंगावर शिंपडतात . ०पाश पु. गुलाबदाणी . [ फा . ] ०शकर स्त्री. गुलाबपाक . गुलाब - शकरीच्या वडया सुमार पन्नास पाठविल्या त्या पावल्या . - ख १२ . ६६३६ . ०शेवतें न. ( गों . ) सोन्याचें गुलाबाचें फूल ; एक दागिना . गुलाबाचें फूल - न . गुलाब . २ गुलजार . ३ ( ल . ) नाजूक स्त्री , मूल . बाईसाहेब , हें ऊन फार कडक आहे बरें ... आपण आपलें हें गुलाबाचें फूल घरांत नेऊन जपून ठेवा . - त्राटिका . गुलाबी - स्त्री . १ ( कोल्हाटी , डोंबारी ) दोरावर काम करणारी मुलगी , हिला लाडकें नांव . २ एक लहान झुडूप . - वि . गुलाबविषयक ; गुलाबाचा ( रंग , वास , अत्तर ). ०चंदन न. गुलाबासारख्या वासाचें चंदन ; चंदनाची एक जात . जांब , जाम - पु . एक फळ ; रायजांभूळ . [ फा . गुलाब - जामन ] ०झोंप स्त्री. पहांटेची , थंड वेळेची झोंप . ०थंडी स्त्री. सौम्य प्रकारची , सुखावह थंड हवा ( ही गुलाबांना हितावह असते असें म्हणतात ); पहांटेची , थंडी . A dictionary, Marathi and English | English | Common rose, Rosa centifolia. 2 or गुलांबाचें फूल n A rose. 3 or गुलाबपाणी n Rosewater. Related Words SUGGEST A NEW WORD! गुलाब गुलाब : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP